(एक काल्पनिक पत्र ) स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदू मुलीच्या वडिलांस पत्र !
( एक काल्पनिक पत्र )
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदू मुलीच्या वडिलांस पत्र !
(पत्र पूर्णपणे काल्पनिक आहे.. वीर सावरकर हे हिंदुहृदयसम्राट आहेत , त्यामुळे त्यांना हिंदुहिताची सगळ्यात जास्त काळजी ही होती , त्या अनुषंगाने आत्ताच्या परिस्थितीत त्यांनी काय सांगितले असते ही कल्पना करून लिहले आहे , अर्थातच भाषा माझीच आहे , सावरकरांचे लिखाण थोर होते , मी फक्त कल्पना केली आहे , आपणास हे आवडल्यास , जास्तीत जास्त पालकांना हे पाठवा 👍)
{ A Letter by Swatantryaveer Savarkar to Father of Hindu Daughter}
प्रिय बाबा ,
सप्रेम नमस्कार 🙏
मी विनायक दामोदर सावरकर ! मी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला व माझ्यासारख्या इतर ही अनेकांनी घेतला होता . पण त्याबरोबर मी सवंग व सहज मिळणाऱ्या लोकप्रियतेचा बळी देऊन देशाच्या हिताची चिंता असल्याने आयुष्यभर हिंदूंचा पक्ष घेतला .त्या अधिकारानेच मी आपणाशी काही चर्चा करणार आहे ,
" _कारण तुम्ही एका हिंदु मुलीचे पिता आहात ! "_
बाबा मला तुमच्याशी एक मुक्त संवाद साधायचा आहे ..मला माहित आहे आजकालची मुले किंवा मुली सहसा आईबापाचे ऐकत नाही ..पण मला वाटते तुम्ही प्रयत्न करा व सांगा आपल्या मुलीस -' की तू म्हणजे हिंदू धर्म व हिंदू संस्कृतीचा खरा आधारवड आहेस ' , तिला हे ही सांगण्याचा प्रयत्न करा की , ' मुली , तू स्वतःला कुठेही कमी समजू नकोस व आधुनिक जे जे काही आहे ते सारे आत्मसात नक्कीच कर , पण त्याचवेळी आपले मूळ विसरू नकोस व या महानतम् संस्कृतीचा अभिमान कसा बाळगावा हे ही तिला शिकवा ' बाबा कदाचित हे तुम्हाला कठीण जाईल पण बाबा हे फक्त तुम्ही आणि तुम्हीच तिला शिकवू शकाल याची मला निश्चिती आहे ! तिला आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे अर्थ समजावून सांगा . तिला ' लव जिहाद ' म्हणजे काय असते व त्याने हिंदू धर्माचा कसा ऱ्हास होतोय हे ही नक्की सांगा . बाबा हे काम तुम्ही नक्की केलेच पाहिजे कारण तिला तिच्या *शाळेत वा महाविद्यालयात* कुणीही हे सांगणार वा शिकविणार नाही .
तिला राणी लक्ष्मीबाई , जिजाऊ इ च्या पराक्रमाच्या कथा जरूर सांगा व खरा पराक्रम काय असतो ते सांगा .
एका मुलीचे वडील असणे किंवा तुम्हाला एक मुलगी आहे ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे .
आजच्या काळानुसार सत्य काय आहे ते आजूबाजूला उघड्या डोळ्यांनी बघून , त्याची जाणीव आपल्या मुलांना करून देणे हे हिंदू धर्मातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे .
बाबा , तुमच्या मुलीला जशास तसे कसे वागायचे हे शिकवा ! तिला तुम्हीं भक्कम आधार द्या , तिला सांगा तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटात मी तुझ्याबरोबर आहे , म्हणजे ती परधर्माच्या तिला फसवू पाहणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवणार नाही .
जमेल तेव्हा तिला सांगा की , ' सर्वधर्मसमभाव ' हा फक्त एकतर्फी नसतो , तो पाळताना दोन्ही बाजूने असला पाहिजे हे ही शिकवा तिला !
स्वतःचे स्वतंत्र विचार व अस्तित्व यावर कसा ठाम विश्वास ठेवायचा व कुणासमोर ही झुकायचे नसते हे ही शिकवा तिला ! बाबा , हे तिला आपल्या देशातल्या कुठल्याही शाळेत शिकविणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगतोय !
तिला म्हणावं प्रेमात आंधळं होऊन कुणावरही विश्वास ठेऊ नकोस ! स्वतः स्वतंत्र विचार कर व माणसे ओळखायला शिक म्हणावं !
आणि हो तिला पक्की जाणीव करून द्या की *धर्म* हा माणसाच्या आयुष्याचा किती महत्वाचा भाग असतो ते! कारण तिला *धर्म* वगैरे काही खरे नसते , देवाला मानू नये असे सांगणारे ढोंगी लोक जागोजागी भेटतील ! त्याआधीच तिला शिकवा की आपला हिंदू धर्म किती महान आहे की जो स्त्रीला देवीचा व लक्ष्मी चा दर्जा देतो ..तिला हे ही सांगा की हिंदू धर्मात स्त्रीला किती मानसन्मान मिळतो ते ! आणि बाबा तुम्ही ही तिला तसेच वागवा व तिला अतिशय उच्च दर्जाची मूल्ये द्या ! ज्याद्वारे तिला दुसऱ्या चुकीच्या व दांभिक गोष्टींचे आकर्षण वाटणार नाही ! बाबा , तुमची मुलगी म्हणजे आपल्या हिंदू धर्मातील पुढच्या पिढीचा आजचा वारसा आहे , त्यामुळे तिला तुम्ही न घाबरता सत्य काय आहे ते नक्की सांगा . मग ती हाच वारसा आपल्या मुलांना ही नक्की देईल . बाहेर काही लोक असे टपून बसलेत की जे फक्त हिंदू धर्मालाच नावे ठेवून स्वतःच्या स्वार्थाची पोळी कसे भाजतात , ते सत्य चित्र तिला नक्की दाखवा ! त्यांचा ढोंगीपणा कसा आहे ते तिला समजून सांगा !
तिला आपल्या हिंदू धर्माचा सार्थ अभिमान बाळगायला सांगा व यातली जीवनास उपयुक्त मूल्य पाळण्याने कसा फायदा होतो ते नक्की समजावून सांगा !
क्षमा करा बाबा ! मी फार सांगतो आहे , पण बाबा , आपल्या महान
संस्कृती च्या रक्षणासाठी ही खूप त्वर्य (Urgent ) गोष्ट झाली आहे . पण बाबा हे सगळे तुम्ही नक्की कराच , कारण बाबा , वेळ हातातून निघून जात आहे !
तुमची मुलगी फक्त तुमचीच मुलगी नाही पण आपल्या म्लान होऊ पाहत असलेल्या हिंदू धर्माची *"खरी तलवार*" आहे व ही तलवार आता म्यान न राहता परम तेजाने समस्त भारतवर्षात परत एकदा तळपली पाहिजे!
बाबा तुम्ही हे नक्की करालच , म्हणून हा पत्रप्रपंच !
आपलाच ,
विनायक दामोदर सावरकर !
© हेमंत सदाशिव सांबरे
०२.०७.२०२१ .
Mobile No - 9922992370 .
Email - camsambare@gmail.com
A great person indeed!! He had seen the future attempts that today we suffer due to love jihad!! And had proposed a plan to stop this by self discipline.
ReplyDeleteखूप छान सर 👌🙏🌹
ReplyDeleteखूप सुंदर सर ! अप्रतिम शिक्षण !
ReplyDeleteप्रेरक
ReplyDeleteखूप छान, खरं आहे
ReplyDeleteखूपच छान पत्र!
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteखूप छान
ReplyDelete