*डॉ बाबासाहेब आंबेडकर - स्टार प्रवाह - मालिका*

*डॉ बाबासाहेब आंबेडकर - स्टार प्रवाह - मालिका* 

सध्या आम्ही पूर्ण कुटुंबीय स्टार प्रवाह वर रोज रात्री ९ वाजता चालू असलेली डॉ बाबासाहेब आंबेडकर ही मालिका नियमित बघतो व माझा मुलगा अर्जुन सहित आम्ही सर्व डॉ बाबासाहेब या व्यक्तिमत्वाच्या *अक्षरशः* *प्रेमात* पडलो आहोत . खरे तर आजकाल आपण सर्वांचे वाचन तसे कमी झाले आहे , पण ही मालिका अतिशय योग्य वेळी आली आहे . काय जबरदस्त माणूस होते *बाबासाहेब* ! खऱ्या अर्थाने बाबासाहेब प्रचंड मोठे *देशभक्त* होते . या मालिकेमुळे त्यांचे अनेक पैलू पुढे येत आहेत , आणि आपण सारे फ़क्त त्यांना " *दलितांचे नेते "* व *संविधान* *निर्माते* एव्हढेच मानून वा केवळ  तशाच प्रकारे *प्रोजेक्ट* केल्यामुळे एका अतिशय *जबरदस्त* नेत्याच्या बाकीच्या गुणांकडे दुर्लक्ष करत आहोत असे मला मनापासून वाटतेय . खरेतर मी ही मालिका बघून डॉ आंबेडकर यांचे खालील गुण मला खूप महत्त्वाचे वाटतात ज्यातून संपूर्ण भारतीय समाजाने खूप शिकण्यासारखे आहे 
१ . जबरदस्त *आत्मविश्वास* 
२ . कुठलीही समस्या आली तरी *घाबरून* न जाता त्याला *तोंड* देण्याची वृत्ती 
३. ज्ञान प्राप्त करण्याची *प्रचंड* *तळमळ* . 
४ . ज्ञानाचा व्यवहारात कसा उपयोग करायचा याची *हातोटी* 
५ . स्वतःच्या विचार व कृती यावर *ठाम* कसे राहावे 
६ . आपल्याला काय करायचे याचे पक्के *नियोजन* 
आणि अजून बरेच काही......
खरेतर अजून पुढे मलाही बरेच शिकायला मिळेल असे वाटते . डॉ आंबेडकर म्हणजे एक अफलातून मनुष्य होते , त्यांच्या व्यक्तिमत्वाचे इतर ही अनेक कंगोरे आहेत आणि आज आपल्या देशाच्या भल्यासाठी त्यावर अजून बरेच *संशोधन* होणे गरजेचे आहे असे मला मनापासून वाटते आहे .
 *विकास* *देशमुख* हा अभिनेता ही भूमिका अक्षरशः जगला आहे . त्याने जीव ओतून काम केले आहे . तो आणि डॉ बाबासाहेब वेगळे वाटतच नाही इतका त्याने *जिवंत* अभिनय केला आहे .
तसेच ही मालिका बघताना कुठेही दुसऱ्या जातीबद्दल विनाकारण *द्वेष* जाणवत नाही की *कटुता* जाणवत नाही याबद्दल लेखक व दिग्दर्शक यांचे अभिनंदन 🙏

आता इथेच थांबतो व सर्वाना विनंती करतो संपूर्ण कुटूंबाबरोबर ही मालिका नक्की बघा , विशेषतः लहान मुलांसाठी तर पर्वणीच आहे खूप शिकण्याची!
© हेमंत सांबरे .

Comments

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर