#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर

इस्रायल आणि स्वातंत्र्यवीर सावरकर 

सावरकर हे खास करून काळाच्या ही पुढे जाऊन विचार करणे यासाठी ओळखले जातात . 

यहुदी वा ज्यू लोकांनी पॅलेस्टाईन मध्ये स्वतःचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे यासाठी सावरकरांचा पूर्ण पाठिंबा होता . ज्यू स्वतःचे राष्ट्र निर्माण करतील हे त्यांनी खूप आधीच सांगितले होते (साल  १९२१ - हिंदुत्व  या पुस्तकात) 

याचवेळी नेहरू व त्यांचे सरकार या ज्यू राष्ट्राला विरोध करत होते व त्याचवेळी अनेक बलाढ्य राष्ट्रे ( अमेरिका , ब्रिटन आदी ) इस्रायल निर्मितीस  पाठिंबा देत होते .त्यामुळे या बलाढ्य राष्ट्रांचा रोष ओढवून घेण्याचा धोका निर्माण झाला . या चुकीच्या व हास्यास्पद  परराष्ट्रीय धोरणाला सावरकरांनी विरोध केला . 

त्याचवेळी  हेच बलिष्ठ ज्यू राष्ट्र  आक्रमक आघाडी निर्माण करणाऱ्या मुस्लिम गटांना ( अरब राष्ट्रे ) यांना समर्थ प्रतिकार करण्याचे काम करेल , असे द्रष्टे सावरकर सांगतात . 

ते नमूद करतात की भारताने इस्रायल ला पाठींबा देणे हे भारताच्या हिताचे आहे . 

( सोबत ऐतिहासिक निवेदने - लेखक वि दा सावरकर या पुस्तकातील उतारे दिले आहेत ते इच्छुक वाचकांनी नक्की वाचावे )

Comments

  1. धन्यवाद हेमंतजी. सावरकरांचे अनेक महनीय पैलू आपण समोर आणता आहात. त्यातला परराष्ट्र राजकारण द्रष्टा हा पैलू अचंबीत करणारा आहे. आज सावरकरांबद्दल काहीच माहिती न घेता नुसत्या नसत्या ऐकीव माहितीवर वळवळणार्या छद्मी छद्मपादांवर जागरण हाच जालीम उपाय आहे. तुम्ही तो निष्ठेनेकरत आहात. धन्यवाद.

    ReplyDelete
  2. माहितीपूर्ण लेख

    ReplyDelete
  3. या देशाला किंबहुना सर्व हिंदुपर्यंत सावरकरांचे विचार पोहचणे हे काळाची गरज आहे, तो प्रयत्न आपण करत आहात , आपणांस सलाम

    ReplyDelete
    Replies
    1. आभार आपणही यात भाग घेऊ शकता

      Delete
  4. सावरकर किती द्रष्टे होते,पुढच्या घटनांचा अंदाज किती आधीपासून लावता येत होता त्यांना.स्वा.ना सादर प्रणाम!तुमचा उपक्रम छान आहे.लिखाणाच्या निमित्ताने वाचन व्यवस्थित होते.अन्यथा माझ्यासारखी तर वाचलेल विसरून जाते.
    ज्योती कुळकर्णी.

    ReplyDelete
  5. सावरकर भाषाभिमानी देखील होते, त्यांना भाषेत देखील बिलकुल भ्रष्टाचार मान्य नव्हता, तुमच्या या लेखात किती इंग्रजी शब्द आहेत ते तपासून पहावे व त्यांना पर्यायी सक्षम मराठी शब्द योजावेत ही नम्र विनंती

    ReplyDelete
    Replies
    1. मी चकित झालो आहे . या लेखात कुठले इंग्रजी शब्द आहेत ? जरा सांगता का ?

      Delete
    2. कदाचित त्यांना इस्त्रायल, अमेरिका , ब्रिटन या इंग्रजी शब्दाबद्दल म्हणावयाचे असेल...हा हा हा😆

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे