मन
मी इंजिनिअरिंग च्या तिसऱ्या वर्षी असताना ही कविता केली होती .आपले मन म्हणजे काय व ते कसे काम करते ते खरे तर कुणीच सांगू शकत नाही .पण कवीला तशी काही बंधने नसतात ..एका कवीच्या नजरेतून मनाबद्दल मांडण्याचा प्रयत्न केला आहे 👇👇👇
मना तू आहेस किती मोठा
मना तू कधीचा सूक्ष्म धाकटा
मना तू होशी
कधी कोमल,
कधी आतून
आहे शीतल
मना तू उधळावी
सुखाची अत्तरे,
तूच कधी फाडावी
दुःखाची लक्तरे
मना तू व्यापिला
विश्वाचा पसारा,
दुर्बल तनूत कसा
मावलास सारा
मना तू होशील कधी माझा आरसा
माझ्या भविष्याचा तू एकच वारसा
३१/१२/२००२.
©हेमंत सांबरे
Comments
Post a Comment