जे हरविले ...ते शोधताना ..... एक स्मरणरंजन
*जे हरवले ...ते शोधताना* ..... *एक स्मरणरंजन*
-हेमंत सदाशिव सांबरे
(हा लेख वाचून झाल्यावर तुमच्या गतकाळातील अनेक सुखद _स्मृती_ जाग्या होतील व एक _अलौकीक शब्द_ प्रवासाचा अनुभव मिळेल याची खात्री)
खरे तर आपली एखादी गोष्ट हरवली तर ती मिळेपर्यंत आपल्या जीवाची *घालमेल* होते , दुसरे काही तोपर्यंत सुचतच नाही ..ती वस्तू /गोष्ट सापडली की मग ही घालमेल /अस्वस्थता संपते खरी ...पण आपल्या आजूबाजूला रोज इतक्या घटना घडतात की मागे काय घडून गेले ही आठवणीत राहातही नाही ...तसेही त्यात काय चुकीचे ? *_जुने_* काही विसरले/नष्ट झाले तरच *_नव्याला_* जागा मिळेल ना ? हा निसर्गाचा नियमच आहे...पण मी तुम्हा वाचकांशी आज अशा अनेक वस्तूबद्दल बोलणार आहे ज्या तुमच्या-आमच्या आयुष्यातून कायमच्या बाद झाल्या आहेत वा होत आहेत . त्याबद्दल आपल्याला वाईट वाट्तेही पण आपण काही करू शकत नाही .
मी हा लेख सुरू करण्यापूर्वी देवी सरस्वती ला प्रार्थना केली की माझ्या *लेखणीतून* ✍️( अर्थात हे लिहताना मी मोबाईल मध्ये type करतोय ) असे *शब्द* व *वाक्य* येऊ दे की माझ्या वाचकाला ते वाचताना खूप आनंद मिळू दे व जसे मला जे *गवसले* तसे त्यांनाही काही तरी जुन्या - नव्या *आठवणी* चे धागे सापडू दे 🤝 ही आठवणींची सफर खुपच सुंदर व रम्य होऊ दे 👍
हा विषय तसा कालच सुचला .विचार करत होतो की गेल्या काही वर्षांत आपल्या रोजच्या आयुष्यातून किती वस्तू नष्ट झाल्यात ? technology मुळे असेल किंवा नवीन पर्याय मिळाल्याने असेल म्हणा 🤔. मग अशा अनेक गोष्टी एखाद्या *जादूगाराच्या* पोतडीतून बाहेर याव्या तशा माझ्या समोर येऊ लागल्या , आणि त्यांचे महत्त्व बघून मी अवाक झालो .
*कंदील* ही अशी वस्तू होती ज्याने आपल्याला उजेड मिळायचा .तो काळ असा होता , गावागावात लाईटस नव्हत्या , मग अशा वेळी कंदिलाच्या उजेडाचा आधार होता .याच कंदीलात अभ्यास व्हायचा ....याच कंदिलाच्या आजूबाजूला बसून अंगणात गप्पा होत ...जेव्हा लाईटस नव्हत्या तेव्हा भुताखेतांच्या भीतीपासून हाच कंदील मोठा आधार वाटायचा ( पुढे गावागावात लाईट्स आले तसे हे कंदिलही गेले , आणि हे भूत 💀☠️ ही पळून गेले 😃)
जसा कंदील तसे *चिमणी* ( म्हणजे घासलेट चा दिवा ) ही संपली . ..
प्रत्येक घराबाहेर आंघोळीचे पाणी तापविण्यासाठी *कोळशाचे बंब* असायचे ...त्याआधी *चूल* होती ज्यावर जर्मन चे *तपेले* ठेवून पाणी तापवायचे .हिवाळ्यात याच चुलीचा *शेकोटी* म्हणूनही वापर होत असे ...
प्रत्येक घराबाहेर आंघोळीचे पाणी तापविण्यासाठी *कोळशाचे बंब* असायचे ...त्याआधी *चूल* होती ज्यावर जर्मन चे *तपेले* ठेवून पाणी तापवायचे .हिवाळ्यात याच चुलीचा *शेकोटी* म्हणूनही वापर होत असे ...
जिथे आपल्याला खायला मिळते ते ठिकाण म्हणूनच महत्त्वाचे आहे असे ठिकाण म्हणजे *स्वैपाकघर* ! इथल्या किती वस्तू आता गायब झाल्यात बघा....भाकरी ठेवायचे टोपले( याला *शिंकाळे* ही म्हणत) ... *खलबत्ता* , *पाटा-वरवंटा* (मिक्सर आला आणि हे सारे गेले ) ... ताक घरी तयार करण्यासाठी लागणारा *लाकडी रवी ...* दळण करायचे *जाते* ( हे जाऊन ही खूप वर्षे झाली ) ...धान्य साठवायला *चौकोनी पत्र्याचे डबे* ( पूर्वी खाण्याचे तेल अशा डब्यांत यायचे , तेल सुट्टे विकले की रिकामा झालेला डबा धान्य साठवायला वापरायचे -reuse ) ...
*स्टोव्ह* हा तर एक स्वतंत्र विषय आहे . रॉकेल वर चालणारा हा स्टोव्ह ...त्याचा आवाज अजूनही कानात घुमतोय ...नंतरच्या काळात घरोघर गॅस आले स्टोव्ह हळूहळू कमी झाले पण तरीही तो *होस्टेलवर* राहणाऱ्या मुलांचा नंतरही बरेच दिवस तोच एक आधार होता .
घरात झाडण्याचे काम *केरसुणी* ( किंवा *शिरई* ) , तर अंगण झाडण्यासाठी *घोळ* ( या दोन्ही वस्तू गावाकडे अजून स्थान टिकवून आहेत ) .
घरात गेले की एक किंवा अनेक *कोनाडे* असत .तेव्हा फर्निचर नसायचे तर हे कोनाडेच वस्तू ठेवायला वापरले जात .हेच कोनाडे चिमणी ठेवायलाही वापरत , कारण वारा लागून चिमणी विझू नये म्हणून...कोनाड्यालगत लाकडाची *खुंटी* असायची ज्यावर वेगवेगळ्या पिशव्या टांगल्या जात .
पिण्याचे पाणी साठवायला *मातीचा* *माठ* तर वापरायचे पाण्यासाठी *रांजण* असत .
धान्य मोजून द्यायला *अधुली* व *आठवा* अशी मापे होती .
काही घरांमध्ये *कोळशाची इस्त्री* असायची ..ही अशी इस्त्री खूप जड असायची, त्यात गरम कोळसा घालून कपडे इस्त्री केले जात ...ज्यांना इस्त्री घ्यायला परवडत नसायचे ते *तांब्यामध्ये* *कोळसा* घालून कपडे इस्त्री करत ( ही गोष्ट तर बऱ्याच वाचकांना नक्कीच आठवत असेल ) .
आत्तापर्यंत रोजच्या वापरातल्या कुठल्या वस्तू नामशेष झाल्या ते बघितले आता थोड्या चैन समजल्या जाणाऱ्या वस्तू कडे वळतो .
यात *दूरध्वनी ( लँड लाईन)*☎️📞 चे स्थान खूप वरचे .लँडलाईन चा प्रसार भारतात खूप *slow* झाला असे मला वाटते . ..कारण बरेच वर्षे हा फोन म्हणजे शहरातील मक्तेदारी होती , खूप उशिरा म्हणजे १९९० नंतर तो गावाकडे आला . बरेच दिवस तो *dial* असलेला फोन होता, नंतर तो *बटणे* असलेला फोन आला .तो बटणे असलेला झाल्यावरच गावाकडे प्रवेश करता झाला . सुरुवातीला तो *STD , ISD* अशा नावाने तो आला , जेथे लाईन लावून फोन करावा लागायचा . त्या काळी जवळपास एक दशक भर हा एक चांगला *बिझनेस* होता . नंतर *PCO* म्हणून आला , यात एक फोन जवळजवळ प्रत्येक दुकानाच्या बाहेर एका लोखंडी फ्रेम मध्ये *लॉक* करून ठेवलेला असायचा .मग त्यात आपण *एक रु चा* कॉइन टाकला की साधारण ६० सेकंद ते १२० सेकंद वगैरे बोलायला मिळायचे ..हा *कॉइन* *बॉक्स* ( हो या फोनला असेच नाव होते ) म्हणजे instant communication चा खूप मोठा आधार होता .पुढे कॉल अजून स्वस्त झाला , तर लोक अनेक मिनिटे बोलत बसत ( विशेषतः प्रेम करणारे कपल वगैरे 👩❤️👨) ....
