Posts

Showing posts from February, 2021

#समाजक्रांतिकारक सावरकर

Image
#समाजक्रांतिकारक सावरकर    { या लेखात अनेक नव्या गोष्टींचा उहापोह केला आहे , आपणास नक्की आवडेल याची खात्री आहे }  "सावरकर समजून घेताना "या लेखमालेची सुरुवात मागच्या वर्षी २८ मे ला सावरकर जयंती च्या निमित्ताने झाली . या लेखमालेचा उद्देश वीर सावरकर लोकांना अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगणे व वीर सावरकरांचे *तेजस्वी* व *कालातीत* विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविणे हा आहे .या लेखमालेतील पहिल्या लेखाला गेल्या आठ महिन्यांत संपुर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला , अनेकांनी स्वतः फोन करून लेख आवडल्याचे सांगितले , फेसबुक , तसेच माझ्या ब्लॉगवर खूप उत्तम प्रतिक्रिया मिळाल्या .यावरून परत एकदा जाणीव झाली की घराघरात सावरकर चरित्र पोहोचणे खरेच गरजेचे आहे . महापुरुष हे द्रष्टे असतात ,  काळाच्या पुढे जाऊन ते विचार करतात .वीर सावरकर हे असेच दूरदृष्टी असलेले महान व्यक्तिमत्त्व होते .त्यांना खरेतर जास्त करून एक थोर क्रांतिकारक नेते म्हणून ओळखले जाते ,पण त्यांच्या आत एक *समाजसुधारक* ही होता , ज्याबद्दल जनमानसात फारसी माहिती पुढे आलीच नाही .आपण आज पुरोगामी हा शब...