आईला आठवताना!
आईला आठवताना
आईला आठवताना
खरे तर मला काहीच कळत नाही ...
डोळ्यांत येणारे पाणी आठवणी रोखून धरू शकते का ?
की मग डोळ्यांतून येणाऱ्या पाण्यातून ..
हळूहळू आठवणी गळू लागतात ..
तसे तिची येणारी आठवण म्हणजे तिच्या जगातून अचानक निघून जाण्याचा सल की अजून काही ...
आईला आठवताना
खरे तर मला काहीच कळत नाही ....
रिकाम्या वेळी मन मला समजावू पाहते तिचे शारीरिक नसणे माझ्या आसपास...
पण त्याचवेळी तिच्या आशीर्वादाचे हात फिरतात माझ्या केसांतून ..
मग मी मनाला लागतो समजावू !
बाबा रे आई माझी अजून कुठे रे गेली ? तिचा वावर आहेच की माझ्या जगण्यात ...
तिच्या दुःखाचे काटे असायचे खूप टोकदार ...
पण तिने फक्त फुलेच दिली आम्हाला वाटून ....
चांगलेच व्हावे प्रत्येकाचे ही तिची देवास कायमची प्रार्थना ...
मनाची शुद्धता हाच होता तिचा खरा दागिना ...
आईला आठवताना
खरे तर मला काहीच कळत नाही ...
आईला आठवताना
खरे तर मला काहीच कळत नाही ...
०७/०५/२०२०
Comments
Post a Comment