Posts

Showing posts from September, 2023

सुभेदार - शिवाजी - तान्हाजी यांच्या मैत्रीची अद्भुत कथा

Image
सुभेदार - शिवाजी - तान्हाजी यांच्या मैत्रीची अद्भुत कथा - हेमंत सांबरे  कालच रात्री सुभेदार बघायची संधी मिळाली . आणि लगेच त्यावर लिहलेच पाहिजे ,अशी प्रबळ इच्छा निर्माण झाली .  सध्या चित्रपट हे अतिशय प्रभावी माध्यम आहे . त्यामुळे एखादा  ऐतिहासिक कथेवरचा चित्रपट कसा बनवला गेला आहे याला खूप महत्त्व येते . शिवराज अष्टक मालेतील दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांचा हा पाचवा चित्रपट !  या आधीच्या चारही चित्रपटांनी खूप लोकप्रियता मिळवली आहे . दिगपाल हा अतिशय हुशार व अभ्यासू दिग्दर्शक , अभिनेता , लेखक आहे . त्याचे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर असलेले निस्सीम प्रेम व भक्ती त्याचा चित्रपट बघितला की जाणवत राहते .   तान्हाजी , सिंहगड ही आपल्या सर्वांना परिचित असलेली कथा असली  तरी , दिगपाल ने अतिशय अचूक पद्धतीने "  तानाजी - शिवाजी यांच्यात असलेली अद्वितीय मैत्री"  हा कथेचा मुख्य धागा म्हणून आपल्यासमोर प्रस्तुत केला आहे . पूर्ण चित्रात आपल्यासमोर या मैत्रीचे धागे उलगडत जातात . या दोघांचे एकमेकांशी असलेला स्नेह, त्यांचे प्रेम इ गोष्टींशी  प्रेक...