बामण लोकांचा द्वेष करण्याचे फायदे(च फायदे !)


                  
*बामण लोकांचा द्वेष करण्याचे फायदे (च फायदे !* )

हे अगदी आम्ही लहानपणापासून बघत आलो आहोत .. तुम्ही ही नक्कीच बघितले , अनुभवले वा स्वतःही केले असेल ! काहीच हरकत नाही , करायलाच पाहिजे !!  अहो मला सांगा ज्यात फायदा आहे अशी गोष्ट तर आपण न चुकता करायलाच पाहिजे . किंबहुना वडीलधारी मंडळी हेच शिकवतात , की फायदा असला की व ती गोष्ट करताना जर कुठलाही धोका संभवत नसेल तर करायला काहीच अडचण नसते / नसावी . 
आता मुद्दयावर येतो ! बघा या जातीला शिव्या कशा दिल्या पाहिजे ,
भटूरड्या
शेंडी-जानवे वाला 
बामन भट ( इथे ब्राह्मण हा योग्य उच्चार आहे ,पण माहीत असूनही मुद्दाम बामन म्हणायचे , त्याने समाजात आपले वजन वाढते ) 
फुकटे 
"बामन भट , अंडे खातो सटासट"
"बामन खातो खूप खूप 
शेंडीला चोळतो शेरभर तूप "
( आमच्या लहानपणी हे म्हणून चिडवले जायचे ) 
या अशा शिव्या व इतर बऱ्याच शिव्या या ब्राह्मण ( Sorry बामन ) लोकांना दिल्याच पाहिजे , तो आपला हक्कच आहे ... कारण सांगतो हे लोकं ना , एक नंबरचे बावळट आहेत बरं का ! कसं ते सांगतो , यांना किती काही बोला , हे बिच्चारे 'आपलं काम भलं आणि आपण भलं ' असे वावरत असतात ...कधीही पुढे येऊन विरोध-बिरोध तर अजिबात करणारच नाही .. इतर लोकांसारखे रस्त्यावर तर कधीही उतरणार नाही .. यामुळे यांची भीती बाळगायचे अजिबात कारण नाही ..बिनधास्त काही बोला , आणि आपली हौस भागवून घ्या व आपली काहीही घाणेरडे वगैरे बोलण्याची मस्ती भागवा ! कुणी म्हणजे अगदी  कुंनी आपलं वाकडं करणारच नाय .

हा जो बामन असतो ना तो काही फक्त पूजा पाठ , दक्षिणा यावर जगत नाही बरं का ! त्याने आज जगातल्या प्रत्येक क्षेत्रात टॉप केलंय बरं का मंडळी !! पण आपल्याला याच्याशी काय करायचं ? आपण बोलताना बिनदिक्कत ठोकून द्यायचे , की आपला हा बामन  फक्त पोटभरू, दक्षिणा-खाऊ आहे . त्याने फायदा असा होतो की अनेकांना आनंदाच्या  उकळ्या फुटतात , अनेकांना गुदगुल्या होतात , आणि आम्हाला बोलताना ही लै झाक वाटतयं . च्यायला आपल्याला त्या बामनागत  मोठं व्हता नाय आलं पण त्याची इज्जत तर काढली की नाही ?  लै मज्जा येतंय , लोकं खिदीखिदी हसत्यात , टाळ्या पिटत मजा घेतात .
अजून पुढची एक गमंत सांगतो बरं का दोस्तांनो ! हे करताना अजिबात घाबरायचं नाही ..कायदा आपलं काडीचही वाकडं करू शकत नाही .. कारण ते अट्रोसिटी वगैरे भानगड या जातीला बिलकुल लागू नाही ..( हे लै भन्नाट सिक्रेट हाय ) , हे सिक्रेट आपल्यातच ठेवा , कुणाला सांगू नका ! पण याचा वेळोवेळी वापर मात्र करत जावा !! 
आपले छत्रपती शिवाजी महाराज तसं बघायला गेलं तर कुठल्याही जातीचा द्वेष , राग करत नव्हते ..शिवाय त्यांच्या मंत्रिमंडळात हे बामनच जास्त होते ..पुढे त्या पेशव्यांनी (परत बामणच ) पूर्ण भारतभर राज्य पसरविले , पण आपण काय करायचे , बिनधास्त म्हणत राहायचं , या बामण लोकांनी आपल्या  राजाला इथं विरोध केला , तिथं त्रास दिला, असं आणि तसे ! बिनधास्त आपलं 'खोटं बोल पण रेटून बोल 'असं करत राहायचं ! कोण ते इतिहास- बितिहास  जाऊन वाचतंय अन कसलं काय ! असं दहापाच वेळा आपणच पैसे देऊन विकत  घेतलेल्या चॅनेलला मुलाखत देत राहिलं की येड्या पब्लिकला खरं च वाटायला लागतंय ...
आपली जी देवळं असतात ना , तिथं काय फकस्त बामनच पुजारी म्हणून नसतात बरं का ! अगदी गुरव , वंजारी , कोळी अगदी सगळेच पुजारी असतात /असू शकतात .शिवाय या मंदिराच्या जीवावर फुलं विकणारे , लॉज चालवणारे , कापडे विकणारे , पूजा साहित्य विकणारे सगळ्याच जातींचे ( आणि सगळ्याच धर्मांचे  देखील बरं का ) अवलंबुन  असतात . पण आपण बोलताना सतत खोटं च बोलायचं की या  बामन लोकांनी अगदी देवळं लुटायचा कार्यक्रम चालवला आहे .. एकटेच  मंदिर लुटत आहेत , असं आपण  साफ खोटं बोलतच राहायचं . 

