*प्रतीक्षा* ( कविता )

*प्रतीक्षा*
 
मी उभा कधीचा इथे
करीत तुझी प्रतीक्षा
वाट बघणे सदैव तुझी
हीच  का मम् भाळी शिक्षा 

 
तुझी वाट पाहणे 
होई वेदनादायी
तुझ्याविना विचार
दुसरा मनी नाही 
ये तू सत्वरी आता
संपवुनी ही परीक्षा || १ || 

तुझ्या सहवासाची
लागली मज ओढ
न येण्याचा हा तुझा , 
हट्ट आता प्रिये सोड
आतुरले बघ मन माझे
संपली आज तितीक्षा ||२ ||

Comments