हे माती..

आपल्या मातृभूमी चे आपल्यावर अनंत उपकार असतात , ते आपण कधीच फेडू शकत नाही . ही मातृभूमी सतत आपल्याला देतच राहते व आपणही हक्काने घेत राहतो व बहुतेक परतफेड करायची असते ते ही विसरून जातो ..तेच या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे ..

हे माती ...

हे माती,
आम्ही जेव्हा आलो जन्माला
भरभरून श्वास घेतला तुझ्या सुगंधाचा
आणि मग खेळू लागलो तुझ्या उरावर...
मुक्तपणे  बागडत
तेव्हा अर्थ नव्हता कळत
तुझ्या प्रेमाचा...
तेव्हा फक्त उपभोगच घेतला
तुझ्या सुगंधाचा , सहवासाचा 
आता तो कळू लागला आहे 
पण वेळ निघून गेल्यावर!

हे माती,
आम्ही मेल्यावर एकच कर 
विल्हेवाट नको लावू एकसारखी
देहाची अन त्यावरील फुलांची
त्या मृत हाडकांना दे 
नवजीवनसंजीवनी 
पुन्हा तुझ्याच कुशीत खेळण्यासाठी ! 
© हेमंत सांबरे 
०२.०१.१९९९
( जुनी आहे कविता , त्यावेळी सकाळ पेपरमध्ये छापून आली होती ,कात्रण सापडत नाही ,  पण माझ्या जुन्या डायरीतून वाचकांसाठी )👍

Comments

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर