कन्या घरात आली
मुलगी असावी अशी आम्हा दोघांची खूप इच्छा होती आणि ती आज फलद्रूप झाली , त्यानिमित्ताने मनात ज्या भावना होत्या त्याच खालील प्रमाणे व्यक्त करतो
*कन्या घरास आली*
जे जे होते मनी योजिले
ते ते तसेची घडवीले
देवा तुझे शतशः आभार
हवे तैसे तू दान पाडिले
कन्या हवी होता अट्टाहास
तीच इच्छा फळास आली
श्रीरामा, धन्य कृपा झाली
कन्या आज घरात आली
कुणी म्हणते मुलगी म्हणजे
असते बरे ती धनाची पेटी ,
पण मज मिळाले, जुने बंध ,
जुळून आल्या जुन्याच गाठी
Nice Thoughts
ReplyDeleteखूप छान .
ReplyDelete