आईस माझ्या!
आईस माझ्या कुणी बोलू नका हो !
आईस माझ्या कुणी बोलू नका हो !
आईने माझ्या किती कष्ट साहिले
किती उन्हाळे , पावसाळे पाहिले
दिवस तिच्या सुखाचे आले हो
सुखास तिच्या कुणी दृष्ट लावू नका हो!
किती प्रेमळ माझी माऊली
सर्वांच्या सुखदुःख ची सावली
प्रेम देई सर्वास एकसारखे हो
प्रेमास तिच्या समजून घ्या हो!
आई माझी किती चांगली
आई माझी किती चांगली
किती दुःखे तिने भोगली
तिच्या दुःखाचे पापुद्रे कुणी सोलू नका हो !
आई जर या जगी नसती
आई जर या जगी नसती
तुम्हीच सांगा मजला मग
कुणी या जगी , या दुःखाचा
एव्हडा भार पेलला असता हो !
दुसऱ्यांची दुःखें घेऊन स्वह्रदयी
दुसऱ्यांस जी सदैव तत्पर हसवी
तिचे दुःखे तुम्हा का वाटे फसवी
तुम्हीच सांगा दुसऱ्यांस , फसविण्या का मग
ती आई झाली का हो !
Comments
Post a Comment