Posts

Showing posts from March, 2021

बाबा , मला तुमच्यासारखे कधीच नाय व्हायचं

 *बाबा , मला तुमच्यासारखे कधीच नाय व्हायचं !*  अगदी जेव्हापासून कळू लागले ना! हो अगदी तेव्हापासून मी नेहमी म्हणायचो , बाबा , मला तुमच्यासारखे कधीच नाय व्हायचं !  तुम्ही खूप साधे (कदाचित गबाळेच म्हणा) राहायचे , अगदी साध्या साध्या गोष्टींवर खर्च करताना ,सतत नाही म्हणायचे !  म्हणूनच मी  नेहमी म्हणायचो  बाबा , मला तुमच्यासारखे कधीच नाय व्हायचं !  तुमची प्रत्येक कृती मला चुकीचीच वाटायची! तुम्ही लावत असलेली शिस्त मला खूप कडक वाटायची !   म्हणूनच मी नेहमी म्हणायचो  बाबा , मला तुमच्यासारखे कधीच नाय व्हायचं !  तुम्ही नोकरी करताना खूपच प्रामाणिक होता! तुम्ही कधीही तत्व सोडले नाही , म्हणूनच तर आपण गरीबच राहिलो! म्हणूनच मी नेहमी म्हणायचो  बाबा , मला तुमच्यासारखे कधीच नाय व्हायचं !  आज मी आता बाबा झालोय ! तसे बाबा! खूप साऱ्या प्रश्नांचे मोहोळ उठलेय सभोवती ! तुम्ही अनेकांचे आदर्श झाला होतात! मला आज निदान माझ्या मुलांचे तरी  आदर्श होता येईल का खरंच ? नक्की सांगता येत नाही ! आज मी तुमच्या भूमिकेत आलोय! तरीही अजून मी तेच का म्हणतोय...