जिथे भेटते धरणीस आकाश
अजूनही आहे तसा अवकाश
येशील बरे तू हळू अन सावकाश
भेटू बरे आपण त्या क्षितिजावर
जिथे भेटते रोज धरणीस आकाश
वाटेस जिथे भेटते नागमोडी वळण
मग अवचित होई सुरू एक उभी चढण
भेटू बरे त्या वाटेवर , त्या वळणावर
जिथे भेटते रोज धरणीस आकाश
अजूनही सांज प्रिये कुठे तरी ढळली
क्षितिजावर आहे अजूनही तीच लाली
भेटू बरे त्या सांयकाळी,रम्य वेळी
ज्यावेळी भेटते रोज धरणीस आकाश
मस्तच
ReplyDeleteछान
ReplyDelete