नव्या शतकात *मोबाईलचा* प्रवेश झाला , आणि मोबाईल मात्र खूप झपाट्याने पसरला ...जसा मोबाईल आला तसे STD/ISD वेगाने इतिहासजमा झाले . घरचे लँड लाईन मात्र अलिकडे पर्यंत होते , पण गेल्या दहा वर्षांत कित्येकांनी तेही कट केले ( गरज संपली , प्रत्येक हातात मोबाईल, तसेच PCO स्वस्त असल्याने बरेच दिवस टिकून होते , पण ते ही झपाट्याने गायब झाले) ..परंतु आजही अनेक offices मध्ये हे फोन टिकून आहेत 📠.
*टाईपरायटर* म्हणजे कॉम्पुटर ची क्रांती होण्यापूर्वी official कामे करण्याचा सगळ्यात मुख्य आधार होता ....मात्र कॉम्पुटर स्वस्त झाल्यावरच typewriter ची exit झाली . नुकतेच netflix वर *typewriter* नावाची series होऊन गेली त्यात एका typewriter मध्ये आत्मा असतो असे दाखविले आहे ..त्यानिमित्ताने typewriter कसा असतो हे नव्या पिढीला कदाचित बघायला मिळाले .
सकाळी लवकर जाग येण्यासाठी *गजराचे घड्याळ*⏰ बरेच दिवस स्थान टिकवून होते , मोबाईलच्या एन्ट्री बरोबर या *विश्वासू* *कोंबड्याचे* आरवणे बंद कधी झाले कळालेच नाही .
*जुना* *बॉक्स* **टीव्ही** 📺 म्हणजे एक पूर्ण वेगळे प्रकरण आहे . ...आधी तो _black & white_ होता नंतर तो __colorful_ झाला .मला जसे आठवते तसे ONIDA , VIDEOCON या कंपन्या चे त्या काळात वर्चस्व होते ( आता कदाचित या कंपन्याही इतिहासजमा झाल्यात ) ... एकदम सुरुवातीच्या काळात घराच्या गच्चीवर एक उंचच उंच अँटेना असायचा आणि हे एक प्रकरण खूप मनोरंजक होते .....एकजण वर गच्चीवर जाऊन अँटेना फिरवत बसायचा व दुसरा कुणी तरी खाली चित्र adjust करत असायचा ...सिग्नल चे खूप प्रॉब्लेम असल्याने तेव्हा टिव्ही वर सारख्या अधूनमधून *मुंग्या* *मुंग्यां* ( हो चित्र गेले की direct पडद्यावर फक्त मुंग्या दिसायच्या 😆😆) येत, मग परत जा वर, फिरवा तो अँटेना .....परत चित्र adjust करा ...असे टीव्ही बघायचा म्हणजे खूप कष्टाचे काम असायचे ... आत्ताच्या रिमोट वर operate करणाऱ्या व स्मार्ट टीव्ही बघणाऱ्या पिढीला त्या वेदनेची कल्पनाही येणार नाही ...😛. काळाच्या ओघात हे रोमांचक पद्धतीने टीव्ही बघणे मात्र डोळ्यादेखत गेले ....
अजून एक खूप *रोमांचक* गोष्ट सांगावी वाटतेय ...जी तुम्हा वाचकांच्याही आठवणींच्या *कुपीत* कुठेतरी अजूनही असेल... ती म्हणजे गणपतीच्या काळात *VCR* वर 📼 *पिक्चर* (movie ) बघणे ...गणपती मंडपाच्या बाजूलाच हा छोटासा TV असायच्या ज्यावर पूर्ण दहा दिवस *अमिताभ , गोविंदा , मिथुन* यांचे तुफान हाणामारी चे पिक्चर लावलेले असायचे ....तिथे जो *माहोल* असायचा , जी *मज्जा* असायची , जसा *उत्साह* असायचा तशी मजा, तसा उत्साह , तसा माहोल नंतर कधीही मिळाला नाही .....त्या काळात ही हिरो लोक जे काही करायचे ते सगळेच खरेच वाटायचे . त्यामुळे *फायटींग* 🤼♀️🤼♂️ हा शब्द ज्याच्या त्याच्या तोंडात रुळलेला असायचा.
याच दरम्यान कधीतरी *टेपरेकॉर्डर* ची भर पडली ...सुरुवातीला *कॅसेट प्लेयर* होते ...प्रत्येकाकडे अनेक पिक्चर च्या कॅसेट असायच्या.. एकमेकाला ऐकायला ही दिल्या जात ..पुढे आपल्या *आवडीचे* गाणे *रेकॉर्ड* करून देणारे दुकाने ही निघाली ...मला आठवते तिथे waiting असायचे ....गाण्यांची लिस्ट दिली आणि परत ती कॅसेट मिळेपर्यंत खूप उत्सुकता असायची ... आणि रेकॉर्ड केलेली कॅसेट् मिळाली की सगळे एकत्र बसून ऐकायचो ...
जसा टेपरेकॉर्डर तसाच *रेडीओ*📻 ....विविध भारती वर विविध कार्यक्रम चालू असायचे ...घरातल्या म्हाताऱ्या ना बातम्या ऐकण्यात खूप रस असायचा ....अमीन सयानी यांची *_बिना का गीतमाला*_ तर अतिशय फेमस होती ....अमीन सयानी च्या त्या विशिष्ट आवाजाचे तर कित्येक जण दिवाने होते . ( ज्या वाचकांना हे आठवत असेल ते अमिनचा तो " *बहनो और भाईयो* "असा खर्जातील आवाज कसा विसरू शकतील ? ) ( आम्ही दोघे भाऊ लहानपणी हा कार्यक्रम ऐकायचो तर हे वाक्य घाईत आम्हाला " *दोनो* *भाईयो* असे ऐकू आल्यासारखे व्हायचे आणि आम्ही चकित व्हायचो की अमीन सयानीला कसे कळले की आम्ही दोघे आहोत ते 😇😇) तो गाण्यांचे वेड असणाऱ्या रसिकांसाठी *_सुवर्णकाळ_* होता . करमणुकीचे एकमेव साधन असल्याने त्या काळात *रेडिओ* हा घरातील अजून एक _सदस्य_ असल्यासारखीच भावना असायची .
खूप आधी *टुरिंग टॉकीज* (touring म्हणजे फिरस्ते ) हा एक प्रकार होता ...म्हणजे गावाकडे ज्या यात्रा , जत्रा भरत तेथे हे फिरणारे टॉकीज वाले येऊन त्या वेळचे फेमस चित्रपट दाखवायचे ...बऱ्याच वेळा हे *तमाशापट* असायचे किंवा *देवावरचे चरित्रपट* तरी असायचे ...पुढे थोड्या मोठ्या शहरात किंवा गावात *open to *sky cinema* ची सुरुवात झाली ...म्हणजे मोकळ्या मैदानात चारी बाजूनी पडदे लावून , समोर पांढरा पडदा असायचा ...मग येथे तिकिट लावून सिनेमा दाखवायचे ...तिकीट देखील दोन रु , पाच रु असे ...येथेही खूप मजा यायची , दर चार दिवसांनी किंवा आठ दिवसांनी हा सिनेमा बदलायचा . पावसाळ्यात मात्र हा open to sky सिनेमा बंद राहायचा .
हे सगळे आठवताना विचार येतो की खरच जर *time machine* सारखे काही मिळाले तर आज माझ्या मुलाला किंवा आत्ताच्या पिढीला या मागच्या दुनियेत घेऊन जाईल म्हणतो , व या विलक्षण दुनियेची सफर घडवून आणेल .
शाळेत जायचो तर *शाईचा* *पेन*🖋️✒️ अतिशय प्रिय असायचा ..निळ्या व काळ्या *शाईची दौत* असायची ...तेव्हा रंगपंचमी ला रंग वगैरे फार मिळत नसल्याने शाईचा वापर रंग खूप व्हायचा एकमेकावर फेकण्यासाठी .... *खापराची* *पाटी* ....त्यावर लिहली जाणारी *पांढरी पेन्सिल* .... लहान मुले ही पेन्सिल खायचे, तेव्हा म्हणायचे की त्यात _calcium_ असतो .
खेळ खेळायचे तर किती असंख्य प्रकार होते ! *लपाछपी* हा तर खूप लोकप्रिय प्रकार...संध्याकाळी थोडा अंधार पडला की हा खेळ सुरू व्हायचा ...एकावेळी कितीही मुले यात खेळायची ...नंतर *विटीदांडू* ... *सुरपारंब्या* ..(मी जास्त वर्णन करत नाही कारण तुम्हा वाचकांच्या आठवणी चाळवल्या जाव्या हा उद्देश ) .किती रोमांचक व साहसी प्रकारचे खेळ होते हे .... का नष्ट झाले हे खेळ? ....खरेतर खूप वाईट वाटते ...सायकल च्या निरुपयोगी टायर ला काठीने मारत मारत मारत पळत ढकलणे म्हणजे *चकारी* *खेळणे* .... बरेच जण लिंबाच्या काठीला वाकवून *धनुष्य*🏹 बनवायचे ,सायकलच्या फाटलेल्या *ट्यूब* पासून धनुष्याची दोरी , तर घोळाची काडी ला बॉलपेन ची रिफिल लावून त्याचा *बाण* तयार व्हायचा ...हा रिफिलचा बाण बराच दूर जायचा आणि रबरामुळे त्याला बराच ताण मिळायचा .... *लाकडी भोवरा* व त्याला गुंडाळलेला दोरा .... मुली फुगडी खेळायच्या ...हा फुगडीचा खेळही खूप दुर्मिळ झालाय आता.
*लंगडी* , *धराधरी* , *रपाधोपी*🏈 ( कापडी चिंध्याचा बॉल जो एकमेकाला नेम धरून फेकून मारणे ) इ चांगले व्यायाम देणारे खेळ आज नामशेष झालेत .. हे सगळे खेळ असे होते की ते खेळताना काही विकत घेण्याची गरज पडायची नाही पण *आनंद* मात्र *फुकट* , व खूप मिळायचा.. मी चुकीचा असेल कदाचित , पण क्रिकेटच्या 🏏 अतिरिक्त वेडाने व नंतर टिव्ही , मोबाईलने बाकी सारे भारतीय मूळचे मैदानी खेळ नष्ट करून टाकले ...
*लंगडी* , *धराधरी* , *रपाधोपी*🏈 ( कापडी चिंध्याचा बॉल जो एकमेकाला नेम धरून फेकून मारणे ) इ चांगले व्यायाम देणारे खेळ आज नामशेष झालेत .. हे सगळे खेळ असे होते की ते खेळताना काही विकत घेण्याची गरज पडायची नाही पण *आनंद* मात्र *फुकट* , व खूप मिळायचा.. मी चुकीचा असेल कदाचित , पण क्रिकेटच्या 🏏 अतिरिक्त वेडाने व नंतर टिव्ही , मोबाईलने बाकी सारे भारतीय मूळचे मैदानी खेळ नष्ट करून टाकले ...
घरी पोस्टाने येणारी *पत्रे* 📃तर एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल ....त्यात *पोस्टकार्ड* , आंतरदेशीय पत्रे , पाकिटातील पत्रे 📩(खूप secret असेल तर) ही सारे पत्रे म्हणजे मैत्री , प्रेम , आशीर्वाद , दुःख ,आनंद , उत्साह , आतुरता , विरह , वात्सल्य या अशा अनेक भावनांनी ओसंडून वाहत असायची ...या अशा पत्रांची घरोघरी खूप आतुरतेने वाट पाहत असत....पोस्टमन म्हणजे देवदूतापेक्षा कमी नव्हता तेव्हा ...ती पत्रे वाचताना अश्रूंनी अक्षरशः भिजायची ....पत्रांद्वारे भावनांची जी देवाणघेवाण व उलाढाल होत असे त्याची तोड आजच्या _SMS , Whatsapp_ Email _ला कधीही येऊ शकत नाही ...
*चांदोबा* 🌝🌙, *किशोर* ही मासिके तर वाचनाची आवड असलेल्या प्रत्येक घराचा अविभाज्य भाग होते ...मला तर खरे वाचनाची आवड चांदोबानेच लावली ....या चांदोबात जीवनाचे सुंदर दर्शन घडविणाऱ्या अनेक कथा असायच्या, ज्या वाचताना त्यात वर्णन केलेली दृश्य जशीच्या तशी वाचकांच्या डोळ्यासमोर उभी राहत ...त्यात चित्रे ही असायची खूप छान छान अशी ...मला _चांदोबातली घरे_🏠 फार आवडत , ही घरे पूर्ण रिकामी असत , कुठल्याही वस्तू त्या घरांत नसत ...फक्त माणसे अशी खाली जमिनीवर बसूनच जेवायची , बोलायची ....ही _पुस्तके_ 📖 काळाच्या ओघात कधी बंद झाली कळालेही नाही .पण ज्यांनी त्या काळात ही वाचली आहेत ते कधीही विसरू शकणार नाही .
अश्या आपल्या आयुष्यातून बाद झालेल्या व होऊ घातलेल्या वस्तू ...खरे तर या निर्जीव आहेत ...त्या वस्तू बोलू शकत नाही , पण तरीही त्यांना स्वतःची अशी भाषा आहे , बोली आहे ...त्यांना आपण विसरू शकतो का? जरी_विस्मरण_ झाले तरी आपल्या ह्रदयाच्या कुठल्यातरी _हळुवार_ कोपऱ्यात त्या असतात आणि राहतील ...या लेखाचा उद्देश त्या सुंदर आठवांना परत हळुवार फुंकर घालणे हाच आहे ...यातून तुम्हाला याने थोडेफार जरी आतून हलविले तरी लेेख लिहण्या मागच्या *कष्टाचे फळ* मिळाले असे मला वाटेल .
धन्यवाद
२६.०४.२०२०
© हेमंत सांबरे
मोबाईल क्रमांक-9922992370.
उंबरी , तालुका - संगमनेर , जिल्हा - अहमदनगर .
(या लेखावरील तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल , तसेच तुमच्याही काही आठवणी असतील तर सांगा 🙏)
खूप छान अनुभवी लेखन वाचून मला आनंद झाला, सरस्वती ची कृपा नेहमी आपल्या व आपल्या मोबाईल वर असो.
ReplyDeleteही च देवी चरणी प्रार्थना.
आपले नाव
Deleteलेख वाचुन सुंदर असा भास झाला
ReplyDeleteधन्यवाद
Deleteजुने ते सोने........ छान लेख आहे
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteखूप सुंदर लेख लिहिला ,आठवणीने जाग्या झाल्यात.....
ReplyDeleteसुंदर, अशीच सरस्वती ची कृपा सदैव आपल्यावर राहो🙏. जुनं ते सोनं.
ReplyDeleteखूप सुंदर
ReplyDelete