#सावरकर , खारचा बंगला व Cyclostyle Machine यांची कथा !

#सावरकर , खारचा बंगला व Cyclostyle Machine यांची कथा ! 
 
गेल्या दोन वर्षांपासून लेखन कलेमुळे अनेक नवीन वाचक , मित्र-मैत्रिणी जोडले जात आहेत व त्यातून अनेक नवनवीन माहिती वा काही अदभुत प्रकरणे ही आयुष्याशी जोडली जात आहेत . गेल्या आठ दिवसांत असेच काही अद्भुत घडले आहे व या अद्भुताला थोडीसी रहस्याची ही फोडणी आहे , जी मी तुम्हा वाचकांना सांगून टाकणार आहे .
वर दिलेल्या शिर्षकावरून सुरुवातीला खरंच काही कळत नाही ,हे मान्य , पण तुम्ही माझ्याबरोबर येथे टिकून राहा मी हळूहळू सगळेच रहस्यांचे दरवाजे उघडतो ...
तर मागच्या आठवडयात मी लिहलेला चंद्रशेखर आझाद यांच्या वरील लेख वाचून स्वाती जी वर्तक यांनी मला संपर्क केला व लेख  आवडल्याचे आवर्जून सांगितले . बोलताना त्यांनी हे ही सांगितले की त्यांचे वडील कै रामचंद्र करकरे हे ' काकोरी कट ' प्रकरणात आझाद यांचे सहकारी होते ( ही माहिती मला नवीन होती व माझ्या वाचनात करकरे यांचे नाव नव्हते आले ) , पण त्याचवेळी त्यांनी मला अनेक प्रकारची माहिती पाठवली , त्यात हा खारचा बंगला , सावरकर व ते Cyclostyle Machine ही अतिशय वेगळी व आजपर्यंत कुणालाही ज्ञात नसलेली माहिती मला पाठवली , जी मला खूपच रंजक ( Interesting ) वाटली , म्हणूनचं वाचकहो मी आपणास ही सांगतो .
प्रथम स्वाती वर्तक यांनी मला जी कथा पाठवली ती जशीच्या तशी मी येथे देतो , ती आपण वाचा , मग शेवटी मी मला सापडलेल्या या गोष्टीतील काही नव्याने उलगडलेल्या गोष्टी मी सांगतो ..

-------------------------------------------------------------------
एका बंगल्याची चित्तरकथा
-------------------------------

बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यावेळेस खार मध्ये लहान लहान,   टुमदार बंगले दिसत असत. चक्क अनेक बंगल्यावर to let .. अशा पाट्या ही दिसत . खारच्या दहाव्या रस्त्यावर असेच दोन बंगले होते . एक होता वर्तक यांचा आणि शेजारी होता स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा . खरे तर सावरकरांनी तो वर्तकांना विकला आणि खार सोडले . काही वर्षांनी वर्तक यांनी तो एका सिंधी गृहस्थास विकला.आणि ते शेजारील बंगल्यात राहू लागले.

दिवस बदललेत आणि बंगल्याची जागा मोठं मोठ्या इमारतींनी घेतली . आजोबा वर्तकांच्या मुलाने ही तो बंगला विकून तेथे नव्याने बांधलेल्या टोलेजंग इमारतीतील एका लहानशा फ्लॅट मध्ये आपले बस्तान मांडले. पण सिंध्यांचा बंगला अजून तसाच होता . बहुदा भाऊबंदकी मुळे तो विकून तेथे इमारत बांधण्यास अडचण येत असावी.

काही वर्षांपूर्वी तो विकला गेला आणि तेथे पाडापाडी सुरू झाली . ते गत वैभव , एका थोर वीराच्या वास्तव्याने पुनीत झालेले घर छिन्नविच्छिन्न होत होते . मनास अत्यंत क्लेश ही होत . त्या खळ्ळकन  फुटणाऱ्या काचा, ते कमानदार दगडांचे इतस्ततः विखुरलेले तुकडे ,ते आमच्याच साहेबांनी बालपणी लावलेले आंब्याचे , चिकूचे, पेरुचे झाड ,सर्व कोसळत होते . हृदय विदीर्ण करीत होते .

मुले शाळकरी असल्याने मी  त्यांचा अभ्यास घेत बसले होते आणि अचानक धावत पळत शेजारचा सिंधी मोठा भाऊ घरात आला न सांगू लागला ...भिंत पाडताना आत मध्ये एक मशीन मिळाले आहे . खूप जुने आहे . तुमचे तर नाही ? तुम्ही राहात होता न ? इतक्या जुन्या गोष्टींबद्दल मला काहीच कल्पना नसल्याने मी म्हटले …” बघते , मुलांचा अभ्यास झाला की सासूबाईंना किंवा यांना विचारते. किंवा थांबा त्यांनाच बोलावून आणते . तुम्हीच विचारा .” ते म्हणाले , “ नको, तुम्ही सावकाश सगळे चर्चा करा ,कुमारला म्हणावे मशीन बघून जा आणि कळवा “ 

संध्याकाळी हे घरी आल्यावर आमची चर्चा झाली . सासूबाईंच्या मते आपले त्या घरात काहीही राहिले नाही . माळे मी स्वतः झाडून पुसून घेतले होते .भिंतीच्या आत आपण कसे ठेवणार ? ते सावरकरांचे काही गुपित असेल . हे जाऊन बघून आले मशीन , मशीन काय म्हणतोय तो सिंधी ..बघू या तरी.

आल्यावर यांचे मत हेच पडले की ते सावरकरांचेच असेल . कारण ते होते पोर्तुगीज मेक एक सायक्लोस्टाईल मशीन. सर्वच म्हणू लागले . सावरकर त्यावर ब्रिटिशांच्या विरोधात पत्रकं काढत असतील , गुपचूप वाटत असतील . खरेच ते संग्रहणीय आहे त्याचे आता इतिहासकालीन महत्व आहे. आपण सावरकरांच्या कोणा नातेवाईकाला कळवायला पाहिजे .
पण कसे ?? आपल्या ओळखीत कोणी नाही आता. ते दिवस सहज हाताशी असलेल्या मोबाईल , इंटरनेट चे पण नव्हते 
या उहापोह मध्ये 2, 4 दिवस गेलेत 
सतत माझ्या मनात एकच विचार , काहीतरी करायला पाहिजे . कोणाला तरी सांगायला पाहिजे .जास्त दिवस झालेत तर , बिल्डर, त्या घरातील भाऊबंदकी ...यांना सांभाळणे कठीण होईल .

आणि एकदम सुचले . एक वाट आहे सावरकर घराण्यापर्यंत पोचण्याची . त्या काळात श्री सुधीर फडके यांच्या मनात सारखा सावरकर यांच्यावर चित्रपट काढण्याचे घोळत होते . ते सावरकर प्रतिष्ठान शी निगडीत होते  आणि माझे चुलत सासरे सुधीर फडके यांचे मित्र . त्याच्या शिडीने पोचता येईल की . झाली मी सूत्रे हलविली आणि लगेचच सावरकर कुटुंब त्या बंगल्यात दाखल झाले. 

फोटो घेणे , बोलणे ,चर्चा सुरू झाले . सावरकर कुटुंबीयांचे  म्हणणे ..ते नक्कीच तात्यांचे असणार . आम्हाला द्या . आम्ही दादर येथील त्यांच्या संग्रहालय मध्ये ठेऊ . 

दिवस वाढत चालले . वाद रंगू लागला . सिंधी कुटुंबातील दोन्ही भावांचे भांडण विकोपास गेले . मोठा भाऊ द्यायला तयार आहे कळले पण चुलत धाकटा भाऊ ..ते तुमचे कशावरून ? म्हणत,  नाही देणार .. असे म्हणू लागला हे कानावर आले. सगळ्यांचे म्हणणे..त्याला मशिनीचे मोल कळले आहे . काहीतरी पाहिजे असेल .

लोकसत्ता मध्ये बातमी छापून आली. 

पोलीस केस झाली 

आणि शेवटी ते मशीन पोलिसांनी जप्त केले आणि आजकाल ते खार पोलीस स्टेशन मध्ये धूळ खात पडले आहे . असे ऐकिवात आहे 

खरे खोटे काय ? कळावयास मार्ग नाही 

सौ.स्वाती वर्तक
दहावा रस्ता
खार (प)
मुंबई 52

--------------------------------------------------------------------
ही जी पोलीस केस झाली व मशीन पोलिसांनी जप्त केले ते वरील कथेचे प्रसंग साल १९९०-९१ च्या दरम्यानचे  आहेत . 
( हे असे असते Cyclostyle Machine ) 
आता आपली ही कथा वाचून झाली असेलच तर आपण हे Cyclostyle Machine आहे तरी काय हे बघू - 

The Cyclostyle duplicating process is a form of stencil copying. A stencil is cut on wax or glazed paper by using a pen-like object with a small rowel on its tip. A large number of small short lines are cut out in the glazed paper, removing the glaze with the spur-wheel, then ink is applied. It was invented in the later 19th century by David Gestetner, who named it "cyclostyle" after a drawing tool he used. Its name incorporates "stylus", classical Latin word for a pen.



