#हिंदूंचे सण-उत्सव - भारतीय अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ

# *हिंदूंचे सण-उत्सव - भारतीय अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ

हा विषय मांडण्याचे बरेच दिवस मनात होते , त्याला मुहुर्त आज मिळाला . हिंदू संस्कृती हा अतिशय खोल व गहन विषय आहे .  यात आपण जितके आत आत जाऊ तितके आपल्याला अनेक व विविध प्रकारचे मोती ,रत्ने इ  सापडत जातात . 
सहसा एखादा विषय आपल्या मनात बरेच दिवस असतो , पण आपण स्वतः   Convince  नसू तर तो कागदावर उतरत नाही ..अलीकडे माझ्या मुलाची मुंज ( उपनयन संस्कार ) झाली व या विषयाची व्याप्ती व समज आपोआपच आली व मी लेखणी परजून सज्ज झालो .

आपल्या हिंदू धर्मात वर्षातील बाराही महिने सतत काही ना काही सण , उत्सव , लग्नं ,  समारंभ इ सुरूच असतात . तुम्ही जर बारकाईने बघितले वा अभ्यास केला तर प्रत्येक सण व आजूबाजूचा निसर्ग व त्यात होणारे बदल यांची अद्भुत सांगड घातलेली दिसून येईल . प्रत्येक गोष्ट करण्यामागे काहीतरी कार्यकारणभाव असतो व त्यामागे पैसा वा चलनवलन फिरण्याचे अर्थकारण दिसून येईल . या हिंदू धर्मातील कोणतीही गोष्ट *विनाकारण* अशी नसतेच मुळी , पण त्यामागचे  अर्थशास्त्र समजून घेता आले पाहिजे ..
कसे ते समजून घेऊ , चला तर मग! 

आज हिंदू धर्मात जी जातींची रचना आढळते , ती मुख्यतः त्या त्या लोकांचे व्यवसाय आहेत व हे सगळे व्यवसाय आपल्या सणांशी निगडित आहेत,  हे आपल्या सहज लक्षात येईल . काळाच्या ओघात जे काही भिन्न-भिन्न जातींमध्ये हिंदू विभागले गेले आहेत , ते केवळ या व्यावसायिक वाटणीमुळे असले तरी सणांच्या निमित्ताने व त्याचवेळी  एकमेकांत होणाऱ्या व्यवहारांमुळे  हे परत विशाल अशा हिंदुजातीत  एकरूप होतात . त्यामुळे मी हा लेख लिहताना अनेक जातीचा उल्लेख समोर आला तरी , आजच्या बदलत्या परिस्थितीत कुणीही कुठलाही व्यवसाय करावा याच मताचा मी आहे .
हे सगळे मांडताना अलीकडे आम्ही स्वतःच जो जिवंत अनुभव घेतला , त्या अनुभवालाच मध्यवर्ती  ठेऊन हा विषय सांगणे मला जास्त व्यावहारिक ( Practical ) वाटत आहे . 

काही दिवसांपूर्वी माझ्या मुलाची मुंज झाली , त्याआधीचे  सात ते आठ महिने म्हणजे खरेदी ,तयारी इ साठीचे होते व त्यातून जे अनुभव आले तेच मी सांगणार आहे, म्हणजे वाचक अधिक चांगल्या प्रकारे हा मुद्दा समजून घेऊ शकतील . 

शिवाय अलीकडे कुठलाही सण इ आला की हिंदूच आधी त्या सणांची , परंपरेची चेष्टा करायला सुरुवात करतात ..आम्ही कसे *पुरोगामी* आहोत , *आधुनिक* विचारांचे आहोत हे दाखवायचा केविलवाणा  प्रयत्न करतात व या प्रयत्नात कदाचित अप्रत्यक्षपणे स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड कसे  मारून घेत आहेत हे सिद्ध करून दाखवणे हा ही या लेखाचा प्रमुख उद्देश आहे .

 इथली ( भारतातील ) हिंदू संस्कृती नष्ट होण्यात , तुमचे *आर्थिक बळ* ही नष्ट होणार आहे , हे ही मी सिद्ध करून दाखविणार आहे .

आमच्या घरात हा जो मुंजीचा समारंभ झाला त्यात क्रमशः मी आम्ही ज्या प्रकारच्या वस्तू /सेवा खरेदी केल्या त्या आपण बघू व हे करताना त्याचे लाभार्थी ( Beneficiary )  कोण-कोण होते व त्यामुळे अर्थकारण कसे फिरले/फिरते ते ही पाहू ----

१ . सोने - चांदी - इतर दागिने खरेदी  आपल्याकडे कुठल्याही लग्नात ही खरेदी म्हणजे अविभाज्य भाग आहे . याचे लाभार्थी मुख्यत्वे *सोनार ,* सोन्याचांदीची दुकाने आहेत .शिवाय तेथे असणारे कारागीर यांना ही रोजगार मिळाला . 

२ . कपड्यांची खरेदी - येथे कपडे विकणारे दुकानदार , शिंपी ( Tailor )  ते थेट हे कपडे ज्या मिलमधून बनून आले तेथील काम करणारे कामगार  व कपडे  बनविणारे ( Manufacturers ). माझ्या मुलाचा कुर्ता त्याला बसत नव्हता , पण त्याला फिट करू शकेल असा टेलर आम्हाला सहजपणे मिळत नव्हता ..अखेर एका टेलरने अतिशय skilfully हे काम करून दिले (हा हुशार टेलर जातीने मुस्लिम ) व त्याचे काम आम्हाला खूप आवडले . 
३ . पूजा साहित्य इ - आता हा कार्यक्रम करताना आधी , कार्यक्रमात व नंतर ही विविध प्रकारच्या पूजा संपन्न झाल्या . जसे आधी ग्रहयज्ञ , प्रत्यक्ष मुंज व नंतर सत्यनारायण इ . आता यात आपण वस्तूंची यादी पाहु . फुले , हार , फळे , झाडांची पाने (उदा-सत्यनारायण-केळीची पाने ) , कुंकू, हळद , तांदूळ ( उदा- अक्षता - त्या फेकू नये , वाया जातात त्यापेक्षा गरिबाला द्याव्या असे अनाहूत सल्ले फक्त हिंदूंना दिले जातात , पण असे सल्ले देणारे लक्षात घेत नाहीत याच वस्तूंचा व्यापार करणारे कुठल्याही जातीचे /धर्माचे असू शकतात/असतात  ) , विविध प्रकारची धान्ये , यज्ञ करताना लागलेले तूप , दही , दूध इ इ . आता आपण लाभार्थी लोकांची यादी बघूया . शेतकरी ( जो ही फळे, फुले , धान्य इ पिकवतो ) , व्यापारी , फुले विकणारा , दूध/दही विकणारा , पूजा करणारा पुरोहित ( बहुधा जातीने ब्राह्मण ) , धान्य विकणारे किराणा दुकानदार व या सर्व साखळीत काम करणारे कामगार हे सगळेच लाभार्थी आहेत . 
३ . प्रवास - या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचा खूप प्रवास झाला . यात आता लाभार्थी कोण ते बघू . पेट्रोलपंप, हॉटेल्स ( जिथे आम्ही जेवलो ) , टोलनाके ( Money to Government ) .आमच्याकडे बरेच नातेवाईक बसने , खासगी वाहनाने आले ,त्यांनीही येताना केलेले वेगवेगळे खर्च . 
४ . पत्रिका छापणे - लाभार्थी - Printing Press 
५ . सजावटीसाठी घेतलेल्या वस्तू इ - यात ही भरपूर खरेदी झाली . तसेच प्रत्यक्षात सजावट करायला  ज्यांनी सेवा दिली (Vendors ) 
६ . मुंजीत आलेले वादक इ 
७ . मंगल कार्यालय व तेथील केटरिंग (यात परत अगदीं आपण मागे मागे गेलो तर त्यांनाही भाज्या , फळे  , धान्य इ इ सगळेच पुरविणारे लाभार्थी सगळेच आले  ) 
अशी ही यादी खूप मोठी होऊ शकते . कदाचित माझी नजर सगळ्याच बिंदूपर्यंत   पोहोचू शकलेली नाही (वाचक मला मदत करु शकतात ) . हिंदूंच्या पूजा-अर्चा , समारंभ  इ मध्ये फक्त ब्राह्मण मंडळींचा फायदा होतो असा चुकीचा व सर्वथा खोटा narrative पसरविण्याचे काम सुरू आहे ,त्याला हे विश्लेषण पूर्णपणे खोडून काढत आहे व छेद देत आहे . 

एकूण काय तर हिंदूंचे सण , उत्सव , हिंदूंचे देव , हिंदूंची मूर्तीपूजा , हिंदूंचे संस्कार , हिंदूंच्या परंपरा इ ची खिल्ली उडवणे , चेष्टा करणे इ तुम्ही किंवा इतर कुणी  करत असाल तर लगेच थांबा ----कारण हे करताना लक्षात घ्या की या सगळ्या गोष्टी होत आहेत व त्या होत असल्यामुळेच तुमच्या-आमच्या घरात प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे पैसा येत आहे , आपले चलनवलन होत आहे .

भारतीय उपखंडात अफगाणिस्तान, पाकिस्तान , बांगलादेश इ ठिकाणी बरोबर ७० ते १०० वर्षांपूर्वी हिंदू संस्कृती सुखनैव नांदत होती . तेथे ती नष्ट केली गेली  . आज या देशांची परिस्थिती अतिशय वाईट आहे व त्यांच्या अर्थव्यवस्था भिकेला लागल्या आहेत . काही मुर्ख लोकांच्या नादी लागून उरलेल्या हिंदुस्थानात देखील हेच करण्याचे घाटत आहे व तसेच प्रयत्न सुरू आहेत ..

विशेषतः (सर्वात आधी ) हिंदूंनाच  विनंती आहे , हे उद्योग थांबवा ! तुम्ही स्वतः ही आपल्या हिंदू धर्मातील कुठल्याही प्रतिकांची चेष्टा करू नका इतरांना ही करू देऊ नका ...' *मूर्तिपूजा'* का गरजेची आहे व त्यामागे आपल्या पूर्वजांची काय दूरदृष्टी होती ते समजून घ्यावे व इतरांना ही समजून सांगावे .

 *दिवाळी* आल्यावर कसे भारताचे अर्थकारण वेगाने फिरू लागते आपणा सर्वांना माहीत आहे . कित्येक व्यापारी स्वतः मान्य करतात की आमचा पूर्ण वर्षाचा बिझनेस त्या दिवाळीच्या पंधरा दिवसांत होतो ..तसेच एप्रिल-मे हे लग्नसराई चे महिने , त्यांचे ही अर्थकारण समजून घ्या .. होळी , गुढीपाडवा , दसरा , हे सगळे सण , उत्सव , समारंभ हे आपल्या हिंदू संस्कृतीने भारतीय अर्थव्यवस्थेला दिलेली अनमोल देणी  आहेत . त्यामुळे हिंदूंना , हिंदू संस्कृतीला नष्ट करू पाहणाऱ्या प्रत्येक गतीविधी , घटना , व्यक्तीसमूह यांच्यावर बारीक लक्ष ठेवा ...विशेषतः राजकारणी लोकांच्या नादी लागू नका जे तुमच्या जाती-जातीत भांडणे लावून स्वतःचा तत्कालीन फायदा करून घेतात .

एकूण काय तर आपले सण, उत्सव , समारंभ , पूजा-अर्चा इ आपल्या पूर्वजांनी अतिशय विचारपूर्वक योजल्या आहेत ..ते करताना समाजातील प्रत्येक घटकाला कसा फायदा होईल व  " एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ " या उक्तीप्रमाणे सर्वांचा उत्कर्ष कसा होईल हेच त्यांनी बारकाईने योजना करून ठेवले आहे; अर्थात काळाच्या ओघात काही बदल होत राहतात . ते बदल स्वीकारून पुढे जात राहायचे आहे . महान हिंदू धर्म , त्यातील रूढी-परंपरा यांचा सार्थ अभिमान आपण नक्कीच बाळगू व पुढच्या पिढीला ही आपली ताकद कशात आहे ते सांगत राहू !

Comments

  1. छान मुद्दे मांडले आहेत 👍

    ReplyDelete
  2. खूप सुंदर विश्लेषण फक्त आर्थिकच नाही तर शारीरिक, मानसिक,बौद्धिक बाबींचे आधारस्तंभ म्हणजे आपली संस्कृती

    ReplyDelete
  3. अयोध्येत जे भव्य राममंदिर बांधकाम सुरू आहे,त्यामुळे ही कितीतरी प्रकारच्या लोकांना रोजगार मिळत आहे आणि मिळत राहील, शिवाय हे काम सरकारी मदतीतून नाही तर राम भक्तांनी दिलेल्या देणगीतून सुरू आहे

    ReplyDelete
  4. संस्कृतीचे देणे - मांडणी छान. एकूणच आपली संपूर्ण अर्थव्यवस्था या सणामागे फिरते. त्यामुळेच दसरा, दिवाळी, गणपती, गुढीपाडवा अशा सणांना अनेक ऑफर विविध क्षेत्रात अग्रगण्य असतात अणि विक्री सुद्धा विक्रमी होते.

    ReplyDelete
  5. खूप छान आणि समर्पक लिहिलं आहे. हे आपल्या हिंदूंना आता कळू लागले आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीत बदल आणि सुधारणा नक्कीच होईल.

    ReplyDelete
  6. सुंदर मांडणी केली आहे

    ReplyDelete
  7. हिंदू संस्कृतीमध्ये सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे असे सर्व त्याबरोबर अर्थकारण ही फिरते कारण कुठलीही गोष्ट व्यवहाराशिवाय होत नाही लेखकांनी प्रत्येक गोष्टीचा संबंध हा थेट पैशापर्यंत येतो हे बारकाईने तपासून मांडले आहे

    ReplyDelete
  8. खुप सुंदर,विचारपुर्वक लिहीलेला लेख आहे. सर्व मुद्दे पटण्यासारखे आहेत.अर्थकारणाशी संबंधित लेखन कमी असतं,त्यात असं मुद्देसूद,विचारपुर्वक लेखन क्वचितच वाचायला मिळते. धन्यवाद!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर