दुसरे महायुद्ध- भारताला स्वातंत्र्याची दुसरी संधी ( पूर्वार्ध व भाग पहिला )
स्वातंत्र्यवीर सावरकर व हिंदू महासभा यांनी दुसरे महायुद्ध सुरू होण्याच्या आधी बरेच वर्षे " हिंदूंचे सैनिकीकरण" म्हणजेच ब्रिटिश भारतीय सैन्यात हिंदूंची भरती हा उपक्रम सुरू केला होता .
दुसरे महायुद्ध सुरू असताना काँग्रेसने सतत सावरकरांची भयंकर उपेक्षा केली व त्यांना सतत Recruiter म्हणून हिणवले , पण भारताच्या स्वातंत्र्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान Clemet Attlee (1951) हे त्यावेळच्या प. बंगाल चे राज्यपाल पी बी चक्रवर्ती यांच्याशी बोलताना म्हणाले ,
"ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याची मुख्य तीन कारणे अशी की ,
1. आझाद हिंद सेनेने बाहेरून निर्माण केलेला दबाव .
2. दुसरे महायुद्ध संपल्यावर, जगभरातील भारतीय सैन्याने ब्रिटिशां विरुद्ध केलेले बंड .
3. त्याचवेळी शेवटी झालेले नाविक दलाचे निर्णायक बंड
या तीन गोष्टी भारताला ब्रिटनने स्वातंत्र्य देण्यासाठी मुख्यत्वे कारणीभूत ठरल्या "
(Ref - This talk between them was further published by Chakraborty himself in a letter to historian R G Majumdar which Mujumdar quoted in his book named 'The History of Bengal ' ).
म्हणजेच ब्रिटनचे पंतप्रधान यांनीच सांगितले की सशस्त्र क्रांतीच्या मार्गामुळेच भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले .
ज्या ब्रिटिशांनी युद्ध , छळ , कपट , कारस्थाने करून येथे सत्ता स्थापन केली असे ते ब्रिटिश इतक्या सहजासहजी हा देश सोडून गेले असतील , अशी कल्पना करणे वा विचार करणे ही किती चुकीचे आहे हे वाचकांच्या सहज लक्षात येईल .
आता वाचकहो , ही जी तीन कारणे वर विषद केली आहेत त्याला आपण विस्ताराने व त्यावेळचे परिस्थितीजन्य पुरावे सादर करत पुढे जाऊ .
ते १९४० हे वर्ष असावे . हिंदुस्थानचे स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात दिसू लागले होते . त्याआधी कित्येक वर्षं हा संघर्ष सुरूच होता . स्वातंत्र्य कसे मिळवावे यासाठीचे विविध विचारप्रवाह व प्रयत्न असे सुरूच होते . पण या सर्वांत एक मतप्रवाह असा होता , त्या प्रवाहाचे म्हणणे असे होते की भारत देशाला स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर सशस्त्र क्रांतीशिवाय पर्याय नाही . व हाच प्रवाह आणी यासाठी लढणारे क्रांतिकारक सतत 1857 ते 1947 पर्यंत ब्रिटिशांशी लढत राहिले . आज मी वाचकांपुढे हा नुसता लेख नव्हे तर एक *शोधनिबंध* ( Research Paper ) ठेवत आहे . या शोधनिबंध मध्ये अनेक पुरावे , त्यावेळच्या परिस्थितीचा अभ्यास इ करून हा लेख सिद्ध झाला आहे . जे वाचक हा दीर्घ लेख शेवटपर्यंत वाचतील त्यांना नक्कीच हे पटेल की , " भारतीय स्वातंत्र्य हे देखील 'सशस्त्र क्रांती ' च्या मार्गानेच मिळाले आहे" . व हे स्वातंत्र्य प्रत्यक्ष मिळविण्यात स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच इतर अनेक क्रांतिकारक यांनी अतिशय निर्णायक भूमिका निभावली आहे .
अर्थात हा लेख लिहताना मी अनेक ठिकाणी काही वाक्ये मूळ इंग्लिश मध्ये जशीच्या तशी ठेवली आहेत , पण त्यासाठी त्याचे खाली संदर्भ व स्पष्टीकरण देण्याचा ही प्रयत्न केला आहे .
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी शपथ घेतली की , " सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून शत्रूला मारिता मारिता मरेतो झुंजेन " आणि ही प्रतिज्ञा सावरकर कधीही विसरले नाहीत व अखेर त्यांनी " हिंदूंचे सैनिकीकरण व राजनीतीचे हिंदुकरण" या नितीद्वारे 'भारताचे स्वातंत्र्य' हे स्वप्न पूर्ण करून दाखवले .
पहिल्या महायुद्धापूर्वी ही (1911ते 1913 च्या दरम्यान ) अभिनव भारत संघटना व लाला हरदयाल इ नी ब्रिटिश भारतीय सैन्यात असंतोष पसरविण्यासाठी
शेकडो पत्रके हिंदी व गुरुमुखी भाषेत छापली व ती पंजाब येथे पाठवून अनेक सैनिकी कॅम्प मध्ये वाटली होती .
पुढे लाला हरदयाल(हे आधी लंडन येथे सावरकरांचे सहकारी व अभिनव भारताचे सदस्य होते ) यांनी गदर पार्टीच्या माध्यमातून जर्मनीशी संधान साधून शस्रे मिळवून भारतावर बाहेरून हल्ला करावा अशी योजना आखली होती .पण दुर्दैवाने ब्रिटिश गुप्तचर विभागाला याचा सुगावा लागला व त्यांनी या गदर पार्टीच्या योजनेची पाळेमुळे खणून काढली , त्यामुळे पहिल्या महायुद्धात ही संधी भारताने गमावली .
पण अर्थात त्यामुळे अशाच प्रकारचे प्रयत्न मात्र कधीही थांबले नाहीत .
पाहिले महायुद्ध सुरू असताना सावरकर अंदमानात अडकून पडले होते . महायुद्ध सुरू झाल्याची बातमी अंदमानात येऊन पोहोचली तसे ही सुवर्णसंधी (भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याची ) असताना आपण येथे अशा असहाय्य स्थितीत अडकून पडलो याचे त्यांना वाईट वाटले (संदर्भ- माझी जन्मठेप - स्वातंत्र्यवीर सावरकर ) . पण तरीही आपले सहकारी लाला हरदयाल , राजा महेंद्रप्रताप इ प्रयत्न करत असतील असे त्यांना वाटले .
पुढे सावरकर रत्नागिरी येथे स्थानबद्ध होते (सन 1928) , तेव्हा श्रद्धानंद च्या फेब्रुवारी -मार्च 1928 या वर्षीच्या अंकात सावरकर दुसरे महायुद्ध लवकरच होईल याचे अचूक अनुमान सांगताना म्हणतात ,
" मागच्या महायुद्धात आर्मेनिया , पोलंड आणि लिथूनिया या सारख्या देशांनी अतिशय नियोजनबद्ध रीतीने आपले स्वातंत्र्य मिळवले पण त्याचवेळी भारताने ही संधी मात्र गमावली . ब्रिटनची अडचण ही आपल्यासाठी संधी बनली पाहिजे .लवकरच दुसरे महायुद्ध होईल , आणि हे युद्ध ब्रिटन व रशिया यांच्यात होईल ,तेव्हा युद्धक्षेत्र युरोपमधून आशिया खंडात येईल , व तेव्हा मात्र ही संधी भारताने गमावू नये .
( संदर्भ - समग्र सावरकर, भाग -8 ).
हे वाचून लक्षात येते की सावरकरांचे राजकीय आकलन ( Political Intelligence ) किती अचूक होते . कारण वरील श्रद्धांनंद मधील लेखानंतर बरोबर अकरा वर्षांनी , 1939 साली दुसरे महायुद्ध सुरू झाले .
दुसरे महायुद्ध जेव्हा युरोप मधून आशिया कडे सरकेल तेव्हा ब्रिटिशांना भारतीय सैन्याची व भारतीय सैनिकांची गरज भासेल हे त्यांनी अचूक ओळखले होते व याच संधीचा फायदा भारताने स्वातंत्र्य मिळविण्यासाठी केला पाहिजे हे त्यांनी खूप आधीपासूनच सांगायला सुरुवात केली होती .
वाचकहो, आता प्रथम आपण त्यावेळी ब्रिटिश सैन्यात हिंदूंची संख्या , स्थिती कशी होती हे आपण बघू . तेव्हाच्या काही हिंदू जातींना ब्रिटिश सरकारने B Unlisted (बिंनसैनिकी )असा शिक्का मारला होता , त्यामुळे या जातींना कितीही योग्यता असली तरी सैन्यात प्रवेश मिळत नसे . तसेच हिंदी सैन्यात हिंदूंना कमिशने मिळत नव्हती . या दोन्ही व इतर अटी रद्द व्हाव्या अशी मागणी सावरकर व हिंदू महासभा यांनी केली . व त्यावेळी असलेल्या व्हाइसरॉय ने मान्य केल्या . (संदर्भ - स्वातंत्र्यवीर सावरकर- धनंजय किर ) .
येथे एक लक्षात घेणे गरजेचे आहे की या दुसऱ्या महायुद्धापूर्वी सैन्य प्रवेशाच्या अटी फक्त हिंदूंना लागू होत्या , तशा इतर धर्मियांना मात्र लागू नव्हत्या .
1938 च्या वर्षी ब्रिटिश सैन्यात साधारणपणे 75% मुस्लिम , 25% हिंदू असे प्रमाण होते , सावरकर व हिंदू महासभेच्या प्रयत्नाने हेच प्रमाण 70% हिंदू व 30% मुस्लिम असे झाले (By End of Aug 1945)
Armed by increasing Hindu numbers increasing Hindu numbers in army the Muslim league expressed concern as many four times between 1941 to 1944 .
After 1947 of the total Muslim soldiers in the British Indian army , over 90 % chose to join the Pakistan army at time of partition and soon after partition Pakistan attacked India in Kashmir . (Ref - The Man Who Could Have Safed Prevented Partition - Uday Mahurkar ) .
याच मुद्याच्या अजून खोलात जाताना मी Wikipedia वर जाऊन शोधले तर मला खालील अतिशय महत्त्वाचा संदर्भ मिळाला जो मी वाचकांसाठी जशाच्या तशा जोडत आहे ,
"The Indian Army during World War II , a British Force referred as " British Indian Army began the War in 1939 numbering just under 2,00,000 men , by the end of the war (August 1945 ) it had become largest volunteer army over 2.5 million (25 lacs) ".
म्हणजेच दुसऱ्या महायुद्धापूर्वी केवळ 2 लाख असलेले सैन्य युद्ध संपताना तब्बल 25 लाखापर्यंत पोहोचले होते ,यावरून हे सिद्ध होते की हिंदू महासभा व सावरकर यांच्या ब्रिटिश सैन्यात हिंदूंना भरती करण्याच्या प्रयत्नांची व्याप्ती किती मोठी व निर्णायक (Big Scale and Decisive )होती .
( REFER BELOW WIKIPIDIA REF)
सावरकरांवर ब्रिटिशांना दुसऱ्या महायुद्धासाठी सैन्यबळ पुरवणे व त्यांना मदत करणे हा आरोप केला जातो , पण हा आरोप अन्यायकारक आहे .
याचे खंडन करताना मला खालील संदर्भ महत्वाचा वाटतो की दुसरे महायुद्ध सुरू होण्याच्या खूप आधी त्यांनी हिंदूंचे सैनिकीकरण व भारतीय राजनीतीचे हिंदूकरण हे खूप आधी सुरू केले होते.
किंबहुना डॉ मुंजे यांनी हे प्रयत्न 1930 पासूनच (म्हणजे सावरकर पूर्णवेळ राजकारणात येण्याच्या खूप आधी ) सुरू केले होते , फक्त सावरकर यांनी हिंदू महासभेची धुरा हाती घेतल्यावर या मोहिमेला अधिक बळ मिळाले . डॉ मुंजे यांच्या याच प्रयत्नांचा भाग म्हणून 1937 साली नाशिक येथे 'भोसला मिलिटरी स्कुल ' सुरू झाले होते . हे स्कुल आजही भारतीय सैन्याला पराक्रमी सैनिकांचे बळ पुरवत आहे .
1938 साली - महाराष्ट्र साहित्य संमेलन अध्यक्षते च्या पदावरून सावरकर भाषण करताना - "लेखण्या मोडा बंदुका घ्या " असा दिव्य संदेश त्यांनी सर्वांना दिला . तेव्हा ही सावरकरांची दूरदृष्टी न समजल्यांने त्यांच्यावर टीका ही झाली .
1943-चा अजून एक संदर्भ वाचकांनी नक्की बघावा , त्यावेळचे वृत्तपत्र The Bombay Chronical मधील हे कात्रण पहा यात सावरकरांच्या पनवेल येथे झालेल्या भाषणाचा संदर्भ आहे , यावरून लक्षात येते की सावरकर " हिंदुंचे सैनिकीकरण " या मुद्द्याबाबत किती गंभीर व ध्येयनिष्ठ होते ,
( Date 5 February , 1943 )
वरील कात्रणात जे भाषण उल्लेखिले आहे त्यात सावरकर म्हणतात की , " सर्व तरुणांनी भूदल , वायुदल व नौकादलात सामील व्हावे , जी गोष्ट अंतिमतः देशाच्या हिताची होणार आहे . तसेच त्यांनी या तरुणांना सैन्यात काम करताना अस्पृश्यता , जातीयता नष्ट करून बुद्धिवादी बना असा संदेश दिला . अशा प्रकारच्या सावरकरांच्या सभांतून काही इंग्रज सैनिकी अधिकारी ही उपस्थित राहत असत , त्यांच्या समक्षच सावरकर बेधडकपणे सांगत की , आज ब्रिटिशांच्या साहाय्याने मिळणारी अद्ययावत शस्रे स्वीकारा व ती कशी चालवायची ते शिकून घ्या ! मग त्या शस्रांचा रोख व नेम कोणावर व कुठे धरायचा ते उद्याचे उद्या बघता येईल .
एका भाषणात सावरकर म्हणतात ,
"शेरास सव्वाशेर हाच न्याय माणसाला वा समाजाला मानाने जिवंत राहण्यास सर्वथैव उपयोगी पडतो , हे लक्षात ठेवा आणि याचसाठी सैनिकी वृत्तीचे तरुण पिढीमध्ये पोषण होणे हे राष्ट्राच्या हितासाठी आवश्यक आहे .एक वेळ आमच्या तरुण लोकांत लेखक, कवी नसले तरी चालतील पण आमची लढाऊ वृत्ती फिरून फोफावलीच पाहिजे .नाट्यगृहे व बोलपटगृह नसली तरी चालतील पण रायफल क्लब सगळीकडे स्थापन व्हायला पाहिजे , त्याही गोष्टी आम्हाला हव्याच आहेत , पण प्रथम हे , नंतर ते !"
(संदर्भ -समग्र सावरकर वाङमय)
धनंजय किर यांच्या सावरकर चरित्रातील खालचा संदर्भ खूप महत्त्वाचा आहे ,
'One of the greatest services that Savarkar, Munje and Hindu Mahasabha rendered to the nation was to convince the British to remove caste distinction between martial and non-martial Hindus in the recruitment of Hindu youth in British Indian Army in 1930 . This campaign however got a major fillip from the British after Savarkar arrived on political scene . (Ref Swataryveer Savarkar - Dhananjay Keer ) '
दुसरे महायुद्ध नजरेच्या टप्प्यात दिसू लागले तेव्हा सावरकर एका भाषणात म्हणतात ,
" तुमचा लाभ होत असेल तर तुम्ही सहकार्य (ब्रिटिशांना ) का करू नये ? तुमचे शत्रू कोण आहेत (म्हणजे ब्रिटिश हेच शत्रू ) हे तुम्ही जाणताच .मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सैन्यात शिरा , बंदुका वापरण्यास शिका मग त्याच बंदुका स्वातंत्र्याच्या कारणासाठी दुसऱ्या दिशेला फिरवा . "
(संदर्भ- स्वातंत्र्यवीर सावरकर-धनंजय किर)
राजकारणात कुटील निती अवलंबावी लागते .आपल्या लाभासाठी इंग्रजांशी मैत्री करता येते. म्हणूनच माझे स्पष्टपणे सांगणे आहे शस्रे शिकण्यासाठी पुढे या .चोहोबाजूंनी इंग्रजांवर संकट येत आहे त्याचा लाभ करून घ्या .विलायतेत जाऊन बॅरिस्टर व्हायला लाज वाटत नाही तर इंग्रजापासून सैनिकी शिक्षण घेताना लाज का वाटावी ?
जसे पूर्वी विवेचन केले तसे
एकूण हे सगळे वाचून लक्षात येते की वीर सावरकरांचा दृष्टिकोन या महायुद्धाकडे बघण्याचा किती दूरदृष्टीचा व व्यापक असा होता .
अलीकडे जे नवीन संशोधन पुढे येत आहे त्यानुसार स्वातंत्र्यवीर सावरकर यांना " The Father Of Indian National Security " असे संबोधले जात आहे . कारण जसे आम्ही वर विवेचन केले त्यानुसार 1939 च्या पूर्वीच्या भारतीय सैन्यात फक्त 2 लाख इतके सैन्य होते , जर सावरकर व हिंदू महासभेने हिंदूंचे सैनिकीकरण ही मोहीम राबवलीच नसती तर काय झाले असते ? कारण याच काळात नेहरू , गांधी व काँग्रेस हे सैन्यभरती बद्दल पूर्णपणे उदासीन होते . किंबहुना नेहरू, काँग्रेस हे सावरकर , हिंदू महासभा यांची चेष्टा करत होते , त्यांची हेटाळणी करत होते .
पुढचा एक महत्वाचा पुरावा वाचकांना देऊन या लेखमालेतील पहिल्या लेखाचा समारोप करतो ,
" Lakhs of Hindu youths joined the British Indian Army and in just span of 5 years (1939-43) the Hindu strength rose from three-fourth to almost 70% . Two of the warnings were from the vice Chancellor of the Aligarh Muslim University Sir Ziauudin Ahmad and Pakistan first prime minister Liaquat Ali Khan { Ref Dhananjay Keer- Veer Savarkar }
Subsequent development proved Savarkar vision was right. Muslim soldiers in British Indian Army , over 90 % chose to join the Pakistan army at the time of Partition and after that Pakistan attacked on India .
{ Ref - Veer Savarkar - The Man Who Could Have Prevented Partition by Uday Mahulkar }
हे वाचून लक्षात येते की जर सावरकर व हिंदुमहासभा यांनी सैनिकीकरणाचा प्रचार , प्रसार ही दूरदृष्टी असलेली कृती केलीच तर भारताला खरंच स्वातंत्र्य मिळाले असते का ? आणि जरी मिळाले असते आणि आपली भारताची स्वतःची सैन्यसिद्धता व शस्रे शिकलेली तरुण पिढी नसती तर या स्वतंत्र भारताचे स्वातंत्र्य किती दिवस टिकले असते ??
स्वातंत्र्यवीर सावरकर व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी एकत्र येऊन व अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा जो प्रयत्न केला , तो खरोखरच यशस्वी झाला, पण त्याचे श्रेय त्यांना मिळाले का ?
वाचकहो , स्वातंत्र्य मिळवून देण्याचे खरे श्रेय (Credit ) ज्यांचे आहे ते त्यांना देऊन टाकण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे , असे आपणास वाटते का ?
या प्रश्नांची उत्तरे शोधणे सुज्ञ वाचकांवर सोपवतो व पुढच्या व दुसऱ्या भागात आपण रासबिहारी बोस यांनी स्थापन केलेल्या व पुढे ज्याचे नेतृत्व ज्या देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केले त्या आझाद हिंद सेनेला या सैनिकीकरण मोहिमेचा कसा फायदा झाला व त्यांनी बाहेरून भारतावर हल्ला करून ब्रिटिश सत्तेवर कसा निर्णायक घाव घातला हे बघू !
(पुढचा व दुसरा भाग ' आझाद हिंद सेनेचा ब्रिटिश सत्तेवर निर्णायक घाव ).
© हेमंत सांबरे
9922992370 .
अतिशय दूरदृृृष्टीने वीर सावरकर,नेताजी व मुंजेंनी हे विचार मांडले व लोकांना कृती करायला भाग पाडले आणि त्यामुळेच आज आपले सैन्य जगातील सर्वोत्तम सैन्य आहे.वीर सावरकरांचा जयजयकार असो.
ReplyDeleteछान अभ्यासपूर्ण लेख, स्वातंत्र्या साठीचे प्रयत्न व काँग्रेस चा स्वार्थीपणा जनतेला समजेल यामुळे
ReplyDeleteधन्यवाद
Delete