वटवृक्ष
आज सकाळी फिरायला बाहेर पडल्यावर समोर एक विशाल वटवृक्ष आला आणि त्यास पाहून स्फुरलेल्या ओळी .....
तो पहा विशाल वटवृक्ष
उभा समोर
जणू की पुराणातील महान
ऋषि जसा
तटस्थ , ध्यानस्थ ,
आत्ममग्न व्रतस्थ ,
भासे मम् तो
असा किती शतकांचा
घोर तपस्वी
वटपारंब्या कशा लोळती
तव तनुभोवती
जटांचे केशसंभार ते किती
पुरातन भासती
शांत , चिरंतन , शाश्वत
तरी तू भासतो
किती कठोर
वाटे मज
भक्कम आधार ,
जरी न जाणो
किती शतकांचा तू
मूक साक्षीदार
०९.०२.२०२०.
Comments
Post a Comment