तुझी वीरता , रुचेना....


विश्वभूषण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर*

*सभोती जरी कंटकाकीर्ण मार्ग ।*
*परि मानले तू धरेलाच स्वर्ग ।*
*तुझी आस , रिपुला कदापि कळेना ।*
*तुझी विरता,मूढ षंढा रुचेना ।१।*

*छळाचे बळाचे कैक आघात झाले ।*
*किती वादळानी संयमा पारखिले ।*
*असा वज्रदेही कुणा जाणवेना।*
*तुझी विरता , मूढ षंढा रुचेना ।२।*

*तुझा त्याग, दृष्टी , कुणा साहवेना ।*
*तुझी राष्ट्रभक्ती कुणा मानवेना ।*
*कसे गोठले रक्त आम्हा कळेना ।*
*तुझी विरता , मूढ षंढा रुचेना ।३।*

*मनी मानसी राष्ट्र गौरव असावा ।*
*तुझ्या दर्शने ,रक्ती अंगार यावा ।*
*अता भीरुता मन्मनाला रुचेना ।*
*तुझी विरता सांगते सज्ज व्हा ना ।४।*
-----------------
*- डॉ.श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी*
९४२३८७५८०६
*स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपणच ही मानवंदना देऊ या .*
स्वातंत्र्यवीर सावरकर हे अद्वितीय व्यक्तिमत्त्व होते .पण स्वातंत्र्योत्तर काळात त्यांचे विचार भारताने अनुकरण करायला हवे होते , पण हेतुपूर्वक त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आहे . हाच विचार व त्याची कारणे या कवितेतून अतिशय अचूकपणे मांडली आहेत . माझे बंधू सुहास सांबरे यांनी या कवितेला अतिशय सुंदर चाल देऊन ती गायली आहे त्याची लिंक सोबत खाली जोडत आहे .

गायन व संगीत - श्री सुहास सांबरे .

https://youtu.be/Xacs7LNoXu8

Comments

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर