वेसण-कविता

 खरे तर आपण बैलाला जी वेसण घालतो, हा विषय आमच्या एका कवी मित्रांच्या ग्रुपवर दिला होता , पण मला जे सुचले ते मला थोडे अध्यात्म च्या मार्गाने  कवितेला घेऊन गेला , आवडली तर नक्की सांगा ..

*वेसण* 


चंचल , दुबळे , मुक्त-मोकाट माझे मन

घालावी कशी बरे त्यास वेसण ? 


खोट्याचा सदा धरला लोभ , 

नात्यांचा न सोडला कधी मोह 

भोगूनी झाले सारेच आता भोग

मोकाट  षड्रिपु, जडले बहू रोग

किती जरी गोंजारली ही तनू

मनाचे परी त्या कैसे पुसतील व्रण? 

घालावी कशी बरे , या मनास वेसण?


संसारी गेला असा बराच हा काळ

हिंडलो शोधीत मी असा रानोमाळ

परी नच भेटला तो कृष्ण-गोपाळ

अंतरी जो दडला , बाहेरी कसा तो भेटेल पण? 

घालावी कशी बरे ,या मनास वेसण?

© हेमंत सांबरे

२३.०८.२०२०

ग्रुप - काव्यसरस्वती

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर