एका सहृदय इंग्रज अधिकाऱ्याची कथा !
एका सहृदय इंग्रज अधिकाऱ्याची कथा !
सगळेच इंग्रज अधिकारी काही वाईट नव्हते ... काही अतिशय क्रूर होते हे खरे असले तरी काहींचा दृष्टिकोन वेगळाच असायचा ..जसं आपण इंग्रजांची क्रूरता पुढे आणतो ,त्याबद्दल बोलतो , लिहतो तसेच हे ही सांगितले पाहिजे , म्हणून हा लेखन व्याप !
तो पारतंत्र्याचा काळ होता व स्थानिक भारतीय लोकांना त्यांचा राग वा द्वेष असणे हे साहजिक होते ..स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सहकारी श्री वासुदेवराव गोगटे यांनी सर हॉट सन यांच्यावर पिस्तुल झाडण्याचा प्रयत्न केला होता .
पुढे १९३७ साली गोगटे यांच्या मुक्ततेचा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा त्या वेळच्या मंत्रिमंडळातील श्री कन्हयालाल मुन्शी यांनी थेट सर हॉटसन यांना पत्र लिहून श्री गोगटे यांच्या मुक्ततेला आपण संमती द्यावी इतकेच सुचवले . त्यावर हॉटसन साहेबांनी नुसतीच संमती दिली इतकेच नव्हे गोगटे यांच्या साठी शंभर रुपये ही पाठवून दिले .
यावरून जुन्या घडून गेलेल्या गोष्टी/घटना कितीही अप्रिय असल्या तरी आत्ताच्या काळानुसार नव्या दृष्टीने नव्या पद्धतीने विचार करता आला पाहिजे ..
यावरून पुढे असे ही म्हणावेसे वाटते की कित्येक जणांना वीर सावरकर हे ही जणू काही इंग्रजांविषयी शत्रुत्व बाळगत वा त्यांचा तिरस्कार करत असे वाटते ..पण तसे कधीही नव्हते तर उलट जे कुणी ब्रिटिश त्यांच्या सहवासात थोडा काळ जरी आले तरी ते देखील सावरकरांचे ज्ञान , त्यांचा त्याग इ बघून त्यांचे भक्त होऊन जात.
यातून एक विशेष शिकायला मिळते की , पूर्वी एखादी घटना घडली वा परिस्थिती होती म्हणून तो जर आपण एखाद्या व्यक्तीचा वा व्यक्तीसमूहांचा राग धरला असेल तर भविष्यात तीच गोष्ट लावून न धरता परिस्थिती बदलली की जुन्या गोष्टी ,जुना राग सोडून देणे जमले पाहिजे /जमवले पाहिजे .
(शेवटी एक मजेची गोष्ट ! या वासुदेवराव गोगटे यांना
सगळे हॉटसन गोगटे या नावाने ओळखले जाऊ लागले . म्हणजे गोळी मारणारा व गोळी झेलून
जिवंत राहणारा ही दोन्ही नावे एकत्र झाली , दुर्मिळ योगायोग ! )
© हेमंत सांबरे
११/०५/२०२२
Comments
Post a Comment