Posts

Showing posts from May, 2020

कृष्ण

Image
कृष्ण माझा , कृष्ण तुमचा कृष्ण कुणाचा , कृष्ण जगाचा कृष्ण कुणी , कृष्ण मनोमनी कृष्ण मुखी , कृष्ण कानोकानी कृष्ण रमणी , कृष्ण वाणी कृष्ण धमनी ,कृष्ण पानोपानी कृष्ण रंग , कृष्ण अभंग कृष्ण  छंद, कृष्ण तरंग कृष्ण सूक्ष्म, कृष्ण विशाल कृष्ण गगन, कृष्ण  आंगण कृष्ण शाम, कृष्ण राम कृष्ण  विठ्ठल, कृष्ण अ-टळ कृष्ण आत, कृष्ण बाहेर कृष्ण जर-तर, कृष्ण चराचर कृष्ण प्रीती , कृष्ण निर्मिती कृष्ण क्षती , कृष्ण मोक्षप्राप्ती कृष्ण पिता , कृष्ण माता कृष्ण गुरू , कृष्ण कल्पतरू १५.०५.२०२० ©हेमंत सांबरे 9922992370.

सावरकर समजून घेताना - हेमंत सांबरे . वीर सावरकर जयंती

Image
सावरकर समजून घेताना हेमंत सांबरे ( सावरकर म्हणजे आजचा विनाकारण ज्वलंत बनविला गेलेला विषय , माझा हा लेख वाचून झाल्यावर बरेच गैरसमज दूर होतील ..जे  सावरकरांविषयी पुर्ण माहिती नसल्याने *संभ्रमित* आहेत ते *कट्टर* सावरकर प्रेमी होतील व जे आधीच सावरकर भक्त आहेत ते स्वतःला नक्कीच *भाग्यवान* समजतील ). स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे  म्हणजे अनेक , रहस्यमय व रोमांचकारी प्रसंग , अनपेक्षित घटना यांनी भरलेला एकच आयुष्याचा *जीवनपट* आहे ..एकाच व्यक्तीच्या आयुष्यात किती गोष्टी घडू शकतात ! असा व्यक्ती की  ज्याच्या एकाच आयुष्यात किती प्रकारच्या *भूमिका* वाट्याला येतात ! आणि ती प्रत्येक भूमिका तो समरसून जगतो व त्या प्रत्येक भूमिकेला नुसता न्याय देत नाही तर त्याला *उत्तुंग शिखरावर* नेऊन ठेवतो ..असे भव्य-दिव्य  *चरित्र* निर्माण केलेला नेता क्वचितच भारतीय इतिहासात सापडेल ! पण माझा आजचा विषय जे तुम्हाला व  आपल्या सर्वांना माहीत आहे ते चर्चा करणे नसून ,  वीर सावरकरांचे एक वेगळे दर्शन तुम्हाला दाखविणे आहे , मला खात्री आहे की या लेखाच्या शेवटी मी ते करण्यात यश...

जे हरविले ...ते शोधताना ..... एक स्मरणरंजन

Image
*जे हरवले ...ते शोधताना* ..... *एक स्मरणरंजन* -हेमंत सदाशिव सांबरे (हा लेख वाचून झाल्यावर तुमच्या गतकाळातील अनेक सुखद _स्मृती_ जाग्या होतील व एक _अलौकीक शब्द_ प्रवासाचा अनुभव मिळेल याची खात्री) खरे तर आपली एखादी गोष्ट हरवली तर ती मिळेपर्यंत आपल्या जीवाची *घालमेल* होते , दुसरे काही तोपर्यंत सुचतच नाही ..ती वस्तू /गोष्ट सापडली की मग ही घालमेल /अस्वस्थता संपते खरी ...पण आपल्या आजूबाजूला रोज इतक्या घटना घडतात की मागे काय घडून गेले ही आठवणीत राहातही नाही ...तसेही त्यात काय चुकीचे ? *_जुने_* काही विसरले/नष्ट झाले तरच *_नव्याला_* जागा मिळेल ना ? हा निसर्गाचा नियमच आहे...पण मी तुम्हा वाचकांशी आज अशा अनेक वस्तूबद्दल बोलणार आहे ज्या तुमच्या-आमच्या आयुष्यातून कायमच्या बाद झाल्या आहेत वा होत आहेत . त्याबद्दल आपल्याला वाईट वाट्तेही पण आपण काही करू शकत नाही . मी हा लेख सुरू करण्यापूर्वी देवी सरस्वती ला प्रार्थना केली की माझ्या *लेखणीतून*  ✍️ ( अर्थात हे लिहताना मी मोबाईल मध्ये type करतोय ) असे *शब्द* व *वाक्य* येऊ दे की माझ्या वाचकाला ते वाचताना खूप आनंद मिळू दे व जसे मला जे *गवसले* तसे त...

स्त्री ईश्वराची सर्वात सुंदर निर्मिती

Image
*स्त्री ** *ईश्वराची सर्वात सुंदर निर्मिती** - हेमंत सांबरे या लेखाची सुरुवात मी माझ्या आईपासूनच करतो . आईला जाऊन आज दोन वर्षे झाली .बऱ्याच गोष्टींचे बीजारोपण आपल्या आयुष्यात आईच करत असते ..तसेच या लेखाचे बीजारोपण माझ्या मनाच्या कोपऱ्यात कधीतरी माझ्या आईनेच केले असावे (कधी 🤔  ते आता नक्की सांगता येत नाही ) , पण आत्ता ते माझ्या लेखणीतून फक्त कागदावर उतरत आहे एव्हढेच ..जे काही सुचतेय , जे काही कागदावर उतरतय त्याचे पूर्ण *क्रेडिट* आईचेच आहे , तिने माझ्यात पेरलेल्या त्या सुंदर विचारांचे आहे! हे बीज म्हणजे असे विचार की ज्यांच्यात कदाचित पूर्ण विश्व बदलण्याची खरी ताकद ! पण जसे एखादे बी पेरल्यावर त्या छोट्या बी मध्ये किती मोठा वृक्ष दडला आहे हे आपल्याला आधी दिसत नाही तसेच विचारांचेही असते ! आईने महत्त्वाचे म्हणजे स्त्री-पुरुष असा भेद कधी शिकविला नाही , तिच्या कृतीतून ही कधी दिसला नाही .त्यामुळे आम्हालाही मोठे होत असताना ही समानतेची दृष्टी आपोआपच मिळाली. पण जसा मी मोठा होत गेलो , जबाबदाऱ्या अंगावर येत गेल्या तसे हा जो विचार मला आईकडून मिळाला त्याचे *विस्तारित* रूप माझ...

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

Image
'नगरी भाषा - माझी मायबोली ' ©हेमंत सांबरे मी ही तसा मूळ , नगर जिल्ह्यातला ! नगर म्हणजे अहमदनगर ! तसे महाराष्ट्रात नगर म्हणलं की अहमदनगर असे वेगळं सांगायची गरज पडत नाही .  मराठी भाषा आपण नेहमीच म्हणतो की जशी वळेल तशी वळते , पण त्यातल्या त्यात आमची नगरी भाषा तर खूपच वेडी-वाकडी वळणे घेते असे मला वाटते . भाषा म्हणजे म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्याला सोपविलेला अमूल्य असा  वारसा असतो , आणि ही संपत्ती आपल्याला फुकटच मिळते ..त्यामुळे ही संपत्ती पुढच्या पिढीला देणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे . ते हिंदीत "धरोहर"  म्हणतात तसेच काहीसे आपली मातृभाषा  म्हणजे आपले "धरोहरच"  असते .  आज मी तुम्हाला या नगरी शब्दांच्या अदभुत प्रदेशाची सफर घडविण्याचा प्रयत्न करतो  , मला आशा आहे तुम्हाला ते नक्कीच आवडेल .  ही नगरी भाषा तशी इतर महाराष्ट्रीय लोकांना बरीच गावंढळ वगैरे वाटते , पण तिचे आपले एक स्वस्वरूप  आहे जे फार रूपवान नसले तरी रोखठोक आहे . तिच्यात प्रांजळपणा च्या  पुढची स्टेप अशी ती स्पष्टता आहे . त्यामुळे प्रथम ...