कवितेचा जन्म कसा होतो ?

मला काय वाटते सांगू ? 
कविता येते आपल्या आतून

जसा जन्म आईच्या गर्भातून
फुल जसे उमलते कळीतून
तशीच यावी ती सहजपणे 
मला काय वाटते सांगू?......

नको उगा शब्दांची पळवापळवी
नको उगा असह्य जुळवाजुळवी
शब्द असे सहज यावे
 अलगद उतरावे कागदावर
मग त्यांनी बेशक राज्य करावे
जन- जनांच्या ह्रदयांवर
मला काय वाटते सांगू ?.....


कवी नसावा  कुणाचा ताबेदार
स्वतंत्र असावा त्याचा आविष्कार
लिहावे फक्त तेच ते
जे कवीच्या अंतरीचे 
त्याच्या मनीचे आर्त 
जे सहज अन उस्फुर्त
मला काय वाटते सांगू ? ...

१४.०४.२०२०.
© हेमंत सांबरे

Comments

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर