#औरंगजेबाच्या वधाचा गुप्त कट !
#औरंगजेबाच्या वधाचा गुप्त कट !
#छत्रपती शिवाजी महाराज
#स्वातंत्र्यवीर सावरकर
सध्या वाचत असलेल्या बाळाराव सावरकर लिखित " रत्नागिरी पर्व " या पुस्तकात हा उल्लेख सापडला .
स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीत असताना त्यांनी " दिल्लीचा डाव " या नावाने एक भाषण दिले होते ..त्यात सांगतात की शिवाजी महाराजांचा आग्र्याला जाण्याचा उद्देश फक्त मिर्झाराजे जयसिंग यांच्या अटी पालन हाच नसून त्या ही पुढे असा काही होता .
म्हणजे जसा त्यांनी अफजलखान मारला तशाच प्रकारे भर दरबारात वा एकांतात संधी मिळताच औरंगजेबावर अचानक हल्ला करून त्याचा जागीच वध करून दिल्लीचे तख्त ताब्यात घेणे असा शिवाजी महाराजांचा गुप्त कट होता .
अर्थात इतिहासात अशा प्रकारे तख्त पालट झालेही आहेत , स्वतः औरंगजेब ही अशाच प्रकारे स्वतःच्या बापाला तुरुंगात टाकून व भावाला ठार मारून दिल्लीच्या सिंहासनावर आरूढ झाला होता .
शत्रूला अचानक बेसावध बघून ठार मारणे , ताब्यात सापडल्यावर जिवंत न सोडणे इ गोष्टीत शिवराय व मराठे ही तरबेज होतेच , म्हणूनच ते औरंगजेबच्या तोडीस तोड असे शत्रू होते .
युद्धात फक्त हुतात्मा होणे हे काही शिवरायांचा उद्देश कधीच नसायचा तर विजयी होणे हाच उद्देश असायचा .
त्यामुळे सावरकर म्हणतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हा प्लॅन B मनात ठेवूनही कदाचित आग्र्याला गेलेही असतील ..
नंतर मात्र औरंगजेबाने शिवाजी महाराज व संभाजी राजे हे दोघेही ताब्यात येऊनही निसटले याबाबत पश्चाताप केला , पण पुढे संभाजी महाराज परत १६८९ ला त्याच्या हातात सापडले तेव्हा मात्र ही चूक त्याने परत केली नाही .
खूप आधी स्वराज्य उभे राहत होते तेव्हा , सेनापती प्रतापराव गुजर यांनी युध्दात ताब्यात मिळालेल्या बहलोलखानास जिवंत सोडून दिले तेव्हा शिवरायांनी प्रतापरावांना खरमरीत पत्र लिहून त्यांना समज दिली होती , त्यामागे हेच कारण होते की हातात सापडूनही शत्रूला का जिवंत सोडले म्हणून?
( वेडात मराठे वीर दौडले सात ! )
इतिहासात जर-तर ला काही किंमत जरी नसली तरी आपल्या मनात येतेच की ,
जर छत्रपती शिवराय अजून दहा वर्षे जरी जगले असते तर !
जर बाजीराव पेशवे यांचा अकाली मृत्यू झाला नसता तर !
जर स्वातंत्र्यवीर सावरकर मार्सेलीस ला निसटून जाण्यात यशस्वी झाले असते तर !
जर , जर , जरतर असे अजून बरेच काही !
असो !
( हे असे जर तर आपल्याही मनात येत असेल तर आपणही व्यक्त व्हा , विशेषतः इतिहासातील कुठल्या घटनांबद्दल आपणास असे वाटते , ते ही सांगा )
© हेमंत सांबरे
9922992370
Comments
Post a Comment