Get It Done Now - Brian Tracy - पुस्तकाची टिपणे
Get it done Now - Brian Tracy
Notes
- हेमंत सांबरे
काम करणं ही आयुष्य भरासाठी शिक्षा आहे असा विचार करणारे लोक आर्थिक दृष्ट्या खालच्या पातळीवर असतात
यशस्वी लोकांचा एक सगळ्यात महत्वाचा गुण असतो म्हणजे त्यांचा निर्धार पक्का असतो . कितीही नैराश्य आले तरीही ते त्यातून बाहेर पडतात आणि आपले काम करत राहतात .
यशस्वी लोक पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान उठतात . स्वप्रयत्नाने श्रीमंत झालेले लोक सहाच्या आधीच उठतात .
पुस्तक विकत घेणारे आणि वाचणारे लोक कोण असतात असं तुम्हाला वाटते ? ते गरीब नक्कीच नसतात .
तुम्ही एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरी गेलात तर तिथे तुम्हाला सर्वत्र पुस्तकच पुस्तकं दिसतील आणि गरीब लोकांच्या घरी गेलात तर तिथे तुम्हाला मोठा टिव्ही दिसेल पण पुस्तकं अजिबात दिसणार नाहीत . कारण ते वाचन करत नाही .
स्वयंशिस्त हीच श्रीमंती ची गुरुकिल्ली आहे .
एखादं काम करायचं ठरवलं असेल तर ते काम सुरू ठेवण्यासाठी शिस्त गरजेची असते . जेव्हा ठरवलेलं काम आपण पूर्ण करतो तेव्हा आपल्याला स्वतः बद्दल अद्भुत अशी भावना उत्पन्न होते .
कामाच्या ठिकाणी फक्त काम आणि काम करत राहिले पाहिजे .
जगातील फक्त ३% लोक स्वतःची उद्दिष्ट ठरवतात व लिहून काढतात .
जी गोष्ट शिकणं गरजेचे आहे ते शिकलेच पाहिजे . काही लोकांच्या बाबतीत एखादं कौशल्य ही निसर्गाची देणगी असते . काहींना तेच आत्मसात करायला खूप कष्ट घ्यावे लागतात . पण प्रयत्न करत राहिले तर कोणीही ते कौशल्य आत्मसात करू शकते .
अवघड काम आधी करा व संपवा .
एखाद्या कामाचे छोटे छोटे भाग करा आणि एक एक भाग पूर्ण करा .
आपण जेव्हढा वेळ नियोजन करण्यात घालवू , काम सुरू करण्यापूर्वीच आत्मविश्वास मिळतो .
खालच्या 80% मधील लोक अपयशी ठरतात कारण ते सवयींचे गुलाम झालेले असतात . ते सतत आनंद मिळेल अशीच कामे करत राहतात . त्या कामांना विशेष मूल्य नसते .
मनुष्य एका वेळी एकच काम करू शकतो . म्हणूनच एका वेळी एकच काम लक्ष देऊन करणे गरजेचे आहे . मनुष्य प्राणी multitasking करण्यात असमर्थ आहे .
परिपूर्णता चां अट्टाहास करू नका , काम सुरू करा व करत रहा .
फारच प्रभावित करणारे आहे,आणि घेण्यासारखे भरपूर आहे.
ReplyDelete