मीच मला बघताना
*मीच मला बघताना .....* शिर्षक वाचूनच तुम्हाला धक्का बसेल ...पण हे काही फार असे जड शब्द वगैरे घेऊन येणार नाही .पण काहीतरी वेगळे असेल हे नक्कीच... तसे आपल्याला डोळे दिले आहे देवाने , तसेच मनही दिले आहे .या डोळ्यांनी आपण इतरांना बघू शकतो , पण स्वतःकडे बघू शकतो का ? म्हणजे हे माझेच डोळे समोर , आजूबाजूला , इकडे तिकडे सगळीकडे बघतात व ते आजूबाजूचं analysis सतत करतात , मग ती व्यक्ती असेल , परिस्थिती असेल किंवा अजून काहीही असेल .....पण हे माझे स्वतःचेच डोळे ( माझे हक्काचे , माझ्या मालकीचे ) स्वतःकडे मात्र बघू शकत नाही ( तुम्ही म्हणाल , चूक , आरशात बघू शकतोच की! ) , पण इथे बघणे चा अर्थ नुसते बघणे या पुरता मर्यादित नाही तर डोकावणे असा आहे ...पण हेच आपले मन ? ते मात्र अफाट आहे ... आहे ... डोळ्याच्या दिसण्याचा ( eye sight ) मर्यादा आहे , पण मन अमर्याद आहे .. मनाचा वेग अफाट आहे . आपल्यात रोज काही बदल होत असतो .बरोबर ना ? पण हाच बदल खूप सूक्ष्म पातळीवरचा असतो . खरेतर इथे प्रत्येक क्षण बदलतो , तेव्हा आपणही बदलतो .पण हा होणारा बदल , माझ्या स्वतः मध्ये होतो असे जेव्हा मानतो तेव्हा तो म...