"The cyclostyle, which is an instrument used for multiple writing, makes about 140 dots to the inch. The style has a minute spur-wheel or roller, instead of a [pen] point ; the writing is made on stencil paper, whose surface is covered with a brittle glaze. This is perforated by the teeth of the spur-wheel wherever they press against it. The half perforated sheet is then laid on writing paper, and an inked roller is worked over the glaze. The ink passes through the perforations and soaks through them on to the paper below; consequently the impression consists entirely of short and irregular cross bars or dots."[1]
In 1875 Thomas Edison received a patent for the "electric pen", which a decade later was superseded by the mimeograph machine. The cyclostyle was a more automated type of mimeograph machine that produced reproductions faster.

In 1893 Francis Galton described a system for sending line drawings through the widely established telegraph system, using simple numeric codes, and printing out the line drawings at the other end from the codes. He referred to this printer as a "Cyclostyle". It contained elements of Gestetner's system, and also elements in common with modern computer graphics printing of line drawings.
【 ही खाली मी Cyclostyle Machine / Duplicator याचा  विडिओ
 लिंक देतो ती इच्छुक वाचकांनी नक्की बघा , म्हणजे हे मशीन नक्की कसे वापरले जात होते हे लक्षात येईल 👇👇

https://youtu.be/YqZEq9gTbfA
 म्हणजे मी जेव्हा खूप खोलात या सगळ्याचा अभ्यास करत गेलो व मी या वरील स्वाती जी यांच्या कथेचा विचार केला तर यात कुठंतरी अर्धवट माहिती आहे असे वाटले . कारण माझ्या वाचनात स्वातंत्र्यवीर सावरकर हे कधीही खार (मुंबई मधील एक भाग )  येथे राहिले असे आलेच नव्हते ..मग हे वर कथेत वर्णन केलेले *सावरकर नक्की कोणते* ? मग मी सावरकरांचे नातू श्री सात्यकी सावरकर यांना फोन केला व यातली सत्यता काय आहे ते तपासायला विनंती केली . त्यांनी पुढील दोन दिवसांत तपासून सांगितले की स्वतः तात्याराव नव्हे पण सात्यकी यांचे  आजोबा डॉ नारायणराव सावरकर ( स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे धाकटे बंधू )  यांनी तो बंगला विकला   होता  वर्तक यांना व हे तथाकथित Cyclostyle Machine हे  कदाचित डॉ नारायणराव यांचेच असावे . डॉ या मशीनचा वापर त्या काळात ( १९३० चा सुमार ) बहुधा ब्रिटिशांच्या विरोधात वेगवेगळी पत्रके छापणे इ साठी करत असावेत व तेव्हा  इंग्रजांना काहीतरी संशय आला असेल म्हणूनच हे मशीन डॉ  यांनी या बंगल्यात गुप्तपणे लपवले असावे , जे तब्बल ६० वर्षांनी ( १९९० साली ) सापडले .
( डॉ नारायणराव सावरकर- स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे धाकटे बंधू ) 

या सगळ्या उलगडत गेलेल्या एकेक रहस्यांनी लक्षात येते की ,
१ .सावरकर व त्यांचे बंधू कसे  स्वातंत्र्यासाठी मिळेल त्या साधनाने व असेल त्या प्राप्त परिस्थितीत कसे झगडत वा लढत होते .
२ . त्यांना त्या काळात आधुनिक असलेली  यंत्रे मिळविणे , वापरणे इ  सहज अवगत होते 
३ . गुप्तता बाळगणे हा क्रांतिकार्याचा आत्मा असतो व ते त्या वेळी कसे कसोशीने पाळत असावेत . 

असो,  हा सगळा अभ्यास करताना व आपणा पुढे मांडताना  मलाही खूप रोमहर्षक वाटले . पण .......ते Cyclostyle Machine अजूनही त्या खार पोलीस ठाण्यात आहे की , अजूनही इतक्या वर्षांनी हा अनमोल ऐतिहासिक ठेवा असलेले मशीन  परत  सापडेल की  काळाच्या उदरात एक गुप्त रहस्य म्हणूनच राहील ? माहीत नाही ! 
असो !!
© हेमंत सदाशिव सांबरे 
संपर्क - ९९२२९९२३७० .
आभार 
स्वाती वर्तक 
श्री सात्यकी जी सावरकर

Comments

  1. खूप छान. नवीन माहिती कळाली.

    ReplyDelete
  2. खूपच छान गुढ रहस्य उलगडले .स्वाती .. धन्यवाद

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर