माझे पाणी पिण्याचे प्रयोग -हेमंत सांबरे
-हेमंत सांबरे
या भारत वर्षात अगदी अलीकडच्या काळात एक खूप थोर व निःस्वार्थी महापुरुष होऊन गेले , पण त्यांच्या बद्दल आजही खूप कमी लिहले वा बोलले जाते . असे हे महान पुरुष म्हणजे श्री _राजीवजी दीक्षित_ ! आपल्यातील कित्येकांनी त्यांचे नावही ऐकले असेल पण त्यांचे जे कार्य आहे ते फार कमी जणांना माहीत असेल . मलाही दोन वर्षांपूर्वी पर्यंत फार काही माहीत नव्हते . पण कोरोना च्या काळात " आपण पाणी कसे प्यावे " यावरचे त्यांचे भाषण ऐकण्यात आले व वाचकहो शप्पथ सांगतो माझे (तरी) आयुष्य आमूलाग्र बदलून गेले आहे .
तसे जीवन हे खूप सोप्पे आहे , पण आपण त्याला कसे अवघड बनवून टाकतो हे तुम्हाला आजचा लेख वाचून व माझे अनुभव समजून लक्षात येईल .
राजीवजी दीक्षित यांनी थोर _महर्षी वाग्भट_ यांचा संदर्भ दिला आहे . वाग्भट यांनी कुठल्याही रोगावर कोणताही उपचार सांगितला नाही परंतु ' _रोग होऊच नये_ ' यासाठी नेमके काय करावे यावर खूप मोठे संशोधन करून ठेवले आहे .
याच संशोधनात ' पाणी कसे प्यावे ' यावरची सूत्रे ( Formula's ) त्यांनी सांगितली आहेत . राजीवजी त्यांच्या व्याख्यानात याबद्दल खूप सविस्तर बोलतात . अर्थात सुरुवातीला आपला यावर विश्वास बसत नाही , माझाही बसला नव्हता . पण जेव्हा मी पूर्ण ऐकले , व गेली दोन वर्षे मी ही सूत्रे कसोशीने पाळण्याचा प्रयत्न केला व त्याचे मला फायदे ही कसे झाले, याबद्दल मी आपणास जसे आहे तसे सांगणार आहे .
यामागचा हेतू एकच की माझा जसा फायदा झाला तसा आपलाही व्हावा , इतकाच आहे .
हे सांगताना मी अशी मांडणी करतोय ,
१. वाग्भट यांची पाच सूत्रे
२ .हे सूत्र माहीत होण्यापूर्वी मी काय (म्हणजे मूर्खपणा ) करत असायचो ?
३ .यात बदल केल्यावर माझा नेमका कसा , काय फायदा झाला ?
सूत्र क्रमांक १
जेवण झाल्यावर लगेच खूप पाणी पिऊ नका .
सूत्र क्रमांक २
पाणी पिताना घोट घोट पाणी पिणे
सूत्र क्रमांक ३
पाणी नेहमी बसूनच प्यावे.
सूत्र क्रमांक ४
सकाळी उठल्यावर लगेच ब्रश न करता आधी पाणी प्यावे .
सूत्र क्रमांक ५
खूप थंड वा फ्रिजमधील पाणी पिऊ नका .
मी मात्र जेवण करताना व जेवण झाल्यावर कमीतकमी एक लोटीभर (साधारण एक लिटर ) पाणी पीत असे . याचे कारण कुणी कधी सांगितलेच नाही की पाणी कसे प्यावे .खूप थंड पाणी पिण्याची देखील मला सवय होतीच . कारण मी स्वतः असे समजत असे की ही अतिशय क्षुल्लक वा कमी महत्वाची बाब आहे . किंवा त्यात काय विशेष ? असला विचार मी करायचो .
राजीवजी सांगतात की जेवण सुरू केले की आपल्या जठरात अग्नी प्रदीप्त (पेटतो )होतो . आपण जेवण करताना वा लगेच जेवण झाल्यावर पाणी पिले की हा पेटलेला अग्नी लगेच विझतो . मग पाणी , विझलेला अग्नी व खाल्लेले अन्न हे एकत्र येऊन त्यांचे आपल्या जठरात विष तयार होते . हे विष मग गॅस बनून आपल्या शरीरात सगळीकडे पसरायला सुरुवात होते . यालाच आपण आम्लपित्त ( Acidity ) झाले असे म्हणतो .
राजीवजी सांगतात मनुष्याच्या शरीरात 90 % आजार हे पोटाच्या विकारांपासून होतात .
आता मी माझ्या स्वतःच्या मुद्द्यांवर येतो . मी काय करायचो ?? बरोबर हे वर जे सांगितले आहे त्याच्या विरुद्ध . याचे कारण , माहीतच नव्हते ! मला मुख्य त्रास जर कुठला आहे तर तो मूळव्याध ! हे वरील नियम न पाळता दोन वर्षांपूर्वी मी अगदी विरुद्ध वागत होतो .
हे सगळे बघितल्यावर मला लक्षात आले की मला खूप मोठा बदल करावा लागणार आहे . सुदैवाने lockdown मध्ये हे प्रयोग करायला वेळ मिळाला . या नवीन सवयी लावणे (पाणी कसे प्यावे ) दिसायला खूप सोप्या वाटल्या पण खरोखर कृतीत आणणे खूप कठीण होते . माझा मुख्य प्रॉब्लेम होता हा की टॉयलेट ला गेल्यावर , टॉयलेट व्हायला वा करायला लागणारा वेळ व द्यावा लागणारा जोर ! पण पाणी पिण्याची वरील चार सूत्रे मी तब्बल चार महिने अतिशय कसोशीने पाळली . या काळात चहाचे/कॉफीचे प्रमाण निम्म्यावर आणले (बंद करू शकलो नाही , हे अर्थात अपयश ) . पाणी नेहमी बसूनच पिऊ लागलो . (पाणी बसून न पिण्याचा संबंध गुडघे दुखण्याशी देखील आहे असे म्हणतात ) . तसेच अगदी मोबाईल मधल्या घडयाळवर लक्ष ठेऊन जेवणाच्या एक तास आधी भरपूर पाणी पिऊन घ्यायचो व जेवण झाल्यावर अगदी किरकोळ (दोन-तीन घोट ) पाणी प्यायचं असं काहीसं सुरू केलं . जेवण झाल्यावर मग तब्बल चाळीस मिनिटांनी पाणी पिणे असं अगदी लक्षात ठेऊन करू लागलो . (हे करणं खूप अवघड आहे बरं का , त्यातल्या त्यात सतत व अधिक काळ करणे नक्कीच कठीण ) पण मी हे करू शकलो याबद्दल खरच देवाचे आभारच मानावे लागतील . कारण चारच महिन्यांनी याचा परिणाम (Confirmed Result ) मला जाणवू लागला . आता टॉयलेट ला गेल्यावर मी दहा ते पंधरा मिनिटांत बाहेर येऊ लागलो (हा वेळही जास्तच असेल😂😂, पण पूर्वी मला 30 ते 40 मिनिटं लागायचे ) . मूळव्याधीचा जो असह्य त्रास व्हायचा तो 90 % तरी कमीच झाला . शिवाय अधूनमधून Acidity झाल्यावर छातीत जळजळ व्हायची ते प्रमाणही अत्यंत कमीच झाले .
माझी मूळव्याध पूर्ण बरी झाली नसली तरी माझ्या पाणी पिण्याच्या सवयी बदलल्यानेच केवळ माझे आरोग्य आज पहिल्यापेक्षा खूप सुधारले आहे , याची मला स्वतःला खात्री पटली आहे . कारण त्याआधी औषधे, गोळ्या इ भरपूर करून झालेच होते , पण तेव्हा इतका अद्भुत परिणाम मात्र दिसला नव्हता .
थंड पाणी पिल्याने नेमके काय होते ? तर थंड पाणी शरीरात आल्यावर शरीर त्या थंड पाण्याला आपल्या तापमानाला आणण्याचे काम सुरू करते . त्यामुळे शरीराचे नुकसान होते . म्हणूनच राजीवजी थोडेसे कोमट पाणी प्यायला सांगतात .
अशा रीतीने माझे पाणी पिण्याचे प्रयोग (शतशः आभार राजीव दीक्षित ) यशस्वीपणे सुरू आहेत .
*नेमके मी हे का व कसे केले ?*
का केले ? याचे उघड उत्तर मला तसा भयंकर त्रास होतच होता (😄😄 हे सत्य )म्हणूनच !
पण कसे केले हे जास्त महत्वाचे आहे .
मी आमच्या किचन मध्ये व बेडरूम मध्ये ही वरील पाच सूत्रे लिहलेला कागद चिकटवला . रोज माझ्या डोळ्यासमोर राहील असा ! त्याने काय झाले की ते सतत माझ्यासमोर राहून मला आठवण करून देत राहिले ..दुसरे मी मोबाईलवर Reminder Apps वापरून बघितले , त्याचाही थोडा फायदा झाला ...म्हणजे असं की जेवण झाल्यावर चाळीस मिनिटे सेट करा , मग alarm वाजला की पाणी प्या इ इ . सकाळी उठल्यावर ही पाणी पिण्याचा अलार्म सेट केला .
पाणी पिताना बाटलीने पाणी न पिता लोटी व फुलपात्र घेऊनच पाणी प्यायला लागलो . त्याने घोट घोट पाणी पिणे शक्य होऊ लागले .
मी इतक्या उत्साहाने (With Full Excitement ) तुम्हाला सांगतोय यावरूनच तुमच्या लक्षात येऊ शकेल की या नवीन सवयी लावण्याचा मला किती मोठा व निर्णायक फायदा झाला असेल तो !
पण असे असूनही या सवयी लावणे व त्या कायम (Maintain ) ठेवणे खूप कठीण आहे . विशेषतः आपण घराबाहेर असलो की ! कारण आपण घराच्या बाहेर असलो की बऱ्याचदा उभे राहूनच पाणी पितो , सहसा फ्रिजमधले थंडगार पाणी पितो (यात आपण status म्हणजे प्रतिष्ठा याचा ही विचार करतो ) , इतर करतात तसेच आपण नाही केले तर बाकीचे आपल्याला हसतील असेही वाटत राहते (मला वाटायचं , तुम्ही अर्थात तसे नसाल 😄) .
*_मला हे का लिहावे वाटले ?*_
यातल्या बऱ्याचशा गोष्टी खासगी (Private ) असूनही मला का सांगाव्या वाटल्या ? याचे उत्तर राजीवजी दीक्षित यांचे जीवनचरित्र अभ्यासले तर सहज लक्षात येईल . राजीव दीक्षित यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यात सतत सत्य सांगण्याचा प्रयत्न केला . तुमच्या आमच्या रोजच्या जीवनात ही (साधं पाणी कसे प्यावे ) खूप महत्वाची माहिती सहसा कोणताही डॉक्टर वा मेडिकल क्षेत्रातील व्यक्ती ठळकपणे सांगणार नाही(अर्थात त्यांना ही हे माहीत असले तरी शक्यतो नाही सांगणार ) . हेच कारण आहे की आजही राजीवजी दीक्षित यांचे ही नाव फारसे कुणी घेत नाही . पण त्यांनी जे जे केले , सांगितले ते सर्वसामान्य लोकांच्या खूप भल्याचे होते व आहे . त्या अर्थाने राजीवजी खूप मोठे देशभक्त व श्रेष्ठ असे भारतमातेचे सुपुत्र होते . त्यांचे आयुर्वेद व आरोग्याच्या संदर्भातील बरेचसे व्हिडिओ you tube वर उपलब्ध आहेत , ते इच्छुक वाचकांनी नक्की जाऊन बघावे /ऐकावे .
(आणि शेवटी हा लेख आवडला असेल तर , पुढे पाठवायला माझ्या परवानगी ची बिलकुल आवश्यकता नाही )
माहितीपूर्ण लेख आहे. तुम्ही 5 सूत्र लिहीली आहेत .त्यातले फक्त 4 थे सूत्र मी करीत नाही . त्याची सवय लावणे कठीण वाटते. बघू या
ReplyDeleteNice information. Delighted to go through the same
ReplyDelete