एक (चेष्टा ) -विडंबन
एक होता शिक्षक
एक होती शिक्षिका
ते सांगती गोष्ट
ती तुम्ही ऐका
एक होता गायक
एक होता नायक
एक सुरांच्या प्रेमात
एक दारांच्या प्रेमात
एक होता गवळी
एक होता माळी
एक गुरांच्या प्रेमात
एक फ़ुलांच्या प्रेमात
एक होता शिक्षक
एक होती शिक्षिका
गोष्ट सांगता सांगता
पडले एकमेकांच्याच प्रेमात
साठा उत्तरांची कहाणी , कसली सफळ?कसली पूर्ण?
असल्या प्रेमकथा ना आता विटले हे कर्ण !
Comments
Post a Comment