सावरकर यांचे हस्ताक्षरातील दुर्मिळ पत्र*
# *सावरकर यांचे हस्ताक्षरातील दुर्मिळ पत्र*
श्री राजोपाध्याय - जळगाव यांचे आभार 🙏
हे पत्र मला जळगाव येथे राहणारे
श्री राजोपाध्याय यांच्याकडून मिळाले .
श्री राजोपाध्याय यांनी माझा ' सावरकर यांचे वैयक्तिक आयुष्य व स्वभाव दर्शन ' हा लेख वाचून मला दूरध्वनी केला व त्यातून आमची ओळख झाली . सौ राजोपाध्याय यांचे वडील सावरकरांचे निस्सीम भक्त होते व त्यावेळी ते मुळशी येथे राहत . सावरकरांचे भाषण मुंबई वा पुणे येथे असताना ते आवर्जून जात व सौ राजोपाध्याय यांनी फोनवर बोलताना ही आठवण आवर्जून सांगितली व हे सांगताना त्यांना वडिलांच्या आठवणीने रडू कोसळले . त्यांच्या वडिलांना सावरकरांच्या जवळ जाऊन त्यांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले होते .
परवा श्री राजोपाध्याय यांनी मला हे पत्र पाठविले व त्यांनी यावर मी लिहावे असे सुचविले .
या पत्रात वीर सावरकर श्री परुळेकर यांच्या घरी थांबले होतें व जेव्हा ते मुंबईला परत पोहोचले तेव्हा त्यांनी हे पोहोच पत्र लिहले . यात सावरकर श्री परूळेकर व सौ परुळेकर या दोघांचेही आभार मानतात . यातून घरातल्या स्त्रीने जे कष्ट घेतले त्याबद्दल ते आभार मानतात , यावरून त्यांना स्रियांबद्दल आदर किती होता हे दिसते ( कारण बहुतेक वेळा स्रियांचे कष्ट/मेहनत डावलली जाते/दुर्लक्षित केले जाते ) .
तसेच श्री परुळेकर यांच्या वडिलांच्या काळात जसा पाहुणचार मिळायचा तसाच आत्ताही मिळाला व तुमच्या मुलाच्या काळातही मिळेल असा विश्वास सावरकर व्यक्त करतात .
महापुरुषांच्या छोट्या छोट्या गोष्टींतून असे खूप शिकायला मिळते !
{हे पत्र श्री राजोपाध्याय यांच्याकडे बऱ्याच वर्षांपासून आहे , पण ते कुठून मिळाले हे त्यांनाही सांगता येत नाही )
( अभ्यासू व्यक्तींनी या पत्रावर अजून प्रकाश टाकावा ही विनंती , म्हणजे त्यांच्या अभ्यासात अजूनही काही आले असेल वाचकांशी सांगावे )
धन्यवाद
हेमंत सांबरे .
Contact - 9922992370 .
Comments
Post a Comment