एकूण ही जात खूपच सॉफ्ट टार्गेट हाय ! काही होत नाही  , काही फरक पडत नाही .. शिवाय यांच्या आडून हिंदूंवर ही सहज टीका करता येते , बोलता येते ..शिवाय यांना बोललात की फारसं कुणाला काय वाटत तर नाय  , पन खुश होणारं लोक वाढतच जात्यात ..शिवाय यांना एकदा हिंदूंच्या इतर जातींपासून तोडलं की हिंदूंना संपवायला असा कितीसा वेळ लागतोय .. मग असे जाती-जातीत भांडण , द्वेष पसरत राहिलं की आपली पिढ्या -पिढ्या ची सोय होत राहते ..

जसं सुरुवातीला सांगितले तसं जर या सगळ्यात जर फक्त फायदाच फायदा असल तर का करू नये ? 

एवढं सगळं सांगूनही तुम्ही जर स्वतःचा फायदा सोडून त्या फुकटखाऊ बामण लोकांची बाजू घेऊ लागलात तर तुमच्या सारखे मूर्ख तुम्हीच ! 

तर  मग येताय ना  माझ्याबरोबर ? आपण मिळुन जाती -जातीत हा द्वेष पसरवू या व आपली तुंबडी भरत राहू  या !  बाकी हे करताना या वैभवशाली महाराष्ट्राचें वाटोळं झालं तरी मग त्याने काय फरक पडतोय ??

कसं वाटलं ? येतांय ना मग ??

(वर सुरुवातीला आर्य चाणक्य यांचे छायाचित्र दिले आहे , चाणक्य हे ब्राह्मण्याचे सर्वोच्च अविष्करण होते . देशभक्ती , त्याग , चातुर्य , पराक्रम , बुद्धिमत्ता ,क्रांतिकार्य,  अपमानाचा घेतलेला सूड या सगळ्याच बाबतीत ज्याचा आदर्श ठेवावा असे ते व्यक्तिमत्त्व होते ) 

© हेमंत सांबरे

Comments

  1. छान विश्लेषण

    ReplyDelete
  2. या बामण द्वेषाचे आद्य प्रवर्तक कोन ? आज श पा जरी ती गादी समर्थपने चावत असल्ये तरी त्या गादीचे फाऊंन्डर कोन हायेत ?

    ReplyDelete
  3. खूप छान 👍👍👍

    ReplyDelete
  4. छान लिहिले आहे चाकोरीबध्द क्लिष्टता लिहिण्यात नाही म्हणून पुढे वाचावेसे वाटते

    ReplyDelete
  5. समीक्षा

    ReplyDelete
  6. अप्रतिम उपरोध.

    ReplyDelete
  7. अप्रतिम लेख. ऊपरोध रसाचा चपलख वापर.

    आता विषयावर थोडे: खरच दिवसेंदिवस द्वेष वाढविणाऱ्या खल प्रव्रुत्ती फोफावत आहेत. यांच्यावर वेळीच चाप लावला पाहिजे. समाजातील कायदेपंडितांनी पुढे येऊन कायदेशीर मार्ग काढावा.

    ReplyDelete
  8. अतिशय रोख विश्लेषण आहे हेमंत. हा विरोधाभास हा बामण लोकांना शिव्या मारणाऱ्या मुर्खांना कितपत समजेल माहीत नाही, पण सणसणीत मुस्काटात मारलीय या लेखाने अश्या खोट्या विद्वानांच्या.

    ReplyDelete
  9. वस्तुस्थिती चे नेमके वर्णन केले आहे,


    ReplyDelete
  10. Very unfortunate, we’re not united

    ReplyDelete
  11. Let us be united & fight together

    ReplyDelete
  12. हिंदू एकतेचा पुरस्कार करून ब्राह्मणांना काहीही मिळालेले नाही.ब्राह्मणांना विशेष वागणूक देऊ शकतील अशा "कोणत्याही" पक्षाला ब्राह्मणांनी मतदान करणे चांगले.ब्राह्मण आरक्षण आणि ‘ॲट्रॉसिटी ॲक्ट’ सारखा कायदा करण्याची मागणी करण्यात लाज वाटू नये.विशेष वागणूक देण्याचे आश्वासन दिले तर एमआयएमलाही मतदान करा

    ReplyDelete
    Replies
    1. कृपा करून mim ला मत देणे असला मूर्खपणाचा विचार करू नका. अशिष्ट शब्द वापरल्याबद्दल क्षमा करा. पण तुमचा विचार घरात घुसलेल्या चोराला पकडण्यासाठी अतिरेक्याला बोलावण्यासारखा आहे. त्या ऐवजी ब्राह्मणानी आपलं आपलं सामर्थ्य कमवायला हवं, सर्व प्रकारचं.

      Delete
  13. फारच छान, जी भाषा समजेल अशी शेलकी विशेषणं लावून सपशेल वार केला आहे..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर