ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर - पुस्तक परिक्षण - हेमंत सांबरे











आज दिनांक १५.०७.२०२३ रोजी विनया खडपेकर लिखित " ज्ञात - अज्ञात अहिल्याबाई होळकर " हे पुस्तक वाचून पूर्ण केले . 
अलीकडे असे ठरवले आहे की , प्रत्येक पुस्तक वाचून झाले की त्यावर छोटेसे /जितके जमेल तितके परीक्षण लिहणार. 
हे पुस्तक खूप सारा अभ्यास करून लीहले आहे यात कुठलीही शंका नाही . मुळात माझी स्वतःची उत्सुकता होती , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या बद्दल जाणून घेण्याची . 
विनया खडपेकर यांनी लिहलेले हे पुस्तकं म्हणजे कादंबरी नसून त्यावेळी नेमके काय घडत होते याचे जसेच्या तसे वर्णन आहे . हे करताना त्यांनी पुरावे म्हणून त्यावेळी होत असलेला पत्रव्यवहार , कागदपत्रे यांचा आधार घेऊन लिहलेले आहे . त्यामुळे हे पुस्तक वाचताना वाचकांचे कुठलेही मनोरंजन होत नाही . पण ज्या वाचकांना इतिहास जाणून घेण्याची उत्सुकता आहे , त्यांना मात्र हे पुस्तक खूप उपयोगी आहे . 
अहिल्याबाई  यांचा जन्म १७२५ चां , तर मृत्यू १७९५ चां . त्यामुळे त्यांचे जीवन म्हणजे मराठेशाहीचा उत्कर्षाचा काळ ते मराठेशाहीचा उतरता काळ हे दोन्ही काळ आपल्याला बघायला मिळतात . 
अहिल्याबाई होळकर यांच्या आयुष्यात अनेक वैयक्तिक दुःखे आली . स्वतःच्या डोळ्यासमोर घरातील सर्व कर्त्या पुरुषांचा मृत्यू त्यांना बघावा लागला . तरी हे सारे दुःख पचवून त्या जनतेसाठी काम करत राहिल्या . नुसत्या होळकर राज्यात नव्हे तर अवघ्या भारत वर्षांत त्यांनी अनेक घाट , मंदिरे , धर्मशाळा इ त्यांनी बांधून घेतल्या . त्यासाठी त्यांनी अमाप पैसा खर्च केला . आजही उभ्या हिंदुस्थानात हे सर्व साक्ष देत उभे आहेत व त्यातून आपणास अहिल्याबाई यांची आठवण करून देत आहेत . 
महादजी शिंदे व अहिल्याबाई यांचे एकमेकात असलेली स्पर्धा , त्यातून निर्माण होणारे प्रश्न याचे ही लेखिकेने आपल्यासमोर यथार्थ वर्णन उभे केले आहे . अतिशय प्रेमळ असलेल्या अहिल्याबाई वेळप्रसंगी कशा कठोर होऊन राज्य हाकत हे बघून आपणही चकित होतो . जनतेचे त्यांच्यावर अलोट प्रेम होते . त्यामुळे आजूबाजूचे राजे , पुण्याचे सरकार हे ही त्यांना दबून असत . 
लेखिकेने आपल्यासमोर अहिल्याबाई यांच्या अनेक चांगल्या गोष्टी दाखविताना त्यांच्या स्वभावातील दोष , त्यांच्या मर्यादा हे ही मांडले आहे .  स्वतःच्या हयातीत बाईना होळकर राज्याला योग्य वारस शोधता आला नाही याची खंत ही आपल्याला पुस्तक वाचताना कळते . 
१७९५ साली मराठ्यांचे साम्राज्य त्यावेळच्या भारतभरात ७५% भूभागावर पसरले होते . पण मराठा सरदारांची परस्पर स्पर्धा , हेवेदावे , पैशांचे हिशोब यामुळे या राज्याला कशी उतरती कळा लागली होती ते ही वाचून समजते . ब्रिटिश कशा प्रकारे हळूहळू प्रवेश करत हे मराठा राज्य पोखरत चालले होते , ते ही वाचकाला समजत राहते , जाणवत राहते . तरीही वेळप्रसंगी (जसे टिपू विरुध्द , निजाम विरुध्द ) हेच मराठे सरदार एकत्र येऊन विजय मिळवत होते . 
पण तरीही साधारण १७१० ते १८०० अशी नव्वद वर्षे मराठा साम्राज्य विस्तारत होते , तसेच आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे की मराठा सैनिकांनी अटकेपर्यंत भगवा झेंडा रोवून हिंदूंना विजयी केले होते . यात होळकरांचा वाटा ही खूप मोठा असा होता . 
लेखिकेच्या लिखाणात कुठेही मनोरंजन हा उद्देश नसल्याने वाचकाला नेटाने वाचत हे पुस्तकं पूर्ण करावे लागते , तसे मला ही हे वाचून पूर्ण करता आले याचे समाधान वाटले .

पुस्तक परीक्षण लेखन 
हेमंत सांबरे 

Comments

  1. अप्रतिम समीक्षण

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर