क्षण क्षण , कण कण
सुखाचे हे क्षण न क्षण
वेचुया सारे कण कण
*आनंदी* ठेवू या हे मन
त्यांस ठेवूनी सदा प्रसन्न
मित्र होऊया सारेजण
ठेऊ थोरांचा सदा मान
देतच राहु दुसऱ्यास सदा,
त्यात असे सुखाची खाण
रात्र काय अन दिवस काय
येत राहाय अन जात जाय
सुख येता वा दुःख जीवनी
सम ठेऊ नेहमी दृष्टिकोन
© हेमंत सांबरे
२७.०९.२०२०.
Comments
Post a Comment