मोदी अभिष्टचिंतन - डॉ सचिन
मानतो आम्ही हे अहोभाग्य
दिव्य लाभले आम्हास मोदी
अलौकिक असे हा देशप्रधान
बरळोत काही उगाच विरोधी
संसदेसही त्यांनी मंदिर केले
लावून पायरीधूळ माथी
धर्मांध नाही पण धर्माभिमानी
लोकतंत्र मानती मूळ मोदी
एकनाथी होत सदैव सोशिक
सोसती जहाल द्वेषक्लेश मोदी
देशहितास्तव गोड मानून घेती
कडू अपमान नी अपेश मोदी
अहोरात्र या पुण्ण्यभूमीस्तव
जागती नी कष्टती मोदी
देशद्रोही ठाण्यांवर विध्वंसक
अग्निबाण होत बरसती मोदी
इतिहासाची जाण नेमकी अन्
वर्तमानाचे सत्य भान मोदी
छेद देती हरेक द्रोही षडयंत्रा
दे जगी भारता सन्मान मोदी
विवेकानंदी स्थिरविवेक आणि
शिवपेशवी यत्न सशस्त्र मोदी
तळमळ तीव्र ती सावरकरी
नी कौटिलीय अर्थशास्त्र मोदी
हा स्वयंसेवक हो प्रधानसेवक
नि:संग हो राजयोगी मोदी
उज्ज्वल देशभविष्य जहाजा
जपती होऊन दक्ष समर्थ गोदी
शिवतेजास बनवून आरसा
पथ पाहतील दावतील मोदी
वर्तमानी स्थापित ते सर्वोच्च
पुनश्च सर्वोच्च शोभतील मोदी
रचना- डॉ सचिन चिंगरे
धुळे
Comments
Post a Comment