सावरकरांचे नातू श्री सात्यकी सावरकर यांच्यासोबतची हृदयस्पर्शी भेट व चर्चा !
सुरुवातीपासून सांगतो . माझ्याकडे सात्यकी जी यांचा मोबाईल नंबर सहा महिन्यांपासून होता व ते ही माझ्यासारखेच सिंहगड रोडला राहतात हे ही माहीत होते , त्यामुळे भेटण्याची इच्छा खूप होती .पण मधल्या काळात सारख्या lockdown मुळे शक्य होतं नव्हते .
दोन दिवसांपूर्वी त्यांना फोन केला , मनावर दडपण होते , पण बोलताना भेटण्याची इच्छा व्यक्त केली ....मनात साहजिक विचार होता की त्यांना वेळ असेल का इ पण आमच्यातील संवाद पहा,
मी - "सात्यकी जी आपणास भेटायचे आहे "
सात्यकीजी- "मी साधारण सहा वाजता घरी येतो , तुम्हाला कधी वेळ आहे ,त्याप्रमाणे या ."
हे उत्तर एकूण मी जागीच उडालो , म्हणजे मी वेळ विचारायचा तर त्यांनीच उलट माझा वेळ व सोय बघितली .
तर अशा प्रकारे कालच त्यांच्या घरी जाऊन भेटलो .
तब्बल सव्वा तास त्यांच्याबरोबर होतो .
सात्यकीजी म्हणजे डॉ नारायणराव सावरकर यांचे नातू ! अशोकराव सावरकर यांचे चिरंजीव ! या वेळात आमची विविध विषयांवर चर्चा झाली . मग ते हिंदुत्व पासून तर सध्या कुठले पुस्तक वाचतो आहे तिथपर्यंत .
घरी कुणी नसल्याने त्यांनीच उठून माझा व त्यांचा चहा बनवला . त्यांच्या चर्चेत अनेक नवीन गोष्टी कळल्या ..जसे----
मुंबईत डॉ नारायणराव यांनीच" पीयूष" नावाचे देशी पेय त्या काळात एका उद्योजकाला बनवायला सांगून ते लोकप्रिय ही केले होते .
आज आपण सगळीकडे सोसायटीच्या गेटवर वा कंपन्यांच्या गेटवर नेपाळी गुरखा वॉचमन म्हणून बघतो , ते डॉ नारायणराव यांनीच सुरुवात करून प्रोत्साहन दिले होते , त्याआधी हे सुरक्षा रक्षक पठाण असायचे .
डॉ साहेबांनी ही हिंदू , हिंदुत्व , आपला भारत देश यांसाठी कितीतरी कामे पडद्याआड राहून केली पण त्यांनी आत्मचरित्र यासाठी ही नाही लिहले की , सावरकर कुटुंबातील ते एकमेव आधार होते ..
आमच्या चर्चेत अनेक नवीन गोष्टी कळल्या व मला खूप शिकायला मिळाले ..विशेषतः स्वातंत्र्यवीर सावरकर ( सात्यकीजी मात्र तात्यारावच म्हणत होते ) कसे वास्तववादी व व्यवहारज्ञान असलेले होते यावर ही काही उदाहरणे घेऊन चर्चा झाली ..जसे त्यांनी दूरदृष्टी ठेऊन केलेले हिंदूंचे सैनिकीकरन ! ज्याचा फायदा स्वातंत्र्योत्तर काळात , व त्यानंतर आजही आपल्या देशाला कसा होतोय ....
एक सगळ्यात महत्त्वाचा व नवीन मुद्दा होता " उद्योगांचे हिंदूकरण" , म्हणजेच आज बऱ्याच व्यवसायात हिंदू असे नाहीच . जसे मटण/चिकन . याठिकाणी देखील हिंदूंनी उतरले पाहिजे व आपल्या " झटका " या हिंदू पद्धतीने मटण तयार करून ते ही विकले पाहिजे ..तसेच अजूनही इतर अनेक उद्योग जसे tyre-puncture ची दुकाने वा बिर्याणी /बेकरी इ उद्योग तेथेही हिंदूंनी पुढाकार घेऊन देशपातळीवर त्यांची chain store उघडली पाहिजेत ..हा चर्चेतील मुद्दाही विचारणीय वाटला .
मी सध्या वाचत असलेल्या बाळाराव सावरकर लिखित ' हिंदुमहासभा पर्व ' या पुस्तकाच्या बद्दल ही दीर्घ चर्चा झाली .
एकूण सात्यकीजी यांनी कुठेही स्वतःचा बडेजाव असा दाखवला नाही वा मला जाणवले ही नाही ...म्हणजे जाताना असे मनावर दडपण घेऊन गेलो होतो पण भेटल्यावर ते पूर्ण नाहीसे झाले होते .
