प्रवास
हा स्वतःला शोधण्याचा प्रवास तसा आयुष्यभर चालूच असतो , आणि तो पूर्ण होईल की नाही ते ही माहीत नाही .कवीने या जीवनप्रवास वाटेतील भावना खालील शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे 👇👇👇👇👇👇👇👇
मीच मला शोधण्याचा प्रवास
अनंतात खोल डोकावताना
आता सापडले पाहिजेच काही
दिवस गेला मग् रात्रीमागून रात्री,
अंधारात डोळे फाडफाडून बघेल
जरीही प्रकाशाची एक तिरीप नाही
मीच मला शोधन्याचा ...
खाचखळगे अन वेडीवाकडी वाट
संपेल च ना चढण, अवघड घाट
जरी उताराची उरली आशा नाही
मीच मला शोधण्याचा ..
दाही दिशांचा फिरु लागला भोवरा
खोल दरी, अन वर अनंत आकाश
माझ्याच मनाचा उरला ठाव नाही
मीच मला शोधण्याचा...
१६.११.२०२०
© हेमंत सांबरे
शब्दांकन, मस्तच 👌👍
ReplyDelete