*एक* *अदभूत* *संवाद*

*एक* *अदभूत* *संवाद* 

( डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा ) . 

ही अलिकडचीच घटना आहे . मी बसने प्रवास करत असताना माझ्यासमोर झालेला हा संवाद आहे 

बसमध्ये माझ्याशेजारी दोन जण बसले होते , त्यांच्या बोलण्यावरून ते खूपच जवळचे मित्र असावेत असे दिसले  , कारण मधेच खूप जोरजोरात बोलणे , हसणे व एकमेकाला टाळ्या देणे चालू होते. वेगवेगळ्या विषयांवर त्यांचे बोलणे चालू होते व काही जोक ही सांगत होते . दोघेही well educated वाटत होते  मराठी तसेच इंग्रजी त ही बोलत होते . बोलता बोलता  मधेच त्यांच्यात एका वेगळ्याच विषयावर बोलणे चालू झाले , जे मला एका वेगळ्याच जगात घेऊन गेले  जे मला वाटले , आपल्या समोर ठेवावे  . आता जास्त लेखकीय भाषा न वापरता त्यांच्यातला संवादच  इथे सांगतो .

पहिला तरुण - म्हणजे जावेद तुला काय म्हणायचे आहे आमचा हिंदू समाज ढोंगी आहे ? काय बोलतोस तू ? 
दुसरा तरुण - हो मंगेश , i am sure about my statement .
आता आपण या संवादात या दोघांची नावे उल्लेख करूनच पुढे चालू ठेवू . 
मंगेश - जावेद तू जे बोलतोस त्याला proof दे 
जावेद -  हे बघ मंगेश , स्वतःच्या धर्माचा व संस्कृती चा अभिमान असणे यात काय चूक ? आता हेच बघ आम्ही मुस्लिम अतिशय कट्टर पणे नमाज करतो , रमजान मध्ये रोजा अतिशय कडक करतो , पण याच वेळी तुमच्याच हिंदू समाजातील काही जण स्वतःच्याच देवांना नावे ठेवतात , तुमच्यातील थोर साधू -संत यांच्या चुका काढतात ? याला काय म्हणायचे ? 
मंगेश - हे लक्षात ठेव जावेद आपला भारत देश सेक्युलर आहे , इथे सर्वाना वेगवेगळे विचार ठेवण्याचा अधिकार आहे . आणि जर हिंदू कट्टर झाले तर देशात वाद निर्माण नाही होणार का ? 
जावेद ( थोडेसे हसून ) - मंगेश मला हेच म्हणायचे आहे , हा जो सेक्युलर पणाचा बुरखा तुम्ही घालून फिरता तेच खूप मोठे तुमचे ढोंग व खोटारडेपणा आहे . उलटे तुम्ही जेव्हा जेव्हा हे सेक्युलर -सेक्युलर म्हणता ना आम्हा मुस्लिम समाजाला तुमचा जास्त doubt येतो . कारण आम्ही तसे नसतो , आम्ही कुणालाही उगाच खुश करायला आमचे  धार्मिक विचार किंवा आमचा कट्टर पना कधीही बदलत नाहीत आणि मग तुम्ही हिंदू का बदलता ?  आणि खरे तर तुम्हीही तो का बदलावा ? 
मंगेश - पण जावेद सहिष्णुता म्हणजे काय मग ? 
जावेद - अरे मंगेश ह्या सहिष्णुता च्या नावाखाली तुम्हाला फसविले जातेय ?हेच राजकारणी फक्त हिंदू कडूनच त्याची अपेक्षा ठेवतात जेव्हा आमची वेळ येते तेव्हा ते म्हणतात अरे मुस्लिम समाजाला हे नियम लागू होत नाहीत . आमच्या बाबतीत लगेच सांगतात की त्यांचा धर्म त्यांना हे allow करत नाही . तुमच्या डोळ्यावर ही पट्टी एव्हडी बसली आहे की तुम्हाला सत्य दिसतच नाही . 
मंगेश - म्हणजे आपला धर्म पाळण्याच्या बाबत कट्टर असणे म्हणजे दुसऱ्या ला दुखावणे असे होत नाही का ? 
जावेद - आम्ही मुस्लिम समाज सगळ्या गोष्टी कट्टरतेने पाळतो की नाही ? मग तुम्हाला त्याने काय फरक पडतोय ?
मंगेश (थोडा विचार करून) - नाही खरेतर काहीच नाही . उलट आमच्यातले कित्येक तुमच्यातील या धार्मिक एकीमुळे तुमचा respect च करतात . म्हणजे मी ही करतो . 
जावेद - वा मंगेश , मग याच प्रमाणे जर एखादा हिंदू जर त्याच्या धार्मिक आचार विचार याबाबत कट्टर असेल तर आम्ही मुस्लिम त्याचा ही respect करु की नाही ? 
मंगेश - yes logically ok च वाटतेय . 
जावेद -हीच सत्य परिस्थिती आहे मित्रा . कुणीही सांगितले म्हणुन आम्ही मुस्लिम आमचा धर्म व त्यातील विचार सोडू शकत नाही ,  तसेच तुम्ही ही सोडले नाही पाहिजे . बाकी सेक्युलर  , सहिष्णुता वगैरे खोटे शब्द आहेत .

पण गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्हा हिंदू समाजाला  या सहिष्णुता च्या चुकीच्या गोष्टी लहानपणापासून शिकविल्या जातात आणि मग मोठे झाल्यावर तुमचा त्यावर अढळ विश्वास बसतो व तुम्ही त्यातून बाहेर येऊच शकत नाही . याउलट आम्हाला शिकविले जाते . तुम्ही स्वतःच्याच परंपरा , संस्कृती यांचा अभिमान बाळगत नाही तर इतर ते बाळगतील असे कसे शक्य होईल ? तुमच्यातील कित्येक जण या महान हिंदू संस्कृती च्या विरोधात बोलणार व कित्येक तुमच्यातील त्यांच्या मागे पळणार ! तू आम्हा मुसलमानांना कधी बघितले का उघडपणे स्वतःच्या धर्माच्या विरोधात बोलताना ? आमच्यातील चुकीच्या गोष्टींना अंधश्रद्धा म्हणताना ?  फार कमी दिसेल तसे . 
मंगेश -  म्हणजे जावेद चुकीच्या गोष्टी correct नाही करायला पाहिजे का ? 
जावेद-  नक्कीच करायला हव्यात . पण इतर धर्म तुमचा respect तेव्हाच करतील जेव्हा तुम्ही हा  सेक्युलर पणाचा ढोंगीपणा सोडून देनार . म्हणजे मला एव्हढेच सांगायचे की तुम्हीही तुमच्या धर्माचे पालन करा जसे आम्ही करतो आणि यामुळेच आपण दोघेही पुढे जाऊ  .
हा सगळा संवाद चालू असताना माझा बस स्टॉप आल्याने मी बसमधून उतरलो . या दोघांच्या संवादातील बऱ्याच गोष्टी मनमोकळे पणाने बोलल्या गेल्या होत्या . मलाही काही पटल्या , काही नाही . 
पण असो पण माझ्या काही पूर्वीच्या विचारांना मात्र चांगलाच धक्का बसला .

Comments

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर