#वाचनप्रेरणादिवस#छोटा वाचक

#वाचन प्रेरणा दिन
#सावरकर समजून घेताना
# छोटावाचक 
#tanishkPathak 
#डॉ कलाम यांचा आज वाढदिवस

आजच्या दिवसा निमित्त महत्वाचे वाटले म्हणून दुसरी पोस्ट टाकतोय . 
गणेश पाठक हे माझे गेल्या काही वर्षांत झालेले उत्तम मित्र आहेत . खरतर दोन वर्षांपूर्वी ते आधी माझे गुरू झाले मग आम्ही मित्र ही झालो . त्यांच्याकडून मी Microsoft Excel  शिकलो . 
माझे पहिले पुस्तक #सावरकर समजून घेताना २८ मे २०२३ ला फर्ग्युसन महाविद्यालयात प्रकाशित झाले तेव्हा या आनंदाच्या प्रसंगी गणेश जी  सहकुटुंब उपस्थित राहिले . त्यांनी या प्रसंगी माझ्यासाठी एक अतिशय सुंदर फुलांचा बुके आणला होता . अशा प्रकारे माझ्यासाठी त्यांनी हा दिवस अतिशय संस्मरणीय केला .

अजून पुढे बाकी आहे . त्यांचा मुलगा तनिष्क (इयत्ता सातवी  ) याने अलीकडेच सावरकर समजून घेताना पूर्ण वाचून काढले . त्यांच्या शाळेत " मी वाचलेले पुस्तक " या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली . त्या स्पर्धेत तनिष्कने याच पुस्तकावर निबंध लिहला व चक्क या निबंधाची निवड त्यांच्या शाळेतील मासिकात प्रसिद्ध झाले . 

आजकाल प्रत्येक पालकांना वाटते की , आपल्या मुलांनी वाचावे, पण मुलांचे पुस्तक वाचन कमी झाले आहे अशी तक्रार ही ऐकू येते . अशावेळी तनिष्क ने एक मराठी पुस्तक पूर्ण वाचून त्यावर ही प्रतिक्रिया लिहावी ही खूपच मोठी गोष्ट आहे . गणेशजी पाठक व वहिनी यांचे विशेष अभिनंदन . तनिष्क ने ही खूप खूप वाचावे व आयुष्यात खूप खूप मोठे व्हावे हे आशीर्वाद .

Comments

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर