*आई* - *बाप* *हेच* *खरे* *देव* !
*आई* - *बाप* *हेच* *खरे* *देव* !
आयुष्यात पुढे जाताना काही गोष्टी चे महत्त्व नव्याने जाणवते . विशेषता ज्याचा अनुभव आपण स्वयं कधी घेतला नाही तो जर आपल्यास आल्यास तरच ते पटते. सुख-दुःख यांच्या व्याख्या बदलत जातात , पन काही गोष्टी शाश्वत म्हणून आहेत आणि त्या आपल्या पुढे येतात .प्रत्येकाच्या श्रद्धा वेगळ्या असतात. आपन सगळे काहीतरी सतत शोधतच असतो , जे आपल्याला पूर्वी पेक्षा जास्त सुख देईल . देवाचे अस्तित्व खरे की खोटे , देव खरच आहे का हे कुणी छातीठोक पने सांगू शकते का? मला स्वतःला असे वाटते की आपले आई-बाप हेच खरे देव आहेत . कारण त्यांनी आपल्याला जन्म दिला , मोठे केले , शिकविले या जगात राहन्याच्या योग्य बनविले . आयुष्यभर आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या , आपल्याला मोठे केले .हे सर्व आपल्यासमोर प्रत्यक्ष घडते ,याला अजुन वेगळा पुरावा कशाला हवाय? पन जो मंदिरात देव बसला आहे त्याने आपल्यासाठी प्रत्यक्ष काय असे केले आहे का ? ती एक पाषाण मूर्ति आहे ज्याची अपन पूजा करतो , पन आयुष्यात आई बापाच्या रूपाने प्रत्यक्ष देवच आहेत त्यांचा आपण प्रचंड आदर केला पाहिजे . त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे . विशेषता ते जीवंत असतानाच त्यांच्यासाठी जे काही करता येईल ते केले पाहिजे .कारण मनुष्य या जगातुन गेला की फक्त त्याच्या आठवणी आणि कवित्व उरते ,करायच्या राहून गेलेल्या साऱ्या गोष्टी आठवत राहतात . असे म्हणतात की स्वता मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तसेच बऱ्याचदा स्वता आईबाप होत नाही तोपर्यंत आई बापाचे महत्व कळत नसते . आपल्या मुलांच्या समोर वागताना आईबापा ची आठवण येत राहते .
त्यामुळेच आई बापा ला सोडून दुसरीकडे देव शोधला तरी तो कधीच प्राप्त होणारच नाही . आई वडील हेच हाड़ा मासाचे देव आहेत , ज्याना आपण स्पर्श करु शकतो , ज्याना कड़कड्डून मीठी मारू शकतो , त्यांच्या
निरपेक्ष प्रेमाचा अनुभव घेऊ शकतो . या जगात जे काही उत्तम आपणास मिळते ते त्यांच्या मुळेच आहे , हे कधीही विसरून चालणार नाही . बाकी देवघरात बसलेल्या देवाने प्रत्यक्ष मला कुठे काय दिले आहे ? मी त्याचा प्रत्यक्ष अनुभव कधी घेऊ शकतो का? मग मी अशा निर्जीव अनुभवाला प्रत्यक्ष प्रमाण कसा मानु ?
( हा छोटा लेख म्हणजे माज़े वैयक्तिक मत आहे , कुणालाही दुखविन्याचा हेतु नाही , मात्र पटल्यास पुढे पाठवा ही विनंती )
© हेमंत सांबरे
१६.०३.२०१९.
Comments
Post a Comment