आनंदाच्या वाटा
#आनंदाच्या वाटा* - हेमंत सांबरे
काही दिवसांपूर्वी मी एक मित्राशी फोनवर बोलताना विषय निघाला की , आनंदी राहणे ही कला आहे की स्वभाव ? यावर मग आमची खूप जोरात चर्चा झाली ..मग त्यातून अनेक नवीन गोष्टी पुढे आल्या आणि मला प्रकर्षाने जाणवले की वाचकांशी याबद्दल थोडे गुप्तगू करावे .
खरे तर सदैव आनंदी राहणे एवढे काही सोप्पे नाही ..रोज आपल्या आजूबाजूला किती घटना होतात व त्याचा काहीतरी बरा वाईट परिणाम आपल्या मनावर होतो ...मनामध्ये भावनांची निर्मिती होते ..भावनांमधून विचारांची निर्मिती ..आणि हेच विचार मग ठरवितात की आपण आनंदी व्हायचे की दुःखी ! इथे एक फार मजेचा भाग आहे की एखादी घडलेली एकच घटना एकासाठी आनंदाची असू शकते व दुसऱ्यासाठी दुःखाची ! म्हणजे कॉर्पोरेट जगात एखाद्याला प्रोमोशन मिळाले त्या व्यक्तीला ती आनंद देते तर ज्यांना नाही मिळाले त्यांना दुःख ! आणि तसे बघितले तर रोज बऱ्याच घटना मनाविरुद्ध च घडत असतात , मग आनंदी कसे राहणार ?
काही लोक असा वाद करतात की खूप पैसे असलेले लोकच आनंदी राहू शकतात व गरीब लोक मात्र सुखी राहू शकत नाही तसेच काही जण याच्या उलट ही बोलतात की गरीब सुखी राहतात , श्रीमंत मात्र कितीही पैसे असले तरी सुखी होऊ शकत नाही . पण या दोन्ही समजुती खऱ्या नाहीच तशा ! सुख वा आनंद हे काहीतरी वेगळे असे असते व जे या वरील दोन्ही *गृहितकांच्या* पलीकडचे आहे असे मला वाटते .
मला अजूनही आठवते , लहानपणी ( किंवा अजूनही हा प्रवास केला तरी तेव्हडीच मज्जा येते ) केलेला साध्या बसचा प्रवास ! त्यावेळी बसच्या खिडकीत बसण्यासाठी धडपड असायची , कारण त्यामुळे लांबवरचे दृश्य दिसायचे ! विशेषतः पावसाळ्यात तर ही खिडकीत बसायची मजा काही वेगळीच असते , कारण थोडासा जरी पाऊस चालू असला तर ते पाण्याचे तुषार थेट आपल्या अंगावर पडत राहतात ! हा जो असा बसच्या खिडकीत बसून पावसात किंचित भिजणे , मागे पळणारे डोंगर , झाडे पाहणे यासारख्या आनंदाची तुलना कारमध्ये बसून फिरण्यात ही नंतर कधी आली नाही !
अजून एक आनंदाची आलेली भावना मला खूप श्रेष्ठ वाटते ..ती म्हणजे तुमचे एखादे खूप आवडते गाणे कदाचित तुम्हाला खूप वर्षानी वा दिवसांनी ऐकायला मिळते तेव्हा ! मग ते गाणे कुठलेही असेल शास्त्रीय, नाट्यसंगीत वा चित्रपटातील! त्याने काही फरक पडत नाही ! मग हे असे गाणे काही दिवस स्वतःशीच कित्येक वेळा गुणगुणत राहतो अक्षरशः स्वतःचे पूर्ण समाधान होईपर्यंत ! ( अलीकडे मला येशूदास यांचे आलाप चित्रपटातील , ' कोई गाता मै सो जाता ' हे हरिवंशराय बच्चन यांनी लिहलेले गाणे माझी एक जुनी डायरी चाळत असताना मिळाले ) हा ही आनंद वर्णन करण्याच्या पलीकडचा असतो , आणि आपण नेहमी म्हणतो की आनंद वाटल्याने वाढतो , हे कितीही खरे असले तरी हा असा *आंतरिक आनंद* मला वाटायचा नसतोच मुळी ! मला एकट्यालाच तो भरभरून उपभोगायला आवडतो , कारण मलाच तो इतका हवाहवासा आहे की दुसऱ्याला द्यायला कदाचित उरतच नाही .
जसे गाण्याचे आहे तसेच *पुस्तकाचेही* असते . काही पुस्तके आपण कितीही वेळा वाचले तरी परत परत वाचावेसे वाटते ! जसे रणजित देसाई चे , " *श्रीमान योगी* " , " *स्वामी* " , पू ल देशपांडे यांचे , " *व्यक्ती* *आणि* *वल्ली* " , अशी अजून कितीतरी पुस्तके जी मनाच्या प्रदेशावर कायम राज्य करतात व आपल्याला आनंदाच्या एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात .त्यामुळे माझे एक ठाम मत आहे , ' ज्या व्यक्तीला वाचनाची आवड व गोडी आहे तो इतर कुणाहीपेक्षा आनंदी कसे राहायचे हे तो जाणून असतो ' ( म्हणजे आनंदी कसे राहावे याचा शहाणपणा - *WISDOM* , हा वाचन करत राहणाऱ्याकडे इतरांपेक्षा लवकर
येतो ) .
अजून एक खूप महत्वाचे मला सांगायचे आहे . आनंदी होण्यासाठी आपल्या आतल्या *ego ला ठार मारले* पाहिजे ..हा आतला ego आपल्या आजूबाजूला कितीही चांगले घडले तरी आपल्याला त्याचा आनंद लुटू देत नाही .. मी बघितले आहे की काही लोकांना *POSITION* वा मनात बाळगत असलेल्या *खोट्या* *प्रतिष्ठा* यामुळे खळखळून हसायलाही कमीपणाचे वाटते .मग अशा जणांच्या आयुष्यात आनंदाचे कितिही प्रसंग येतात नि निघूनही जातात !मग पुढे कधीतरी वेळ निघून जाते व हीच लोक जेव्हा मागे वळून पाहतात तेव्हा दुःखी होतात की अरेरे हे असे भरभरून जगण्याचे प्रसंग निसटून गेले !
दुसरे असे की ज्या माणसाच्या आयुष्यात *मित्र* कमी असतात तो ही फारसा आनंदी राहू शकत नाही ! त्यामुळे खूप , खूप मित्र जोडले पाहिजेत ! आणि हे मित्र सगळ्या प्रकारचे असले पाहिजे ! गरीब , श्रीमंत ! हुशार, बुद्धू ! शहरात राहणारे, खेड्यात राहणारे ! भारतात राहणारे , अमेरिकेत राहणारे ! अनेक प्रकारचे मित्र असणे ही खूप *श्रेष्ठ* दर्जाची *संपत्ती* आहे ..जुन्या मित्रांना कधीही विसरू नये , मग ते आज कुठल्याही स्थितीत असले तरी !
एक अजून अशी खूप श्रेष्ठ भावना असते की जी आपल्या मनाला खूप आनंद देत असते ! आणि ही भावना जगातील *सर्वश्रेष्ठ आनंद* देऊन जाते ..ती म्हणजे आपल्यावर कुणीतरी *मनापासून* *प्रेम* करत असल्याची जाणीव वा भावना ! आता बघा की ही गोष्ट आज खूप दुर्मिळ झाली आहे ! आजच्या काळात कुणीही काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय कुणाला जवळ करत नाही ! अशाच वेळी जर आपल्यावर कुणीही खरोखर असे *स्वार्थराहित* प्रेम करत असेल तर आपण स्वतःला खूप नशीबवान समजावे ! ( बहुधा आईच असे प्रेम आपल्यावर करते , पण तिची किमंत कदाचित खूप उशीरापर्यंत कळतच नाही )..आणि हे असे प्रेम *मिळणे व ते समजणे* म्हणजे आनंदाच्या भावनेचे परमोच्च टोक गाठले असे समजायला हरकत नाही . इथे एक उलट गोष्टही समजून घेणे गरजेचे आहे ..जर असे निस्वार्थी प्रेम आपण दुसऱ्यावर करत असू तर आपल्याला ती परमोच्च आनंदाची भावना मिळते का ? तर नाही इथे देण्यातला आनंद मिळत असला तरी हे स्वार्थराहित प्रेम आपल्याला कुणीतरी देत असल्याच्या भावनेला तो मागे टाकतो ...कारण असे प्रेम आपल्याला मिळते तेव्हा आपण स्वतःला खूप भाग्यवान समजू लागतो व असे प्रेम मिळण्याचा आनंद हा असे प्रेम देण्यापेक्षा नकळत मोठा होतो .
प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाच्या व्याख्या बदलत जातात ..पण आनंदी राहायचे असेल तर एक कुठलाही *छंद* असलाच पाहिजे .मग ते वाचन असेल , गाणे असेल , फिरण्याची आवड असेल !
आनंद हा स्वभाव नसून तो शोधावा लागतो .. तो आपल्या आजूबाजूलाच असतो ..फार लांब वा दूर ही नसतो खरा ! ही आनंदाची खाण तुमच्या-आमच्या जवळच असते , ती खोदायचे थोडे कष्ट घ्यावे लागतात हे मात्र खरे ! यात आपण कुठल्याही घटनेकडे , गोष्टींकडे कसे बघतो त्यावर ही असते .त्यालाच *दृष्टिकोन* वा attitude म्हणतात ..आणि आनंदाची *बातमी* अशी आहे की हा *attitude* आपल्याला *develop* करता येतो .
आनंद म्हणजे नुसताच देणे नाही तर घेणे ही आहे ..कारण आपण घेत नाही तोपर्यंत तो आपल्याला मिळतही नाही ! आणि हाच आनंद देत राहावा म्हणजे तो परत घेण्यासाठी आपली झोळी सदैव रिकामी राहते .
© हेमंत सदाशिव सांबरे
९९२२९९२३७० .
Email - camsambare@gmail.com

So true
ReplyDeleteखरच,आनंद हा मानण्यातच आहे .कोणाचा आनंद कशात असेल ते सांगता येत नाहि .
ReplyDeleteखूप छान लिहिल आहे.
ReplyDeleteAwesome, wonderful. आनंदाची निर्मिती आनंद देऊन,घेऊन आणि कशी वृद्धिंगत करावी हे सांगणारा लेख. Go on writing.
ReplyDeleteआपल्या व्यासंगाचे मनापासून कौतुक !
ReplyDeleteखूपच सुंदर लेख.
ReplyDeleteबऱ्याचवेळा आपण इतरांबरोबर तुलना करतो आणि दुःखी होतो