आईस आठवताना

 तुझी आठवण जातच नाही

 आई , आई मनातून माझ्या |

कितीतरी सुखद त्या स्मृती, 

तुझ्या संगती,अजुनी तशाच ताज्या ||


आई तू होतीस तेव्हा मज

वाटे राहावे तुझ्याच भोवती

तुझे शब्द अजूनही येति कानी

माझ्या सोन्या रे , माझ्या राजा

तुझी आठवण जातच नाही....


तुझें प्रेम, तुझा लळा अजुनी ,

अजुनी आहे माझ्या संगती

सुखे जरी हात जोडून आज उभी

आई तुजवाचून ,

 त्यात नाही उरली ती मजा 

तुझी आठवण जातच नाही..


आई अजूनही होते खूप 

होते बरेच काही बोलायचे 

त्याआधीच आई, का दिली ही

तुझ्या विरहाची घोर सजा ?

तुझी आठवण जातच नाही...

Comments

  1. आईविषयी खूप सुंदर भावना व्यक्त केलीत.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर