स्वातंत्र्यवीर सावरकर व समान नागरी कायदा!

वीर सावरकरांनी मांडलेला...      

   " *समान नागरी कायदा* " 

वाचकहो ! 
आतंरराष्ट्रीय राजकारण , देशहित  , राष्ट्र संरक्षण  याबाबतीत वीर सावरकर  यांचे ज्ञान व आकलन काळाच्या  खूप पुढे होते , त्यामुळे त्यांचे विचार वाचणे व त्याचा अवलंब ( Follow ) करणे हे आता त्वर्य ( urgent ) झाले आहे . 

म्हणूनच एका महत्त्वाच्या विषयावर सावरकरांचे विचार काय होते हे पाहणे खूप गरजेचे आहे . 

 

हा खालील मसुदा (Draft ) आज आपण ज्याला समान नागरी कायदा तसेच  जनसंख्या नियंत्रण कायदा आला पाहिजे असे म्हणत आहोत ,  त्याच्या काही पावले पुढेच आहे असेच म्हणावे लागेल .

यावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांची दूरदृष्टी , देशाला काय योग्य याबद्दलची अचूक व सूक्ष्म जाण कशी होती  हे वाचकांच्या लक्षात येईल . 👇👇

सावरकरांना कसा भारत वा हिंदुस्थान हवा आहे , ते त्यांनी अगदी मुद्देसूद पणे मांडले आहे ते असे - 

 *_सावरकरांचा मसुदा_* 

१ . जे नागरिक भारताशीस पूर्ण एकनिष्ठ राहतील अशा सर्व नागरिकांना जाती ,पंथ , वंश किंवा धर्म याचा विचार न करता _समान अधिकार व समान कर्तव्ये_ राहतील . ( फक्त अधिकारच नाही तर कर्तव्येही समान  ) 
२ .आपली भाषा , धर्म , संस्कृती इ चे रक्षण करण्यासाठी , सर्व अल्पसंख्याक जमातींना परिणामकारक संरक्षण दिले जाईल .पण त्यापैकी कोणाही जमातीला स्वतःचे राज्य निर्माण करू दिले जाणार नाही किंवा बहुसंख्य लोकांच्या हक्कावर अतिक्रमण करू दिले जाणार नाही . ( खूपच महत्वाचा मुद्दा ) 
३ . प्रत्येकास भाषण, मत , धर्म याचे स्वातंत्र्य .  कठीण परिस्थितीत जे बंधने घातली जातील ती सर्वांना सारखी असतील ज्यात *देशहित प्रथम* व *धर्म किंवा जात* नंतर राहील . ( इथे आजच्या कोरोना काळाचा संदर्भ आपण घेऊ शकतो , कारण आज ही राष्ट्रीय आपत्ती असल्याने सर्वांनी सारखीच बंधने पाळणे गरजेचे आहे ) 
 ४ . एक माणूस एक मत 
५ .  संयुक्त मतदारसंघ 
६ . नोकऱ्या केवळ *गुणवत्तेच्या* आधारे दिल्या जातील .
७ . प्राथमिक शिक्षण *विनामूल्य* व *सक्तीचे* .
८ . शेषाधिकार सर्व केंद्र सरकारच्या ताब्यात .
९ .भारतात नागरी ही राष्ट्रीय लिपी , हिंदी राष्ट्रभाषा , संस्कृत ही देवभाषा राहील .
१० .अल्पसंख्याक स्वतःच्या मातृभाषेत शाळा काढू शकतात, पण यासाठी जी मदत सरकारकडून मिळेल ती त्यांनी भरलेल्या कराच्या प्रमाणात असेल ( हा विचार किती *तर्कशुद्ध*- Logical  आहे हे लगेच लक्षात येते ).

{ हे वरील दहा मुद्दे परत वाचा , आपणास लक्षात येईल की हे सर्व  आपल्या भारत देशाच्या किती हिताचे आहे , व यांस सर्वच राष्ट्रभक्त पाठींबा देतील ) 

याशिवाय संप , ताळेबंदी , शेतकरी व कामगार यांच्या संदर्भातील त्यांचे विचार आजच्या काळातही किती *अचूक* लागू आहेत ते इच्छुक वाचकांनी सोबत जोडलेल्या पानांमध्ये जरूर वाचावे . 



(संदर्भ - स्वातंत्र्यवीर सावरकर - धनंजय कीर ) 
© हेमंत सांबरे 
9922992370 . 
(या लेखासोबत मूळ draft जोडत आहे , इच्छुक वाचकांनी नक्की बघा )

Comments

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर