(हरवलेल्या ) निरागसतेच्या गोष्टी-हेमंत सदाशिव सांबरे

 


( **हरवलेल्या* ) *निरागसतेच्या* *गोष्टी* 



 *The memories* *of lost* *innocence** 


-✒️✒️हेमंत सांबरे 

आधी हा विषय इंग्लिश मध्ये लिहणार होतो , मग ठरविले मराठी व इंग्रजी असे दोन्ही लिहुया .


आज आयुष्य खूप धावपळीचे व धकाधकीचे झाले आहे , कुणाला कुणासाठी वेळ नाही .पुढे जाताना  बऱ्याच गोष्टी हातातून निसटून चालल्या आहेत व हे इतके फास्ट होत आहे की 'हे असे काही घडत आहे', याच्या जाणिवेच्या पलीकडे ही आपण जाऊन  पोहोचलो आहोत ...होय , आपण आयुष्य जगताना ही *निरागसता* हरवत चाललो आहोत! किंबहुना ती आपण हरवून बसलो आहोत आणि हेच कारण आहे की आपल्याला आज *निखळ आनंद* ही एक *स्वप्न* होऊन बसले आहे . 


हे मी अजून पुढे थोडे explain करतो . कोणत्याही गोष्टीतला खराखुरा  आनंद जर हवा असेल तर आपण जे काही करतो ते करताना लाभ-हानी च्या ( *beyond profit-loss )*  पलीकडे जाऊन केले पाहिजे , तरच तो मिळतो .

भाबडेपणा हवाच ! कोणत्याही गोष्टींवर पटकन विश्वास बसणे हे त्या भाबडेपणाचे लक्षण आहे .वाटेवर चालताना आपण कित्येक गोष्टींत फसत जातो , कुणीतरी आपला फायदा घेतो , अशावेळी आपल्यातील मूळ निरागसता टिकवून ठेवणे आव्हान होते . कारण अशा गोष्टी आपला उत्साह घेऊन जाऊ शकतात .म्हणूनच innocence व positivity यांचे जवळचे नाते आहे .आपण positive राहण्यासाठी innocent राहणे गरजेचे आहे .कारण एखादी गोष्ट/ध्येय गाठण्यासाठी innocent राहून , possibility वर focus करावे लागते .बरेच लोक म्हणतात की भामटे व दुसऱ्याला फसवू शकणारे लोकच पुढे जातात , पण माझा तरी यावर विश्वास नाही ! कारण असे दुसऱ्याला फसवून पुढे गेला तरी तुमच्यातील innocence तुम्ही गमावून त्याची मोठी किंमत चुकती करता ! कारण बाहेरच्या लोकांसाठी तुम्ही कुठलेही picture उभे केले तरी , तुमच्या स्वतःला माहीत असते की तुम्ही काय *कमावले* /काय *गमावले* !


आजकाल status ही एक फार अवघड गोष्ट होऊन बसली आहे .म्हणजे बघा ,बाहेर धो धो पाऊस कोसळतोय पण तुम्ही त्यात जाऊन मनसोक्त भिजू शकत नाही , खूप भारी जोक झालाय खळखळून हसायचे आहे पण तुम्ही हसत नाही .हे सगळे यामुळे की निरागसता हरवून बसलो आहोत . 


" लोक काय म्हणतील " या वाक्याशी व तसा विचार करण्यात याचा फार जवळचा संबंध आहे .


थोर सायंटिस्ट थॉमस अल्वा एडिसन या innocent  कसे असले पाहिजे याचे सर्वात उंच शिखर वा सर्वात भारी उदाहरण असावे . तो  दहा हजार पेक्षा जास्त वेळेस अपयशी होऊन ही परत प्रयत्न करत राहून त्याने बल्ब चा शोध लावला . अशी इतरही उदाहरणे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील ! कदाचित आपल्या आजूबाजूचे नातेवाईक , कधी कधी मित्र हेच आपल्याला सतत सांगतात की , ' हे शक्य नाही ' व आपण प्रयत्न थांबवतो , पण एडिसन ला आपल्यासारखे  मित्र वा नातेवाईक नसतील का?  🤔. माहीत नाही! 


Innocent का असावे याबद्दल अजून एक विचार सुचलाय ! तो म्हणजे प्रश्न निर्माण होणे व ते सतत विचारत राहणे .लहान मुले हे कायम करतात पण मोठी लोक त्यांना लगेच म्हणतात , " काय सारखा प्रश्न विचारतोस रे , जा तुझा अभ्यास कर !" म्हणजे लहानपणी च आपल्याला असे ट्रेन केले जाते वा प्रोग्रामिंग केले जाते की जणू , ' प्रश्न विचारणे म्हणजे खूप चुकीचे आहे ' व पुढे आपणही तेच करत जातो .पण प्रश्न पडणे , ते कुणालाही विचारता येणे , त्याचे उत्तर मिळेपर्यंत गप्प न बसणे हे ही निरागसता जिवंत असल्याचेच लक्षण आहे .आणी या प्रश्न विचारणे व उत्तर मिळविणे यात कमीपणा का बाळगायचा ? 


निरागसता ही दुसऱ्याला आदर देण्याच्या वृत्तीचे अजून एक उदाहरण आहे .म्हातारी , मोठी, वयस्कर  माणसे दिसली की त्यांच्यासमोर झुकले पाहिजे , त्यांच्या पाया पडून त्यांचे आशिर्वाद घेतलेच पाहिजे .आपली भारतीय संस्कृती देखील हेच शिकवते . ही गोष्ट  आज हरवत चालली आहे .बरेच जण करतात ही , पण जे करत नाही त्यांना हा दुसऱ्याला/मोठ्यांना  आदर देण्यातला जो निखळ आनंद आहे तो नक्कीच मिळत नाही .


निखळ हा शब्द ही किती सुंदर आहे  ना! ज्यात कुठेही खळ नाही ( म्हणजे खड्डा नाही ) असे ते ! असे हे निखळ होण्यासाठी धडपड केली पाहिजे पण त्याआधी ते का केले पाहिजे ते ही माहित पाहिजे ना ! 


तेव्हा मला तरी असे वाटते की फार लोकांचा विचार करत बसू नका .लोक तेव्हढा काही तुमचा विचार करत नाही .पाऊस आला की मनसोक्त भिजा , चांगला विनोद असला तर खळखळून हसा , निसर्गाच्या कुशीत नेहमी जा , लहान मुलाबरोबर मधूनमधून खूप  खेळा/हसा , म्हाताऱ्या  माणसांना मिठी मारा , त्यांच्याशी गप्पा मारा ! 


थोडक्यात काय तर तुम्ही आम्ही वय, पद , प्रतिष्ठा याने कितीही मोठे झाले तरी आपल्यातले लहान मूल जिवंत ठेवलेच पाहिजे! कारण निखळ व शाश्वत खरा आनंद ही लहान मुलांच्या अंगी असलेली निरागसता टिकवून ठेवल्यानेच मिळतो , दुसरा कशानेही मिळत नाही !


धन्यवाद

【 या विषयावरील मुक्त विचार आहेत , उपदेश वगैरे असे काही नाही ,  आपणास आवडतील ही आशा आहे 】 


© हेमंत सांबरे 

२१.०३.२०२१ .

9922992370 .

Comments

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर