श्री रामजन्मभूमी शिलान्यास निमित्त
गेल्या कित्येक पिढ्या , कित्येक वर्षं ज्या क्षणाची कोटी कोटी हिंदूंनी वाट पाहिली , तो सुवर्णक्षण तुम्हा आम्हा सर्वांच्या आयुष्यात उद्या येत आहे .. आपण , आपली ही पिढी खरेच भाग्यवान आहे की याची देही याची डोळा आपण पुन्हा रामजन्मभूमी च्या जागी राममंदिर उभारलेले आपणास बघण्यास मिळत आहे ..पण हे घडण्यासाठी कित्येक पिढ्या झटल्या व हुतात्मे ही झाले ..त्यांचे उपकार आपण कधीच विसरू नये .
ज्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाने उभ्या आयुष्यात कुणावर अन्याय होऊ दिला नाही , त्या प्रभू श्रीराम यांची जन्मभूमी मात्र परतंत्र होती जी आता नुसती मुक्त झाली नाही तर तिथे आता भव्यदिव्य राममंदिर उभे राहत आहे ..हा आनंद तुम्ही आम्ही सर्वांनी नक्कीच खूप उत्साहाने साजरा करायचा आहे ..यानिमित्ताने सुचलेल्या काही *काव्य ओळी* प्रभू श्रीरामांच्या चरणी 🙏
आला हो आला
सुदिन तो जवळी आला
राममंदिर भूमीपूजनाचा
बोला जन हो तुम्ही बोला
जय श्रीराम जय जय श्रीराम बोला
कोटी कोटी हिंदू मनांची
आस फळास आज आली
स्वप्न जे होते आम्ही बाळगले
ती इच्छा आज पूर्णत्व झाली
चला आपण सारे चढवूया
प्रिय रामास मनपुष्पमाला
आला हो आला ......
किती लढले, किती झाले हुतात्मे
हा क्षण लाभण्या , झटले पुण्यात्मे
अवघी अयोध्या आज सजली
जन्मभूमी प्रभू श्रीरामांची नटली
चला भक्तहो चला सारेजण चला
आला हो आला .........
सरला तो आता दुःख काळ
उगवली पाहा नवीच सकाळ
उभारु आता उंच गुढ्या-तोरणे
रांगोळी काढू दारी आता त्वरेने
दिवाळीआधीच आली दिवाळी
सुखाचा तो क्षण अखेर आला
आला हो आला ......
© हेमंत सांबरे
०४.०८.२०२० .
जय श्रीराम 🙏🚩
ReplyDeleteजय श्रीराम...
ReplyDeleteजय श्रीराम
ReplyDeleteश्री राम जय राम जय जय राम
ह्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजां पासून अनेक मराठा वीर झगडले पण यश येत नव्हते पण आता साध्य झाले
ही सर्व प्रभू रामचंद्राचीच किमया
धन्यआहे
जय श्रीराम !!
ReplyDelete