मला तर असे वाटले की मी जसा सावरकर विचारांचा एक नम्र अभ्यासक व प्रचारक आहे तसेच सात्यकीजी आहेत , ते ही कुणी वेगळे नाही ..मला जितकी व जशी साधने उपलब्ध आहेत तितकीच त्यांनाही आहेत ..हा साधेपणा व वागण्यातले सौजन्य मला खूप भावले ..
निघताना मला त्यांनी सांगितले की तात्याराव वा हिंदुत्व यावर अगदी तुमच्या सोसायटीच्या एखादया कार्यक्रमात ही बोलायचे असेल वा इतर कुठेही बोलायचं असेल तर सांगा , मी येईल !
सात्यकीजी यांचा साधेपणा व नम्रपणा पाहुन माझा आधीच प्रचंड असलेला 'सावरकर ' या व्यक्तीविषयीचा आदर अजून सहस्र पटीने दुणावला !
निघताना तर माझा सेल्फी कॅमेरा नीट चालत नव्हता तर त्यांच्याच मोबाईल मध्ये हा वर दिलेला फोटो त्यांनी काढुन मला पाठवला 👍
या भेटीत एक नवीन मित्र व समविचारी अभ्यासू व्यक्ती जोडल्याचे प्रचंड समाधान लाभले !
आपल्या पिढीला सावरकर कसे होते हे काही प्रत्यक्ष बघायला मिळाले नाही , पण सात्यकीजी यांच्याकडे बघून व त्यांना भेटून ते ( स्वातंत्र्यवीर सावरकर) कसे असतील हे अनुभवता आले हे ही नसे थोडके !
( माझ्यासाठी ही भेट म्हणजे खूप काहीतरी भारी व विशेष होती , कारण मी ज्या व्यक्तीची अगदी समजायला लागले तेव्हापासून भक्ती करतोय त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या घरातील व्यक्तीला प्रत्यक्ष भेटायला मिळाले व चर्चा करता आली , हे माझे खूप मोठे भाग्य आहे असे मी समजतो )
【माझ्या या लेखनावर काही वाचकांनी कविता लिहून वा इतर प्रकारे स्वतःला व्यक्त केले , ते खाली देत आहे ते ही वाचण्यासारखे आहे 】
-
हेमंत सदाशिव सांबरे
9922992370 .
प्रतिक्रिया -१
पेरिले जे जे, ते ते उगवते..
घडलेले पुण्य कधी वाया जाते ?
काळाची परि अचिन्त्य सत्ता,
कधी रुजावे ते ठरवीते..!!
शुद्धता बीजातील कधीही..
नसते सोडत त्या बीजाते..
अनन्तरूपे पसरुनी बाहु...
यथाकाल ती प्रकट होते..
-पंकज नेरुरकर .
प्रतिक्रिया -२
Kharach khoop sadhe aahet Satyaki Savarkar.
Mihi tyanna phone karun bhetun pustake vikat ghetali hoti tyanchya kadun.
-रेवती संझगिरी
प्रतिक्रिया -३
समानशीले व्यसनेशु सख्यं। सारख्या विचारांचे लोकच एकत्र येतात. खूप छान.
-सुधाकर जोशी
प्रतिक्रिया -४
Atishay marmik sirji me melghatat chikhaladara amravati yethe rahato sawarakaranvishayi prachand aadar aahe tyamule tumachi post vachatana mala bharun yet aahe tatya rava sarkhya divyatamyashi mazi bhet hou shakel ka shakya asalyas aapali v saranchi bhet vhavi hi mazi iccha krupaya aashirwad asawa war dilela no mala save karata yeil ka
राजेश ओलकर
एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या च्या घरोबा मध्ये असलेली नम्रता ही उत्तम घरदांज असलेली खून आहे
ReplyDeleteफ़ार सुंदर भेट
वाचून आनंद वाटला
ReplyDeleteखुपच छान ..!
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteहेमंत सांबरे जी, असेच आपले अनुभव लिहत रहा. तुमचे अनुभव वाचून आम्हाला पण अनुभूती होऊ द्या! हा अनुभव पण विलक्षण आहे. अभिनव भारत संस्थेची सुरुवात झालेली ती गोविंद दरेकरांची खोली आणि नाशिक चे अनुभव वाचून प्रत्यक्ष जाऊन आल्या सारखे वाटले.
ReplyDeleteखुप छान 👌
ReplyDeleteवा! खूपच छान.ज्यांची भक्ती केली त्यांच्याच घरातील व्यक्तीला भेटता येणे म्हणजे मिळणारे समाधान, आनंद शब्दात वर्णन करणे अवघड आहे.तुमचा अनुभव वाचून आम्हाला पण सात्यकी यांची भेट झाली असे वाटले.
ReplyDeleteभेटीचे वृत्त आपण खूप छान केले आहे. ग्रेट भेट असेच वर्णन करावे लागेल.
ReplyDelete