सैनिकाचे मनोगत!
देश माझा , मी देशाचा
द्वैतभाव उरला नाही
देशरक्षण हेच माझे काम
सैनिक असे माझे नाम
देशच असे माझा परमधाम
स्वार्थाचा आता कुठलाही
भाव उरला नाही
देश माझा...
दिवस असो व घन अंधार
सदैव उभा मी चौकीदार
ऊन ,वारा ,थंडी, पाऊस वादळ
देशाप्रतीच चाले सदा तळमळ
सोडूनि सारी सुखे व मोह
आम्ही आमचेही राहिलो नाही
देश माझा ..
( सीमेवर आपल्यासाठी सदैव उभे राहणाऱ्या व ज्यांच्या मुळे आपण दोन वेळा सुखाची भाकरी खाऊ शकतो त्या साधारण सैनिकाला ही कविता समर्पित 🙏)
© हेमंत सांबरे
११.१०.२०२० .
प्रणाम ll जय हिंद ll
ReplyDelete🙏 🙏 🇮🇳 🇮🇳