स्वच्छतेचा हा एकच नारा ( कविता )
स्वच्छतेचा हा एकच नारा
स्वच्छ करूया भारत सारा||धृ||
मतभेद सारे विसरुया
जातीभेद सारे विसरूया
नव्या दमाचा नवउन्मेशी
नवभारताचा नवा वाहतो वारा ||१||
चला घेऊया एकच शपथ
रस्त्यावर मी थुंकणार नाही
कचरा ही फेकणार नाही
अंगी आमच्या आज संचारला,
नवनिर्मिती चा नवाच वारा ||२||
नवा भारत श्रेष्ठ भारत
स्वच्छ भारत सुंदर भारत
तुम्हा आम्हा सर्वांचा हाच एक
नभी घुमला तो मंत्र खरा ||३||
जसे आपले घर सुंदर असते
तसाच भारत स्वच्छ-सुंदर करूया
आता न मागे वळून बघणे
आता न मागे फिरून येणे
निश्चय मनी हा एकच करा ||४||
Comments
Post a Comment