जगत जननी

 हा एक साधाभोळा भक्त आहे , तो खरे तर काही मागण्याच्या इच्छेने देवीकडे निघाला आहे  ,पण जेव्हा देवीचे खरोखर दर्शन झाले तेव्हा  हा भक्त नुसत्या देवीच्या दर्शनाने तृप्त झाला आहे व काही मागण्याची त्याची इच्छाच  राहिली नाही कारण त्याला जाणीव होते की देवीने आपल्यास सर्व काही दिले आहे  👇👇👇


 *जगतजननी जगन्माता 

आई माझी अंबामाता 


आई तुझ्या रूपे लाभली

कल्पवृक्षाची गे साऊली 

तव दर्शनाची आता लागे

आस या भक्ता माऊली 


माय भवानी , माय अंबिका 

पुण्यधाम , लाभे तुझ्या चरणी

तुझ्या दर्शनाने गे जगदंबे 

आयुष्य लागले सत कारणी


मिळाले तुझे दर्शन माते,

भरून पावलो सारे काही

तृप्त झाले मन ,वाटे निवांत

नाही मागणे उरले  काही


© हेमंत सांबरे

२०.१२.२०२० .*


Comments

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर