#झपूर्झा - अप्रतिम म्युझियम


#झपूर्झा - अप्रतिम म्युझियम

ज्ञाताच्या कुंपणावरून
धीरत्व धरून
उड्डाण करून 
चिद्घनचपला ही जाते ...
नाचत जेथे चकचकते;
अंधुक आकृती तीस दिसती,
त्या गाताती 
निगुढ गीती 
त्या गीतांचे ध्वनी निघती 
झपूर्झा !गडे झपूर्झा ...
- कवी केशवसुत 

एखाद्या कवीला वा प्रतिभावंत व्यक्तीला एखादी कल्पना नेमकी कशी सुचते? जेव्हा ते काव्य स्फुरत असते तेव्हा नेमके काय घडते  , हे केशवसुतांनी या त्यांच्या सुप्रसिद्ध कवितेत वर्णन केले आहे .. पण तो सुचण्याचा , स्फुरत्व येण्याचा क्षण नेमका कसा पकडला जातो ते खरतर गूढच असते , त्या गुढाला खरंतर कुठलेही नाव असे नाहीच म्हणूनच केशवसुतांनी त्याला नाव दिले 
" झपूर्झा" 

आज आम्ही याच नावाच्या अतिशय अद्वितीय अशा म्युझियम ला भेट दिली . हे झपूर्झा म्युझियम खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला कुडजे गावाजवळ आहे . 

पू ना गाडगीळ अँड सन्स यांनी हे अतिशय सुंदर असे म्युझियम उभारले आहे .

चित्रकला , शिल्पकला , काव्य यांच्याशी संबंधित असलेली एकूण दहा दालने येथे आहेत . 
अनेक मराठी कवींच्या सुप्रसिद्ध कविता येथे अतिशय उत्तमपणे मांडल्या आहेत , त्या बघताना जुन्या आठवणी जागृत होतात व आपण खूप पूर्वी जे वाचन केले आहे त्यावेळी आपल्या मनावर याचा जो ठसा उमटला होता त्याची आठवण आली .
या कवितांमध्ये बा सी मर्ढेकर, भा रा तांबे , शांता शेळके  या माझ्या आवडत्या कवींच्या कविता बघून सुखद धक्का बसला . 

उत्तम व्यवस्थापन , अप्रतिम स्वच्छता, पूना गेस्ट हाऊस कडून चालविले जाणारे उत्तम रेस्टॉरंट त्यामुळे येथला आमचा दिवस अतिशय उत्तम गेला .

खडकवासला धरणाला अगदी लागून तब्बल सात एकरात हा परिसर आहे . शिवाय आज अधूनमधून पाऊस बरसत असल्याने आम्हाला खूप छान वाटले . या आर्ट गॅलरी सोबत जुन्या काळातील घर कसे असते ते ही अतिशय सुबक 
पणे मांडले आहे ..याठिकाणी ही आम्ही बराच वेळ रमलो . येथे मुलांनी जाते , खळद चालवून बघण्याचा आनंद लुटला .
(जुन्या घरांतील स्वैपाक घर ) 
(न्हाणीघर व तेथील बंब, घांघाळे इ)

शेवटी निघताना येथील चित्रकार सतीश सोंनवडेकर यांच्याकडून अर्जुन चे अतिशय उत्तम असे चित्र काढून मिळाले . 
एकूणच ज्यांना कलेची आवड आहे अशा प्रत्येकाने येथे एक दिवस भेट देऊन हा आनंद लुटला पाहिजे .
माझी मात्र  झपूर्झा बघून काहीतरी अद्भुत सापडल्या सारखे " युरेका युरेका " अशी अवस्था झाली ..

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर