विरहगीत पापणी
सात अक्षरी ओळ असलेली कविता
प्रियकराला प्रेमात धोका मिळाला आहे , प्रियकराला रोज तिची आठवण येते , पण प्रेयसी मात्र त्याला विसरून गेली आहे , असा मामला आहे
विरह गीत
एक दीर्घ उसासा
एक जड पापणी
वाऱ्यावर विरली
दर्द भरी विराणी
माझे सुख बोचरे
तुझे दुःख साजरे
ओली का ही पापणी
डोळा का वाहे पाणी
हे मन वाट पाही
जरी तू पूर्वीची नाही
जळे पापणी रोज
सांगे जुनी कहाणी
© हेमंत सांबरे
०९.०८.२०२० .
Comments
Post a Comment