सुटका
प्रत्येकालाच हवी असतेच सुटका
वाटते स्वतःसाठी जगावे,
घालवावी स्वतःपाशीच,
एकतरी घटका
आपल्यांचे मोहपाश,
परक्यांचा तिरस्कार
जसे दुःख बोचते
अती सुखही टोचते
जागे व्हावे का यातून?
देऊनी स्वतःलाच चटका !
प्रत्येकालाच हवी असते सुटका...
स्पर्धा तशी काटेकोर, सक्त
धावणेच असे उरले फक्त
तुलनेचा तो राक्षस भयंकर
मज उभा-आडवा गिळणार
यावे का बाहेर यातून?
देऊनी स्वतःस एक फटका!
प्रत्येकालाच हवी असते सुटका...
क्षण मग तो आलाच घेऊनि,
दृढनिश्चय या मनात
झुगारुनी सारी आता बंधने
सुरू झाले ते स्वच्छंदी जगणे
सोडूनिच दिला बहाणा लटका !
प्रत्येकालाच हवी असते सुटका...
© हेमंत सांबरे
०५.१२.२०२०.
Comments
Post a Comment