सैनिकाचे मनोगत!

देश माझा , मी देशाचा द्वैतभाव उरला नाही देशरक्षण हेच माझे काम सैनिक असे माझे नाम देशच असे माझा परमधाम स्वार्थाचा आता कुठलाही भाव उरला नाही देश माझा... दिवस असो व घन अंधार सदैव उभा मी चौकीदार ऊन ,वारा ,थंडी, पाऊस वादळ देशाप्रतीच चाले सदा तळमळ सोडूनि सारी सुखे व मोह आम्ही आमचेही राहिलो नाही देश माझा .. ( सीमेवर आपल्यासाठी सदैव उभे राहणाऱ्या व ज्यांच्या मुळे आपण दोन वेळा सुखाची भाकरी खाऊ शकतो त्या साधारण सैनिकाला ही कविता समर्पित 🙏) © हेमंत सांबरे ११.१०.२०२० .